Site icon InMarathi

या १३ गोष्टी खा आणि दाट केस मिळवा – टक्कल टाळा! कसं ते जाणून घ्या

bala hindi movie inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दाट केस हे सौंदर्याचे लक्षण आहे. पण, वाढत्या वयानुसार आणि इतर काही गोष्टींचा परिणाम म्हणून ही कधी कधी अचानक केस खूपच गळू लागतात, विरळ होतात. अशावेळी केसावर बाहेरून आणखी काही केमिकल्सचा मारा केल्यास केस रुक्ष देखील होतात आणि तुटतात.

खरे तर लांब आणि दाट केसांचं रहस्य हे निरोगी शरीरात असतं. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक जर शरीरात तयार होत नसतील तर, केसांची गळती रोखणे मुश्कील आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

म्हणून केसांसाठी अमुक एक शाम्पू, तमुक तेल, किंवा आणखी कुठलाही वेगळा प्रयोग करण्याऐवजी तुमच्या आहारातच जर या काही घटकांचा समावेश केला तर, त्याचा तुमच्या केसांच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येईल.

१. अंडी

अंड्या मध्ये प्रथिनांचे आणि बायोटीनचे प्रमाण भरपूर असते. अंड्यातील या दोन्ही घटकांमुळे केसांचे मुळापासून पोषण होते. केसांच्या वाढीसाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असणे खूप आवश्यक आहे.

केसांवरील फॉलीकल्सचा थर हा प्रामुख्याने प्रोटीन्स पासूनच बनलेला असतो. अंड्यामध्ये झिंक, सेलेनियम आणि इतर पोषक घटक देखील मुबलक प्रमाणात असतात. म्हणून केसांच्या आरोग्यासाठी अंडी खाणे फायद्याचे ठरते.

 

 

२. बोर किंवा स्ट्रोबेरी

बोरं किंवा स्ट्रोबेरी सारख्या फळांमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. यामुळे केसांच्या फॉलीकल्सचे संरक्षण होते आणि केस तुटत नाहीत. क जीवनसत्व आहारातील लोह शरीरात शोषून घेण्यास मदत करते.

लोहाच्या कमतरतेमुळे केस गळतात, त्यामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात लोह राहिल्यास केस गळणार नाहीत. लोहाचे प्रमाण कमी झाल्यास अॅनेमिया होऊ शकतो, ज्यामुळे पुन्हा केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते.

 

 

३. पालक

आरोग्याला अत्यंत पोषक असणारी हिरवी पालेभाजी म्हणजे पालक. यामध्ये लोह, अ आणि क जीवनसत्व, यांचे प्रमाण जास्त असते, जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. अ जीवनसत्वामुळे डोक्याच्या त्वचेतील आर्द्रता टिकून राहते.

तसेच मुबलक प्रमाणात लोह असल्याने शरीराला आवश्यक असलेली लोहाची मात्रा देखील यातून मिळते. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे, लोहाची कमतरता ही केस गळतीचे कारण असू शकते.

 

 

४. मासे

सालमन, हेरिंग आणि मॅकरेल सारखे माशांचा आहारात समावेश असावा. यामुळे केसांची वाढ चांगली होते, आणि केस निरोगी राहतात. मासे हे ओमेगा-३ सारख्या फॅटी अॅसिडचे उत्तम स्त्रोत असतात, जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते.

ओमेगा-३ आणि ओमेगा-६ सारख्या फॅटी अॅसिडमुळे केसांची गळती थांबून केस दाट होतात. मासे हे प्रथिने, सेलेनीयम, ड३ जीवनसत्व आणि ब जीवनसत्वाचे चांगले स्त्रोत असतात. हे सर्व पोषक घटक केसांच्या वाढीला मदत करतात आणि केसांची गळती थांबवतात.

 

 

५. रताळी

रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते. शरीरात या घटकाचे रुपांतर अ जीवनसत्वात होते. अ जीवनसत्व सीबमच्या वाढीसाठी पोषक असते, ज्यामुळे डोक्याची त्वचा निरोगी राहते. डोक्यात कोंडा होत नाही.

अ जीवनसत्व केसांच्या वाढीला गती देते ज्यामुळे विरळ केस दाट होतात आणि केसांची वाढही चांगली होते. एका मध्यम आकाराच्या रताळ्यापासून दररोज आवश्यक असलेल्या अ जीवनसत्वाच्या मात्रेपेक्षा चारपट जास्त अ जीवनसत्व मिळते.

 

 

६. अवोकॅडो

अवोकॅडो हे एक पेरुसारखे चविष्ट फळ आहे. जे फॅट्सचे एक उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये इ जीवनसत्वाचे प्रमाणदेखील जास्त असते. क आणि इ जीवनसत्वामुळे शरीरातील ऑक्सिडंटचे प्रमाण वाढते. आवश्यक त्या फॅटी-अॅसिडचे प्रमाण वाढल्याने केसांची गळती थांबून केस दाट होण्यास सुरुवात होते.

एका मध्यम आकाराच्या अवोकॅडोपासून २१% इ जीवनसत्व मिळू शकते. इ जीवनसत्व केसांच्या वाढीसाठी खूपच मदत करते, तसेच डोक्याची त्वचादेखील सुधारते, केस चांगले दाट आणि चमकदार बनतात.

 

 

७. सुकामेवा

सुकामेवा चवीला तर चांगला लागतोच पण त्याचे आरोग्याला होणारे फायदे देखील खूप आहे. सुक्यामेव्यामुळे केसांची वाढ नीट होते, केस दाट होतात.

फक्त एक पौंडजरी बदाम दिवसभरात खाल्ले तरी दररोज शरीराला आवश्यक असणाऱ्या इ जीवनसत्वाची भरपाई होते. शिवाय, झिंक, ब जीवनसत्व यांची देखील पूर्तता होते. या सगळ्यांची कमतरता केस गळतीला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे तुमच्या नेहमीच्या आहारात सुक्यामेवाचा समावेश असायला हवा.

 

 

८. बिया

बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोषणद्रव्ये असतात. अनेक बिया इ जीवनसत्व, झिंक आणि सेलेनीयमने भरपुर असतात. उदा. सूर्यफुलाच्या बिया दररोज गरजेची असलेल्या प्रमाणापैकी ५०% इ जीवनसत्वाची पूर्तता करतात.

फ्लॅक्ससीड्स ओमेगा-३ ची कमी भरून काढतात. या सगळ्या आवश्यक घटकांची कमी भरून काढण्यासाठी सुर्यफुल, फ्लॅक्स आणि शिया अशा मिक्स बियांचा आहारात समावेश करावा.

 

 

९. गोड मिरची

गोड मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असते ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. एका पिवळ्या मिरचीत एका संत्र्याच्या पाचपट क जीवनसत्व आढळते. क जीवनसत्वामुळे कोलॅजेनची निर्मिती होते जी केस मजबूत करण्यास हातभार लावते. गोड मिरचीमध्ये अ जीवनसत्व देखील भरपूर प्रमाणात असते.

 

 

१०. ऑयस्टर

ऑयस्टरमध्ये मुबलक प्रमाणत झिंक आढळते. झिंक केसांच्या वाढीला गती देते आणि केसांची झालेली झीज भरून काढते. शरीरात झिंकची कमतरता असेल तर, केस गळण्याचे प्रमाण वाढते. तसेच झिंकचे प्रमाण जास्त झाले तरी देखील केसांची गळू शकतात.

म्हणून झिंकचे सप्लीमेंट घेण्यापेक्षा ऑयस्टर सारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यातून योग्य त्या प्रमाणात शरीराला झिंकची मात्रा मिळू शकेल.

 

 

११. कोळंबी

कोळंबीमध्ये मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्व, झिंक, लोह आणि ड जीवनसत्व देखील असते. ड३ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे देखील केसांची गळती होते.

कोळंबीमध्ये ड३ आणि ओमेगा३ भरपूर प्रमाणात असल्याने केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी कोळंबी देखील उपयुक्त ठरते.

 

 

१२. कडधान्ये

कडधान्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. कडधान्ये ही झिंकचा एक उत्तम स्त्रोत असतात ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

तसेच, लोह, बायोटीन आणि फोलेट सारखे पोषक घटक देखील कादाधान्यांमधून मिळतात. ज्यामुळे केसांचे आरोग्य टिकून राहते.

कडधान्यांचा आपण अनेक प्रकारें आहारात समावेश करू शकतो. तसेच, सहज उपलब्ध होत असल्याने आहारात याचा समावेश करणे शक्य आहे.

 

 

१३. सोयाबीन

सोयाबीनचा आहारात समावेश केल्यास केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या मजबुतीसाठी चांगला फायदा होऊ शकतो. सोयाबीनमध्ये स्पेरमीडाईन नावाचा घटक मुबलक प्रमाणात असतो.

स्पेरमीडाईनमुळे केसांच्या वाढीची प्रक्रिया दीर्घकाळ सुरु राहते. त्यामुळे केस दाट होण्यास याची खूप मदत होते.

 

 

तर मित्रांनो – हे पदार्थ शिस्तशीरपणे, काळजीपूर्वक आपल्या आहारात समाविष्ट करा आणि टक्कल टाळा…!

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version