' कार-मालकांसाठी महत्वाचं: FASTagची डेडलाईन जवळ आलीये! जाणून घ्या… – InMarathi

कार-मालकांसाठी महत्वाचं: FASTagची डेडलाईन जवळ आलीये! जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

१ डिसेंबर २०१९ पासून प्रत्येक, खाजगी किंवा व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी FASTag वापरणे बंधनकारक असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केले आहे.

यामुळे कदाचित राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यासंबंधीचे प्रश्न कायमचे मिटतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

प्रत्येक चार चाकी वाहनधारकाकडे हे FASTag असणे बंधनकारक आहे, अन्यथा ज्या वाहनधारकाकडे हे FASTagनसेल त्याच्याकडून देशभरातील टोल नाक्यावर दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे.

या नव्या नियमामुळे देशभरातील टोल नाक्यावरून प्रवास करताना तुम्हाला टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज नाही. कुठेही न थांबता तुम्ही अगदी सुखकर प्रवास करू शकता.

 

fastag InMarathi

सध्या FASTag वापरणाऱ्यांसाठी एकच वेगळी रांग उपलब्ध करून देण्यात येत होती, पण इथून पुढे प्रत्येक गाडी साठी एकच मार्ग असेल फक्त ज्यांच्याकडे FASTag नाही अशा गाड्यांसाठी मात्र वेगळी रांग असेल.

आता हा FASTag म्हणजे काय आणि यामूळे नेमका बदल काय घडणार आहे, जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती या लेखाच्या माध्यमातून.

FASTag म्हणजे काय?

FASTag हे प्रीपेड रिचार्जेबल टॅग्जआहेत ज्याद्वारे तुम्ही जेंव्हा टोल नाक्यावरून गाडी पास कराल तेंव्हा या टॅगद्वारे टोल चार्जेस तुमच्या बँक अकाऊंट मधून कट होतील.

हा टॅग तुमच्या गाडीच्या समोरील काचेवर आतील बाजूला लावण्यात येईल. यामुळे टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी गाडी थांबवण्याची गरज नाही.

तुमच्या गाडीला जर FASTag बसवला असेल तर, गाडी टोल नाक्यावरून गेली की तुमच्या टोलचे पैसे तुमच्या बँक अकाऊंट मधून कट केले जातील. हा FASTag रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेटिफिकेशन नुसार चालतो.

 

FasTag toll InMarathi

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या FASTagला कोणतीही एक्सपायरी डेट नाही. जोपर्यंत हे FASTag वाचण्याच्या स्थितीत असतील तोपर्यंत तरी ते चालतील. या FASTag कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही.

२. FASTag कसे घेऊ शकाल आणि ते कसे अॅक्टिव्ह कराल?

देशभरात २२ सर्टिफाइड बँकानी वेगवेगळ्या चॅनेल्सच्या माध्यमातून हे FASTag उपलब्ध केले आहे. तुम्ही तुमच्या बँकेकडूनही घेऊ शकता किंवा टोल नाक्यावरही घेऊ शकता किंवा अमेझॉन सारख्या ऑनलाइन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.

FASTag विकत घेताना ते कोणत्याही ठरविक बँकेशी जोडण्यात आलेले नाही. तुम्ही ते विकत घेतल्यानंतर तुमच्या बँक अकाऊंटशी जोडू शकता किंवा ‘My FASTag’ हे अॅप डाऊनलोड करून तिथूनही ते अॅक्टिवेट करू शकता.

ज्यांच्याकडे अँड्रॉइड स्मार्ट फोन आहे ते गुगल प्ले स्टोअर वरून हे अॅप डाऊनलोड करू शकतात. ज्यांच्याकडे आयफोन आहे ते अॅपल स्टोअर वरून हे अॅप डाऊनलोड करू शकतात.

fastag-app InMarathi

त्यानंतर तुमच्या कोणत्याही एका बँक अकाऊंटला या अॅपद्वारे FASTag लिंक करा. या अॅपमध्ये प्रीपेड वॅलेट फॅसिलिटी देखील आहे. जर तुम्हाला FASTag बँक अकाऊंटशी लिंक करायचे नसेल तर तुम्ही वॅलेटमध्ये पैसे जमा करू शकता.

त्यामुळे टोल थेट तुमच्या बँक अकाऊंट मधून कट न होता, या वॅलेटमधून कट होईल. किंवा तुमच्या जवळचा ब्रांचमध्ये जाऊनही FASTag घेऊ शकता आणि ते तुमच्या अकाऊंटला लिंक करू शकता.

FASTag अॅक्टिव्ह करत असताना बँकेच्या नियमानुसार तुम्हाला केवायसी (Know Your Custmor) जमा करावी लागेल. या केवायसी कागदपत्रांसोबतच तुम्हाला तुमच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटहे सादर करावे लागेल.



३. FASTag साठी किती शुल्क आकारले जाईल?

FASTag साठी प्रत्येक बँकेकडून आकारले जाणारे शुल्क वेगळेवेगळे आहेत. पण, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासाठी १०० रुपये इतके शुल्क निश्चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात बँकेकडून खालीलप्रमाणे दर आकारला जात आहे.

उदा. HDFC बँकचे शुल्क ४०० रुपये आहे. त्याचे विवरण ते पुढीलप्रमाणे देतात

१०० रु. – टॅग इस्यूअन्स फी

२०० रु. – रीफंडेबल सिक्युरिटी डिपॉजिट्स

१०० रु. – पहिला वॅलेट रिचार्ज जेंव्हा तुम्ही वॅलेट तयार कराल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

HDFC With Fastag InMarathi

ICICI बँकेचे शुल्क आहे ४९९

९९.१२ – टॅग इस्यूअन्स फी

२०० रु. – रीफंडेबल सिक्युरिटी डिपॉजिट्स

२०० रु. – पहिला वॅलेट रिचार्ज जेंव्हा तुम्ही वॅलेट तयार कराल.

अशा पद्धतीने प्रत्येक बँकेचे शुल्क हे वेगवेगळे आहेत, प्रत्येक बँकेच्या वेबसाईट वर तुम्हाला याचे तपशील पाहायला मिळतील.

सध्या HDFC, ICICI, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सीस बँक, एअरटेल पेमेंट बँक आणि पेटीएमवर वर तुम्हला FASTag मिळू शकेल किंवा अमेझॉनवरूनही मागवू शकता.

एअरटेल पेमेंट बँकने FASTag च्या खरेदीवर ५० रु कॅशबॅक देखील देत आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या साईट्सवर सध्या वेगवेगळी ऑफर सुरु आहे.

 

fasttag ICICI InMarathi

४. FASTag चे रिचार्ज कसे कराल?

जर FASTag तुमच्या बँक अकाऊंटला लिंक असेल तर, त्यासाठी तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा रिचार्ज करण्याची गरज नाही.

पण, जर तुम्ही FASTag मोबाईल अॅपवरील वॅलेटला लिंक केले असेल तर, हे वॅलेट रिचार्ज करणे आवश्यक आहे. हे वॅलेट तुम्ही युपीआय/डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड/एनइएफटी/ नेट बँकिंग अशा माध्यमातूनही रिचार्ज करू शकता.

या वेगवेगळ्या माध्यमातून FASTag वॅलेट रिचार्ज करण्यासाठी काही अतिरिक्त शुल्क आकाराला जाईल. या वॅलेटवर एकावेळी रिचार्ज करण्याची मर्यादा देखील लादण्यात आल्या आहेत.

लिमिटेड केवयसी FASTag अकाऊंट धारकांसाठी अशा प्रकारच्या FASTag वॅलेटवर जास्तीत जास्त २०,००० रुपयांची शिल्लक ठेवता येईल आणि महिन्यातून रिचार्ज करण्याची मर्यादा देखील २०,००० रुपयेच असेल. यापेक्षा मोठी रक्कम वॅलेटवर जमा करता येणार नाही.

फुल्ल केवयसी FASTag अकाऊंट धारकांसाठी वॅलेटवरील रक्कम ही १ लाख रुपयापेक्षा जास्त असू शकत नाही. पण, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या नियमानुसार या अकाऊंटला रीलोड कॅपिंग नाहीये.

 

fasttag Recharge InMarathi

सगळ्यात महत्वाची सूचना जर तुमच्याकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाहने असतील, तर दोन्ही वाहनासाठी एकच FASTag चालणार नाही. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाहनांसाठी वेगवेगळी FASTag घ्यावी लागतील.

इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार, “तुम्ही जर एखाद्या टोलनाक्यापासून १० किमीच्या आसपासच्या परिसरात रहात असाल तर, तुम्ही FASTag द्वारा जो टोल भरणार आहात त्यामध्ये सवलत मिळू शकते.

यासाठी तुम्हाला बँकेत तुमचे रेसिडेन्सी प्रुफ जमा करावे लागेल. ज्यावरून तुमचे रेसिडेन्स हा त्या टोलनाक्यापासून १० किमी च्या परिसरात आहे हे सिद्ध होईल. तुमचा पत्ता एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या टोलमध्ये विशेष सवलत मिळू शकते.



===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?