Site icon InMarathi

नोव्हेंबरमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? ह्या २३ ठिकाणांचा नक्की विचार करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जबाबदारी पेलताना आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या मागे धावत असताना आजकाल लोकांना इतरांसाठी तर सोडाच पण, स्वतःसाठी देखील वेळ मिळत नाहीये. वस्तुतः आनंदी आयुष्य जगण्यासाठी स्वतःसोबतच आपल्या नातेवाईकांसाठी, घराच्या सदस्यांसाठी आणि मित्रपरीवारासाठी देखील थोडा वेळ बाजूला काढायला हवा.

आता हा वेळ कसा काढायचा हा विचार करत असाल तर, या नोव्हेंबरमध्ये तुमच्या परिवारासोबत एक छोटीशी ट्रीप प्लॅन करू शकता. घरापासून दूर आणि रम्य ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास तुमचा मूडही फ्रेश होईल आणि घरच्यांच्या देखील. या नोव्हेंबरमध्ये तुम्ही जर ट्रीपला जायचा विचार करत असाल तर भारतातील या काही सुंदर ठिकाणांचा विचार करायला हरकत नाही.

१. उज्जैन, मध्यप्रदेश

उज्जैन हे भक्ती आणि प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते. इथे शिप्रा नदीच्या काठावर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि अनेक छोटी-छोटी मंदिरे आहेत. येथील हरसिद्धी मंदिर फारच प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही जुन्या वेध शाळा पाहू शकता, तसेच भारतीय पारंपारिक साड्यांची खरेदी करण्यास देखील हे के चांगले ठिकाण आहे.

 

mptourism.com

२. वर्कला, केरळ

नोव्हेंबर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर ठीकाण आहे, केरळ मधील वर्कला. येथे वर्कला किनारा, शिवगिरी मठ, थिरूवमबाडी किनारा, थीरुवमबडी किनारा, विष्णू मंदिर आणि अंजेंगो किल्ला पाहण्यासारखा आहे. शिवाय केळीच्या पानावर जेवण्याचा आनंदही लुटता येईल. येथील किनाऱ्यावरील शांतता अनुभवण्यासारखी आहे.

 

Thrillophilia

३. सांची, मध्यप्रदेश

बौद्ध कलेचे प्रतिक असलेले सांची स्तूप तर जगप्रसिद्ध आहे. फोटोग्राफीचा छंद असणाऱ्यासाठी तर हे एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल. येथे ग्रेट स्तूप, अशोक स्तंभ, उदयगिरीच्या गुहा गुप्त मंदिर आणि सांची संग्रहालय ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

 

bbrservices.in

४. वायनाड, केरळ

जंगल, वाईल्ड लाइफ आणि डोंगररांगा यांनी समृद्ध असणारे हे ठिकाण एक विलोभनीय स्थळ आहे. चेम्बरा शिखर, एडक्कल गुहा, वायनाड अभयारण्य, थिरूनेली मंदिर अशी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. कॉफीचे मळे आणि एडक्कल गुहांमधून हत्तीच्या सफारीचा आनंद लुटू शकता.

 

Sanchi InMarathi

५. हम्पी, कर्नाटक

युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसास्थळांपैकी एक. येथे पुरातत्वीय संग्रहालय, विजया विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, हम्पी बाजार अशी अनेक पाहण्यायोग्य ठिकाणे आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात येथे विजया महोत्सव असतो, येथे संपूर्ण शहर दिव्यांच्या रोषणाईने सजलेले असते, बोलक्या बाहुल्यांचा खेळ, सोबत संगीत आणि नृत्याची रेलचेल असते, ज्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

 

YouTube

६. दिल्ली

नोव्हेंबरमध्ये होणारे तीन दिवसीय वार्षिक कुतुब महोत्सव हे इथले खास आकर्षण असते. हुमांयू का मकबरा, कुतुब मिबर, अक्षरधाम मंदिर, लाल किल्ला, इंडिया गेट, कमल मंदिर, चांदणी चौक अशी अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. फ्ली मार्केट मधील खरेदी आणि निझामुद्दीन दर्ग्यात होणाऱ्या कव्वालीचा आनंद लुटू शकता.

 

travelguru.com

७. कुर्ग, कर्नाटक

कुर्गला भारतातील स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते. नोव्हेंबरमध्ये भेट देण्यास अतिशय योग्य ठिकाण. येथे नामेद्रोलिंग मठ, अब्बी फॉल्स, ब्रह्मगिरी, अशी कितीतरी निसर्गरम्य ठिकाणे आहेत, जे तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जातील. सोबतच इथे तुम्ही, रिव्हर राफ्टींग, जीप सफारी, हायकिंग, ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण सारख्या अड्व्हेंचर गेम्सचा आणि आयुर्वेद मसाजचा आनंद घेऊ शकता.

 

traveltriangle.com

८. अमृतसर, पंजाब

नोव्हेंबर मध्ये येणाऱ्या गुरुनानक गुरुपुरबचे औचित्य साधून स्वर्ण मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण रोषणाई केली जाते आणि हा परिसर फुलांनी सजवला जातो. हे सुंदर दृश्य अक्षरश: डोळ्याचे पारणे फेडणारे असते. इथे स्वर्ण मंदिर, जालियानवाला बाग, महाराजा रणजीत सिंह यांचा महाल अशी अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊ शकता. अमृतसरचे नान आणि राजस्थानी जुती तसेच कुर्ते हे येथील खास आकर्षण आहेत.

 

holidify.com

९. भरतपूर, राजस्थान

नोव्हेंबरच्या दिवसात भेट देण्यासाठी आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे राजस्थान मधील भरतपूर. केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध अभयारण्य देखील याच परिसरात आहे. पक्षी निरीक्षणासोबतच प्राचीन किल्ल्यांवर देखील फेरफटका मारू शकता. पक्षी निरीक्षण आणि किल्ल्याच्या भेटी दरम्यान कॅमेरा असल्यास उत्तम, फोटोग्राफीची हौस पूर्ण होईल. पारंपारिक राजस्थानी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल.

 

thrillophilia.com

१०. अल्मोडा, उत्तराखंड

हिमालयाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे हिलस्टेशन म्हणजे अल्मोडा. इथल्या निसर्गाची जादू आणि सुंदरता तुम्हाला मोहवून टाकेल. देवदार आणि ओकची सुंदर वनराजी पाहून तुमचे मन प्रफुल्लीत होईल. शिवाय, निसर्ग फोटोग्राफी, पक्षी निरीक्षण, हायकिंग, ट्रेकिंग, सनसेट आणि सन राइज सारख्या निसर्गाची अद्भुत जादूगरी देखील अनुभवू शकता.

 

euttaranchal.com

११. सुंदरबन, पश्चिम बंगाल

बंगालच्या शिरपेचातील मानाचा तुरा! युनेस्कोच्या जागतिक पर्यटन स्थळाच्या यादीतील आणखी एक ठिकाण. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण स्थळ! बंगाली वाघांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य! इतर जंगली प्राण्यांचेही दर्शन घडू शकते. सजनखेली पक्षी अभयारण्यात पक्षी निरीक्षण देखील करता येईल.

 

sundarbantours.com

१२. बुंदी, राजस्थान

अरवली पर्वत रांगा आणि झुळझुळणारे झऱ्यांचे सौंदर्य अनुभवण्याचे ठिकाण म्हणजे राजस्थान मधील बुंदी! इथे जुने गड, महाल, इमारती, किल्ले, झरे अशा सर्व प्रकारच्या ऐतिहासिक सौंदर्याचा उपभोग घेऊ शकता. इथे काही सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा आणि कलरफुल हलक्याफुलक्या दागिन्यांची देखील खरेदी करता येईल.

 

visittnt.com

१३. बोध गया, बिहार

बोधी वृक्ष, महाबोधी मंदिर, भूतान मठ, थाई मठ, चीनी मंदिर अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे पाहता येतील. ध्यानधारणा आणि खरेदीचा आनंद घेऊ शकता.

 

१४. कच्छ, गुजरात

नोव्हेंबरमध्ये इथे “खुशबू गुजरात की” नावाचे एक प्रदर्शन भरते, जिथे गुजरातची खासियत अनुभवता येईल. हस्तकलेपासून बनवलेल्या वस्तूची खरेदी, जंगल सफारी, उंट सफारी, लोकल ड्रेसिंग, पक्षी निरीक्षण, रात्रीचा वाळवंटातील मुक्काम सोबत काही अॅडव्हेंचर गेमचा देखील येथे आनंद घेऊ शकता.

 

१५. गणपती-पुळे, महाराष्ट्र

हिवाळी ऋतूच्या अगमानाचा आस्वाद घ्यायचा तर महाराष्ट्रातील गणपतीपुळे हे ठिकाण अतिशय योग्य आहे. वॉटर स्पोर्ट्स आणि हस्तकलेद्वारे बनवलेल्या वस्तूंच्या खरेदीसोबत येथील सोनेरी वाळूच्या पार्श्वभूमीवर होणारा सूर्यास्त आणि सूर्योदय, याचा आस्वाद नक्की घेऊ शकता.

 

१६. तारकर्ली, महाराष्ट्र

समुद्र किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर गाव म्हणजे तारकर्ली. खारट आणि थंड अरबी समुद्रातील पाण्यात डुंबण्याचा आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण अगदी योग्य आहे. तसेच हाउसबोट, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग डॉल्फिन स्पॉटींगच्या सफारीचाही आनंद लुटू शकता.

 

१७. सणासार, जम्मू-काश्मीर

हिरवेगार डोंगररांगा, पाईन वृक्षाची वनराजी, शांत पसरलेले झरे, नोव्हेंबर मध्ये निसर्गाच्या या खजिन्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठीच अवतरलेले हे ठिकाण. कॅम्पिग, पॅराग्लायडिंग, झोर्बिंग असे साहसी गेम्सही येथे उपलब्ध आहेत.

 

१८. पुष्कर, राजस्थान

राजस्थान मधील अत्यंत प्रसिद्ध उत्सव पुष्कर उंट महोत्सव, हे पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण स्थळ. उंट सफारी आणि हॉट एअर बलुनिंग सोबत मनमुराद खरेदी या सोबतच, या महोत्सवात उंटाच्या सौंदर्यस्पर्धेसारखे मजेशीर खेळ पाहता येतील.

 

१९. उदयपुर, राजस्थान

राजस्थान मधील हे गाव “सिटी ऑफ लेक्स” म्हणून ओळखले जाते. आल्हाददायक वातावरणात तळ्यातून बोटिंग करणे, ताज लेक पॅलेसच्या ठिकाणी राहणे, सोबत व्हिंटेज कार म्युजियम पाहणे, यासोबतच शहराचे सौंदर्य पर्यटकांना जास्त आकर्षित करते. प्रशस्त महाल, सुंदर, रंगीबेरंगी रस्ते आणि मंदिरे पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.

 

२०. जैसलमेर, राजस्थान

जैसलमेर किंवा सोनेरी शहर म्हणून ओळखले जाणारे हे शहर हिवाळ्यात भेट देण्यासारखे आहे. प्राचीन किल्ले आणि महाल यांचे सौंदर्य आणि त्याच्याशी निगडीत तितक्याच मोहक कथा, याचा आस्वाद जरून घेता येईल. इथे अनेक प्राचीन हवेल्या आहेत, त्यांना भेट देता येईल. काही हवेल्यांना हॉटेलचे रूप देण्यात आहे, त्यामुळे पर्यटकांना देखील राजा-महाराजांप्रमाणे त्याकाळच्या जीवनशैलीचा आणि महालातील वास्तव्याचा अनुभव घेता येईल.

 

२१. अलवार, राजस्थान

‘सिटी ऑफ राजपुत्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात नोव्हेंबर मध्ये भरणारे काही विशेष उत्सव पर्यटकांचे खास आकर्षण बिंदू आहेत. अनेक प्रकारचे प्रदर्शन, स्पर्धा, लोकसंगीत आणि नृत्य यांची मेजवानी या उत्सवात पाहता येईल. राजस्थान मधील एक प्राचीन वारसा असलेल्या या शहरात जुन्या संस्कृतीचे अवशेष आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहता येतील.

 

२२. जुना गोवा, गोवा

जुन्या पोर्तुगीज शैलीतील चर्च आणि कॉन्वेंटचे बांधकाम हे अजून एक खास आकर्षण. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केलेल्या यादीतील एक ठिकाण. वॉटर स्पोर्ट, हेरीटेज वॉक, गोवा नाईटफॉल अशा कित्येक गोष्टी तुमच्या मनाला रीझ्वातील.

 

२३. वाराणसी, उत्तरप्रदेश

प्राचीन परंपरा असलेले आणि हिंदू धर्मियांचे एक प्रमुख श्रद्धा स्थान असलेले हे ठिकाण. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे गंगा महोत्सव आयोजित केला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात हिंदू संस्कृती आणि हस्तकला वस्तूंचे बहारदार प्रदर्शन पाहायला मिळते. नदीतून बोट रायडींग करता येईल.

 

या नोव्हेंबरची हिवाळी सुट्टी अविस्मरणीय बनवण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच आवडतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version