वर्तमान राजकीय गोंधळावर फर्मास टिपणी करणारे ‘हे’ व्हायरल व्हिडीओज खळखळून हसवतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या राजकारणात नक्की काय होईल असं प्रेडिक्शन देखील कोणी करू शकत नाही. काहीपण कधीपण कसं पण बदलू शकतं. त्यातले त्यात आपल्या महाराष्ट्राचं राजकारण तर जरा जास्तच गुंतागुंतीचे झाले आहे. यावेळेसच्या विधानसभेच्या निवडणुकीत जे काही घडत आहे, ते थोडं नवीन आणि अनपेक्षितच आहे.
शिवसेनेने भाजप बरोबर सत्ता भागीदारीच्या प्रश्नावर घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे निवडणुकीचा अगदी एकहाती निर्णय लागून देखीलविचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
बरेच जण काही वेगळेच अंदाज बांधत असताना घडलं काहीतरी वेगळंच.
त्यात जवळ जवळ बुडालेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस याने ज्या पद्धतीने उभारी धरली ती खरच अनपेक्षित होती. सध्याच्या लढतीत सगळे अगदी बरोबरीचे दिसत आहेत.
पण आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे काही या तिन्ही पक्षांना ठरवता आले नाही. त्यामुळे सत्ता राष्ट्रपती राजवटीत गेली आहे.
आता पुढचे सहा महिने तिन्ही पक्षांना वेळ दिला आहे, त्यात त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवायचं आहे. तरीही जर ठरवता आलं नाही तर पुन्हा निवडणूक घेण्यात येईल.
खरं तर हि सध्याची राजकारणाची परिस्थिती चिंताजनक आहे आहे. पण सोशलमिडीया या सगळ्या गोंधळाची मजा घेताना दिसते आहे.
आपल्या सर्वांच्याच फोन वर सध्या मिम्स, व्हिडिओज अश्या बऱ्याच विनोदी गोष्टी आपल्याला पहायला मिळत आहेत, ज्या खरच खूप हसायला लावतात. असे काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
१. आपण संगीत खुर्ची हा खेळ लहानपणी पासून खेळत आहोत. पण आता उच्च स्तरावर म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची साठी देखील असंच काही चालु असल्याचं दिसत आहे. यावर एक मस्त व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहे.
त्यात ना दोन जण असे खुर्ची भोवती, जाउ द्या – तुम्हीच बघा काय करतायेत ते…
२. मध्यंतरी जेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यात यांच्यातील युतीच सत्ता स्थापन करेल अशी चर्चा होती तेव्हा त्या दोघांमध्ये तुम्ही आधीच वर्ष करा आम्ही अडीच वर्ष करतो असा देखील मुद्दा उद्भवला होता.
त्यावर एक व्हिडिओ आला होता जो चांगल्या प्रकारे व्हायरल झाला.
३. काल परवा जेव्हा शिवसेना युतीमध्ये सत्ता स्थापन करणार अशी बातमी होती. तेव्हा शिवसेनेचे सगळे लोक खूप खुश होते. मग सध्या शिवसेनेच्या लोकांची मनस्थिती काय असेल हे दाखवणारा व्हिडिओ सर्वत्र पसरला.
नक्की बघा तो लहान मुलगा कसला भारी नाचतोय.
४. त्यानंतर अशी परिस्थिती सध्या आली आहे कि, राष्ट्रपती राजवट लागली. सगळेच खूप खुश असतात आणि अचानक असं काहीतरी होत कि सगळ्यांचा मूड जातो. तसच आपल्या राजकारण्यांबरोबर झालं आहे.
ते या व्हिडिओमध्ये अगदी सुंदर रित्या दाखवलं आहे.
५. हा व्हिडिओ तर नक्कीच बघा यात एकूण सगळीच परिस्थिती मांडली आहे.
आज काल सोशल मिडियामुळे हि एक गोष्ट चांगली झाली आहे कि आपल्या समस्या किवा आपलं मत हे अश्या विनोदी स्वरुपात देखील मांडता येत आहे. यामुळे देखील जागृती होऊ शकते, कारण आपले राजकारणी लोक देखील सोशल मिडियाचा वापर करतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.