जीन्सच्या खिश्यांना छोटी बटणं का असतात? कधी विचार केलाय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जीन्स तर सर्वच जण वापरतात आणि जीन्स वापरायला कोणाला नाही आवडत? स्टाईलीश जीन्स घातल्याने आपला लुक देखील चेंज होतो आणि त्या घालून वावरायला देखील सोप्प जातं. अश्या या रोजच्या वापरातल्या जीन्सवरील एका गोष्टीकडे फारच कमी लोकांचं लक्ष गेलं असेल.
ती गोष्ट म्हणजे जीन्सच्या पॉकेटवर असणारी लहान लहान बटणे! तुम्हाला माहित आहे का… ही लहान लहान बटणे जीन्सच्या पॉकेटवर का असतात? त्यांना तिथे जागा देण्यामागे नेमका उद्देश काय? नसेल माहित तर आज जाणून घ्या!
ही बटणं फक्त स्टाईलसाठी असतात, असा अनेकांचा अंदाज असतो. पण हा अंदाज चुकीचा आहे. सुरुवातीच्या काळात डेनिम्स किंवा जीन्स ही कामगार वर्गाची मक्तेदारी मानली जात असे.
श्रमाची काम करणाऱ्या कामगारांच्या जीन्सचे खिसे फाटणं ही नेहमीची समस्या होती. खिशांची आवश्यकता असल्यामुळे काम करताना ते फाटणं, कामगारांना परवडणारं नव्हतं, त्याच्याकडे डोळेझाक करुन चालणार नव्हतं. १८७३ मध्ये ही समस्या ऐकून जेकब डेव्हिस नावाच्या एका टेलरला कल्पना सुचली.
जेकब त्या काळी Levi Strauss & Co. अर्थात आज लिव्हाईस नावाने प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या जीन्स वापरत असे. फाटणाऱ्या खिशांवर उपाय म्हणून त्याने पॉकेट्सच्या कोपऱ्यात धातूची बटणं लावली. यामुळे खिसे जीन्सला घट्ट चिकटून राहत असत आणि फाटत नसत.
जेकबला त्याच्या कल्पनेचं पेटंट काढायचं होतं, मात्र पैशांच्या अभावी त्याला अडचण आल्या. १८७२ मध्ये त्याने Levi Strauss ला पत्र लिहून आयडिया विकण्याचा प्रस्ताव ठेवला, अट एकच- कंपनीने पेटंटसाठी पैसे पुरवावेत. तेव्हापासून ही धातूची छोटेखानी बटणं तुमच्या-आमच्या जीन्सचा अविभाज्य भाग झाले.
तर अशी आहे ही जीन्सच्या पॉकेटवरच्या बटणांची मिस्ट्री !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.