“तान्हाजी” वरील वादावर एकच प्रश्न : कोण म्हणतो शिवाजी महाराज “हिंदू राजा” नव्हते?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: आदित्य शेखर कुलकर्णी.
===
काल तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. काल शरद केळकरच्या महाराजांच्या गुणगौरवाचा व्हिडीओही व्हायरल झाला. कालच ब्रिगेडकडून चित्रपटात महाराजांची ‘निधर्मी’ प्रतिमा पुसून ‘हिंदू राजा’ अधोरेखित केल्याबद्दल ओम राऊतांना पत्र पाठवण्यात आले.
आज गाझापट्टीच्या आमदाराने ओम राऊतांना ट्विटरवर उघड धमकी दिली. फक्त टायमिंग बघा. रिलीज होण्याआधी चित्रपटाबद्दल असे वाद – विवाद झाले की प्रेक्षकांच्या संख्येत दुपटीने- चौपटीने वाढ होते.
या प्रेक्षकांचे तीन प्रकार. नवा चित्रपट रिलीज झाल्यावर बघायला जाणारे, टीका झाल्यामुळे नेमकं दाखवलंय तरी काय म्हणून उत्सुकतेपोटी बघणारे आणि शेवटी येतात टीका अधिकाधिक मुद्देसूद व्हावी यासाठी जाणारे.
शेवटी निष्कर्ष इतकाच निघतो की या सगळ्याचा उद्देश लोकांमध्ये चित्रपटाची अधिकाधिक चर्चा व्हावी (चांगली असो किंवा वाईट) इतकाच असतो.
ऑस्कर वाईल्डचं जगप्रसिद्ध कोटेशन आहे. ” The only thing worse than being talked about is not being talked about.”
निर्मात्याचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाचे विविध हक्क विकून निम्माअधिक खर्च वसूल झालेला असतो. राहिलेला खर्च आणि वरचा फायदा असल्या गोष्टी करून वसुल केला जातो.
आता राहिला प्रश्न वादाचा तर स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची इतकी वाईट अवहेलना मराठी माणसाशिवाय दुसरं कोणी करूच शकणार नाही.
अब्दालीबद्दल नुसतं एक वाक्य लिहिलं गेलं तर अफगाणिस्तानमधून सांगावे आले. ” शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’ हे अभिमानाने सांगणाऱ्या लोकांची तोंडं महाराज ‘गोब्राम्हणप्रतिपालक’ होते हे सांगायला लागल्यावर का शिवली जातात ?
१. शिवप्रभूंनी नेताजी पालकरांचं धर्मांतर करून त्यांना कोणत्या धर्मात घेतलं?
हिंदू.
२. स्वराज्याची शपथ कोणत्या देवळात घेतली ?
रायरेश्वराच्या. (हिंदू)
३. राज्याभिषेक कोणत्या पद्धतीने केला?
हिंदू + शाक्त (दोन्ही हिंदूच).
४. लढण्याच्या वेळी गर्जना कोणती होती ?
हर हर महादेव . ( हिंदूच )
५. महाराज कोणाविरुद्ध लढले ?
निजामशाही, मुघलशाही, आदिलशाही.
एवढं सगळं वाचल्यावरही ज्यांना महाराज हिंदू राजा होते याबद्दल शंका वाटत असेल त्यांनी स्वतःची डीएनए टेस्ट करून घ्यावी. रक्त दूषित असल्याशिवाय पूर्वजांच्या दैदिप्यमान कर्तृत्वावर प्रश्न उठवण्याचं पाप होत नाही .
जय महाराष्ट्र!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.