Site icon InMarathi

मोबाईल पावसात भिजला… नुसतंच टेन्शन घेण्याऐवजी हे वाचा

handset in water Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोबाईल पाण्यात पडला की आपल्या हृदयात एकदम धस्स होतं. बोलून चालून यंत्रच हो ते… त्यामुळे पाण्यात पडल्यावर ते जिवंत राहील की नाही याची शाश्वती देणे कठीणच!

तसे हल्ली वॉटरप्रूफ, स्प्लॅश प्रूफ मोबाईल वापरले जातात. जवळपास सारेच मोबाईल आता स्प्लॅश प्रूफ असतात. मात्र, असं असलं तरीही मोबाईल पाण्यात पडल्यावर भीती वाटतेच.

कारण ‘फुल प्रूफ’ असला तरीही कष्टाच्या पैशाने घेतलेला हा फोन आपल्यासाठी फारच प्रिय असतो…

आणि आपल्याला या इवल्याश्या पण उपयुक्त यंत्राने इतकी सवय लावलेली असते की तो पाण्यात पडल्यावर जेवढी इजा त्याला होत नाही त्यापेक्षा जास्त मार आपल्या मनाला बसतो.

मग पाण्यातून त्याला बाहेर काढल्यावर अगदी भरल्या डोळ्यांनी आपण त्याच्याकडे पाहतो आणि त्याला सुरु करायचा प्रयत्न करतो. नशिबात असेल तर सुरु होतो नाही तर बोंबला!

 

 

अश्यावेळी पाण्यात पडलेला मोबाईल जरी सुरु झाला तरी तो अजून किती वेळ नीट काम करेल हे सांगता येत नाही. कारण मोबाईलच्या आत जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो.

अश्यावेळी सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास सगळ्यात आधी फोन स्विच ऑफ कराआणि त्याची बॅटरी काढून ठेवा.

सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

हे ही वाचा मोबाईलचं कव्हर पिवळं का पडतं? वाचा त्यामागची कारणं आणि त्यावरचे सोप्पे उपाय!

त्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी अधून टाकण्यासाठी अनेक सोप्या पद्धती आहेत.

बहुतेक पद्धती तुम्ही ऐकून असालच, तर काही पद्धती अजून तुमच्या कानापर्यंत पोचायच्या बाकी असतील. आज आम्ही त्या सगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने मोबाईलमध्ये पाणी गेले असल्यास आपण मोबाईल वाळवू शकतो.

एक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवस ठेवा.

मोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे सांगितले जाते.

 

 

दुसरी एक पद्धत म्हणजे मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे शोषलं जातं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबातच करु नये.

ओला मोबाईल हेअर ड्रायरने कधीही वाळवू नये.

ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळवण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.

 

मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता.

हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅकमध्ये तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

 

 

अजून एक पद्धत म्हणजे – मोबाईल वाळवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. या शिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.

 

 

आता ह्यापुढे जर कधी मोबाईल पाण्यात पडला तर घाबरून न जाता यापैकी जी पद्धत तुम्हाला शक्य व सोप्पी वाटते ती वापरा… आणि तुमच्या लाडक्या मोबाईलचे प्राण वाचवा!

===

हे ही वाचा मोबाईलची बॅटरी लवकर संपल्यामुळे होणारी धांदल-गैरसोय-चीडचीड टाळा, या टिप्स वापरा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version