नवीन वर्षाचे संकल्प अयशस्वी का होतात? जाणून घ्या, त्यावर मात करण्याच्या टिप्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चालू वर्ष संपून नवीन वर्ष सुरु होण्यास अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. तुम्ही देखील हे वर्ष सुरु होण्यापूर्वी काही संकल्प केलेच असतील. तर आत्ता वेळ आलेली आहे, तो संकल्प किती प्रमाणात पूर्ण झाला याचा हिशोब मांडण्याची.
बघा, काही ताळमेळ लागतो का? झालेत का तुमचे संकल्प पूर्ण? काय म्हणता तुम्ही प्रयत्न करूनही हे संकल्प अर्ध्यातच सुटले? कसं काय?
खरंतर संकल्प अर्ध्यावर सोडून देणारी किंवा संकल्प तडीस जातच नाही अशी तक्रार करणारी अनेक माणसं आपल्याला अवतीभोवती सापडतील आणि यावर्षीचा माझा संकल्प पूर्ण झाला म्हणून आनंदाने उड्या मारणारे पण सापडतील.
पण, दुसऱ्या प्रकारची लोकं खूप कमी असतात. म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच..! पण, पहिल्या प्रकारात तर आपल्यापैकी पण बरेच जण असतील.. ! खरे तर संकल्प पूर्ण का होत नाही याबाबत मानसशास्त्रज्ञांनी काही ठोस संशोधन केल्यानंतर त्यांच्या हाती जे निष्कर्ष आले त्यावर त्यांनी यामागचा एक ठोकताळा मांडला आहे.
या अभ्यासानुसार बहुतांश लोकांचे संकल्प हे अर्ध्यातच तुटतात. फक्त ८% लोक असे आहेत ज्यांचे संकल्प वर्षभर टिकतात आणि त्यांचा संकल्प पूर्ण करण्यात ते यशस्वी होतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जाणून घेऊया, काही लोकांचे रिझोल्यूशन्स पूर्ण का होत नाहीत? काय असावे यामागचे मानसशास्त्रीय कारण आणि यावर कोणता उपाय केला तर ते देखील वरच्या ८% लोकांमध्ये स्थान मिळवू शकतात.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्यातील वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा संकल्प बरेच जण करतात. अशा संकल्पामध्ये कधी त्यांची छोटी स्वप्नं दडलेली असतात.
जर ती पूर्ण झाली तर त्यांना पुढच्या टप्प्यावर जाणे सुलभ होतं. आयुष्यातील मोठ्या स्वप्नांकडे झेप घ्यायची उमेद वाढते. पण, जर हे संकल्प, ही स्वप्ने अर्धवट राहिली तर मात्र निराशा येते. अशा निराशेच्या डोहात गटांगळ्या खाण्याऐवजी हे संकल्प पूर्ण करून आपल्याला मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करायला आवडेल नाही का?
१. आवाक्याबाहेरचे संकल्प करू नका

नववर्षाचा संकल्प करताना आपण बरेचदा आवाक्याबाहेरच्या गोष्टी निवडतो किंवा आपल्या मनात आपली जी एक प्रतिमा असते तिच्याशी निगडीत हा संकल्प निश्चित करतो. पण, वास्तव काहीतरी वेगळंच असतं. खरं तर यामुळे लवकरच ताण निर्माण होतो आणि मग आपण त्या संकल्पापासून दूर जाऊ लागतो.
मानसशास्त्राचे प्राध्यापक असणारे पीटर हर्मन आणि त्यांच्या सहकार्यांच्या मते, हे संकल्प मुख्यत्वे “चुकीच्या आशेवर” ठरवले जातात. हे संकल्प मूलतः अवास्तव असतात आणि स्वतःबद्दलच्या अंतर्गत मतांनी हे संकल्प ठरवले जातात.
अशा प्रकारे अवास्तव संकल्प तुम्हाला पुन्हा तुमचे जुनेच रुटीन आयुष्य जगण्यास भाग पडतात.
म्हणून संकल्प करताना आपण आवाक्यातील गोष्टींचा, छोट्या गोष्टींचा करावा म्हणजे त्या वेळेत पूर्ण झाल्यास आपल्याला प्रेरणा मिळते. आवाक्याबाहेरच्या गोष्टींच्या मागे लागल्यास त्यातून निराशाच हाती लागण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे वजन कमी करायचं आहे तर, थोड्या कालावधीत थोडे वजन कमी करेन असा निश्चय करा. बँक बॅलन्स वाढवायचा आहे तर, एका महिन्यात किती रक्कम बचत करू शकाल त्यावरून वर्षभराचा आकडा निश्चित करा, जो तुमच्या आवाक्यातला असेल.
२. प्रेरणेचा स्त्रोत स्वतःमध्ये शोधा
–
- नव्या वर्षाच्या सुरुवातीला ‘व्हायरल’ होणाऱ्या या आहेत जगभरातील १७ अंधश्रद्धा!
- वजन कमी करण्याचं ‘न्यू ईयर रिझॉल्यूशन’ कधी पूर्ण का होत नाही? जाणून घ्या
–
बऱ्याचदा छोट्या छोट्या कारणावरून आपण नाराज होतो आणि कोणताही बदल करण्याची आपली इच्छा नाहीशी होते. संकल्प पूर्ण करण्यासाठी ही प्रेरणा कायम टिकून राहणे महत्त्वाचे आहे.
आपण सवयीचे गुलाम असतो, एका दिवसात आपल्या सवयी पूर्णतः बदलणे अशक्य आहे. म्हणून सवयी बदलण्यासाठी स्टेप बाय स्टेप पावलं उचला. एका उडीत तुमच्यात पूर्ण बदल होणार नाही.
प्रेरणा गमावल्यास आपण नाराज होतो आणि जुन्या सवयींनाच पुन्हा चिकटतो. अर्थात, हे आपली मानसिकता किंवा इच्छाशक्ती कमी आहे म्हणून होतं असं नाही तर, आपल्या मेंदूला आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना एका विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया देण्याची सवय झालेली असते. त्यामुळे आपण प्रेरणा गमावून बसतो,
जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो किंवा स्ट्रेस जाणवतो तेव्हा मेंदू नव्या सूचना न स्वीकारता त्याला सवयीची असलेली जुनीच सूचना अमलात आणतो अशाने आपल्या सवयीत होणारे बदल रिव्हर्स मोडवर जातात. एखादा संकल्प पूर्ण करायचाच असेल तर त्यासाठी आपल्या प्रेरणेचा स्त्रोत स्वतःमध्ये शोधा.
उदा, जी सवय सोडायची आहे त्यामागची कारणं शोधा. इतरांच्या सांगण्यावरून ती सवय सोडायचा अट्टहास करू नका. स्वतःसाठी ती सवय सोडा.
३. अचूक नियोजन

अचून नियोजनाचा अभाव हे आणखी एक कारण आहे ज्यामुळे संकल्प अपूर्ण राहू शकतात. अनेक लोकांकडे संकल्प असतात, रिझोल्यूशन्स असतात पण त्यासाठीचे अचूक नियोजन किंवा प्लॅनिंग नसतं. आपण जो संकल्प केला आहे त्यासाठी नियोजन सुद्धा तयार हवं. ते जर आपल्याकडे नसेल तर, तो संकल्प पूर्ण होणार नाही.
आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे त्या गोष्टीसाठी इतर कोणत्या गोष्टींची गरज आहे हे आपण ओळखलं पाहिजे. त्याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, कोणत्या नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. याशिवाय वेळेचं अचूक नियोजन सुद्धा महत्त्वाचं आहे. ते नसेल तर, कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही.
त्यामुळे, तुम्हांला जे ध्येय गाठायचं आहे, ते आपण कसं गाठणार आहोत याचा लेखाजोगा तयार करून ठेवा.
४. नकारात्मक दृष्टीकोन टाळा

–
- भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने नवीन वर्षाचे हे ७ संकल्प केले तर भारताचं चित्र वेगळं असेल!
- भारतातल्या राजकारणी बाबूंनी नवीन वर्षाचे हे संकल्प घेतले तर भारतीय त्यांचे मनापासून आभार मानतील
–
अनेकदा आपले संकल्प पूर्ण न होण्यास आपला दृष्टीकोन कारणीभूत असतो. काही गोष्टींची आपल्याला खूप सवय असते आणि या गोष्टींची सवय सुटणे तशी सोपी गोष्ट अजिबात नाही.
पण, आपण कायम अंतिम ध्येयाचा विचार करतो. कधी कधी आपल्याला संख्यात्मक परिणाम हवा असतो. अपेक्षेनुसार यश मिळत नाही असे जाणवले तरी, आपण स्वतःला दोष देण्यास सुरुवात करतो.
आपल्याला हे जमणारच नाही, हे आपल्या आवाक्यातील काम नाही, हे अशक्य आहे, अवघड आहे अशा नकारात्मक भावना आपल्या मनात तयार होतात ज्यामुळे आपला त्रास आणखीन वाढतो.
अशावेळी सतत स्वतःला दोष देण्याऐवजी कधी कधी झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून पुन्हा अशी चूक होणार नाही असा निश्चय करून कामाला लागा.
५. आहे त्या साधनांवर काम सुरु करा.

वजन कमी करायचे आहे, त्यासाठी कितीतरी व्यायामप्रकार तुम्हाला तुमच्या ट्रेनरनी शिकवले असतील. पण, ते व्यायाम करण्याऐवजी तुम्ही जर व्यायामासाठी लागणारे गॅझेट घेतली तर, तुम्ही तात्पुरते स्वतःवर खुश व्हाल की, मी हे काम पूर्ण केले. ज्यामुळे वास्तवात व्यायाम करण्याच्या प्रेरणेपासून तुम्ही दूर जाऊ शकता. कारण व्यायाम केल्याच्या आनंदापेक्षा त्यासाठी लागणारे गॅझेट घेतल्याचा आनंद जास्त आहे.
म्हणून फक्त साधनांची आणि वस्तींची गर्दी किंवा अडगळ जमवण्यापेक्षा आहे त्या साधनांवरच समाधान मानून आधी वास्तविक कामाला सुरुवात करा. त्यात थोडेसे यश मिळाल्यानंतर वाटल्यास स्वतःला बक्षीस म्हणून अशा एखाद्या आवश्यक वस्तूची खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची प्रेरणा आणि इच्छा टिकून राहील.
आता या येत्या वर्षात नवीन संकल्प तर कराच पण, “काहीही झालं तरी माझा संकल्प मी अर्ध्यात सोडणार नाही!”, असा संकल्प आधी करा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.