' भारतीय तिरंगा विरुद्ध अॅमेझॉन – via सुषमा स्वराज – InMarathi

भारतीय तिरंगा विरुद्ध अॅमेझॉन – via सुषमा स्वराज

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतीय राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि असामान्य वक्तृत्वाचं, नेतृत्वाचं वरदान लाभलेल्या मा. सुषमा स्वराज याचं काल रात्री दुखःद निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाचे कधीच भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

विरोधी पक्षात असतानाही कधीही पटली न सोडता सत्ताधारी पक्षाला आपल्या वक्तृत्वाच्या बळावर चीतपट करण्याचा त्यांचा वकूब अनन्यसाधारण होता.

फक्त एक राजकारणीच नव्हे तर उत्कृष्ठ संसदपटू म्हणुन त्यांची कारकीर्द कायम स्मरणात ठेवण्याजोगी आहे.

 

sushma-swaraj_marathipizza
india.com

एनडीए सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या काळात परराष्ट्रमंत्री म्हणुन त्यांनी काम पाहिले. या काळात परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत घेतल्या गेलेल्या अनेक निर्णयांनी भारतीय परराष्ट्र धोरणावर अमिट ठसा उमटवला आहे.

त्यांच्या कार्यकाळात अनेक घटना अशा होत्या की त्यातून त्यांच्या राष्ट्रभक्तीची आणि मुत्सद्देगिरीची चुणूक दिसली, त्यापैकी हि एक उल्लेखनीय घटना…

केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजजींकडे अनेकजण बघत असत.

ट्विटरचा वापर करून शेकडो भारतीयांच्या अडचणी सोडवून, ऑनलाईन विश्वातील active netizens मध्ये देखील सुषमा स्वराज लोकप्रिय होत्या. जागतिक ईकॉमर्स मधील महाकाय Amazon शी सुरू केलेल्या युद्धामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

युद्धाचं कारण होतं, भारतीय तिरंग्याचा amazon कडून झालेला अपमान.

झालं असं की amazon च्या वेबसाईटवर, भारतीय तिरंगा असलेलं पायपुसणं विक्रीस होतं.

 

Sushma-Swaraj indian flag sale marathipizza

स्रोत

एका ट्विटर युजरने सुषमाजींना ही बातमी ट्विट द्वारे कळवली आणि त्यावर सुषमा जींनी त्वरित प्रतिसाद देत –

Amazon ने बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांच्या कुठल्याही कर्मचाऱ्यास भारतात VISA मिळणार नाही

अशी ट्विट केली.

Sushma Swaraj - Amazon Twitter marathipizza

सदर प्रकरणावर, कौस्तुभ इटकूरकर ह्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वर चपखल भाष्य केलं होतं.

===

तिरंग्याच्या डिजाईनच्या पायपुसण्या विकणाऱ्या ऍमेझॉनला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कानपिचक्या दिल्याची बातमी आहे. (हा तिरंगा amazon च्या कॅनडा वेबसाईटवर विक्रीस उपलब्ध होता. आता त्यांनी तो काढून घेतला आहे.) अगदीच व्हिसा वगैरे नाकारण्याची धमकी देणे आश्चर्यकारक आहे. प्रामाणिक संताप किंवा लोकप्रिय मतप्रदर्शन करणे समजण्यासारखे असले तरी एका मंत्र्याने एका कंपनीला असे धमकावणे थोडे जास्त झाले.

पण ह्यात एक दुसरा angle आहे.

Amazon ही अमेरिकन कंपनी आहे. आणि ह्या वस्तू ऍमेझॉन कॅनडा वर विक्रीस होत्या. तिकडे कलात्मक आणि सूचक पायपुसण्या वापरण्याची पद्धत आहे. लोक स्वतःच्या कुटुंबाचे आडनाव लिहिलेल्या पायपुसण्या आवर्जून वापरतात. तसेच त्यांचा झेंडा किंवा राष्ट्रीय प्रतीके असलेल्या पायपुसण्या वापरणेही गैर समजत नाहीत. एवढेच काय तर धार्मिक मजकूर किंवा चित्रे असलेल्या पायपुसण्याही आवर्जून वापरल्या जातात.

 

american flag on sale at amazon marathipizza

 

Christian doormats असे गुगल करून पाहा विश्वास नसेल तर. त्या घरात तशा थीमचे वातावरण आहे असा साधारण अर्थ त्यांना अपेक्षित असतो.

भारतात मात्र पायपुसणे ह्या वस्तूला हलके समजले जाते. आपली भाषा आणि संस्कृती ह्याच पद्धतीने तयार झाली आहे.

शिवाय ‘पाय’ ह्या अवयवाचा संदर्भ आपल्याकडे अगदीच अपमानकारक किंवा कमीपणाचा असल्याने अजूनच अडचण. एकूण पायपुसण्याच्या थीमला समजून घेण्याचे वातावरण आपल्याकडे अजिबातच नाही. तिकडे 4th July थीमचे सॉक्स मिळतात. आपल्याकडे सॉक्सवर झेंडा अजिबात आवडणार नाही किंवा सहनही होणार नाही.

अशी ढीगभर उदाहरणे अगदी केक पासून अंतर्वस्त्रांपर्यंत देता येतील.

सांगायचा मुद्दा हा cultural sensibilities मधील फरकाचा आहे. अमेझॉनचा हेतू भारताच्या झेंड्याचा अवमान करण्याचा खचितच नसेल. पण त्यांना हा फरक कळायला हवा होता. ज्या देशात व्यवसाय करायचा तिथल्या स्थानिक संस्कृतीचा माफक अभ्यास असणे जागतिकीकरणात अगदीच आवश्यक झाले आहे. ह्याचे हे उदाहरण म्हणजे उत्तम नमुना आहे.

MBA च्या पोरांना ह्याची case-study शिकवली पाहिजे. शिकण्यासारखा धडा आहे.

===

अमेझॉनने केलेल्या या अग्लीकीवर सुषमा स्वराज यांनी त्वरित केलेली कारवाई त्यांच्या राष्ट्रभक्तीचे उत्तम उदाहरण म्हणुन स्मरणात राहील. अशा या मुत्सद्दी नेतृत्वास भावपुर्ण श्रद्धांजली!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?