Site icon InMarathi

इंडियन आयडलमधील खोटारडेपणा : रिऍलिटी शोमध्ये गरिबीची नाटकं कशाला?

indian idol inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काय खरं आणि काय खोटं हे आजकालच्या दुनियेत कळणं खूप अवघड झालंय. बराच वेळा टि.व्ही. वर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी – त्या मग डेलीसोपच्या सिरिअल्स का असेना, त्या कलाकारांच्या अभिनयामुळे अगदी खरं घडतंय की काय असं वाटायला लागतं.

त्याच बरोबर न्युज चॅनल्स असतात. त्यावरच्या बातम्या ह्या खऱ्याच असणार, न्युज चॅनेल आहे ना ते मग खोटं कसं दाखवतील, असं समजून आपण एका माणसाला हिमालयात हनुमान दिसले ही देखील बातमी सत्य समजून बसलो होतो.

याच बरोबर अजून एक टि.व्ही. वर घडणारी गोष्ट म्हणजे रियालिटी शो.

मग तो डान्स इंडिया डान्स असेल किंवा सर्वात फेमस गायनाचा कार्यक्रम म्हणजे इंडियन आयडल. पहिल्या वाहिल्या इंडियन आयडॉल अभिजित सावंतने देखील नुकताच या शो बद्दल अनेक धक्कदायक खुलासे केले आहेत. त्यांचं असे म्हणणं आहे की

 यामधून सर्रास जाणवलेली एक गोष्ट म्हणजे त्यात दाखवले जाणारे “गरीब कलाकार आणि त्यांची स्टोरी ऐकून रडणारे जज.”

कन्टेन्ट पेक्षा ही या लोकांना स्पर्धकांची गरिबी दाखवण्यात जास्त रस असतो. 

 

 

 

हे चॅनेलचे लोक एखादा कलाकार असेल, जो चांगला असेल आणि घरची परिस्थिती वाईट असेल, तर ते सर्व जगासमोर आणतात. त्याच्या घरी जाऊन तो जिथे जिथे जातो तिथे जाऊन व्हिडिओ करून तो शो मध्ये दाखवतात. एकंदरीत त्याचे इथे येण्यामागचे कष्ट त्यांना दाखवायचे असतात.

 

हे ही वाचा – इंडियन आयडॉल मध्ये स्पर्धकावर शारीरिक अत्याचार? स्पर्धकाची धक्कादायक कहाणी…

पण काही लोकांचं म्हणणं आहे की हे सगळं स्क्रिप्टनुसार असतं. काही लोकांचे अनुभव हे असे आहेत की त्यांची पात्रता असून त्यांच्याकडे जर एखादी सॅड स्टोरी नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.

याहून वाईट गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे सॅड स्टोरी नसेल तर ती आपण बनवू असं देखील विचारले जाते.

 

हा कार्यक्रम २००४ पासून टीव्ही वर चालू आहे. अर्थात खूप जुना आणि लोकांच्या आवडीचा आहे. अनेक सीजन या शोचे आजपर्यंत येऊन गेलेत.  TRP नामक प्रकारावर शोच्या सर्व गोष्टी अवलंबून असतात.

ऑडिशनच्या वेळीस देखील रांगाच्या रांगा लागलेल्या असतात त्यातील त्यांना वाटेल त्याच लोकांना घेतात बाकीच्यांची साधी विचारपूस देखील करत नाहीत.

यामध्ये तसे सगळे चांगलेच गात असतात. परंतु ज्या स्पर्धकांमागे काही विशिष्ट अशी कथा असेल आणि तो जरी बरा गाणारा असेल तरी त्याला पुढे आणतात.

एवढंच काय तर त्यात महाराष्ट्राचा लाडका गायक रोहित राऊत पण आहे. जजेस ना तो खूप आवडला असं देखील दिसत होते.

 

 

या स्पर्धेतीलच एक गायक होता  सनी मलिक जो  सर्वांच्या मनात घर करून बसलेला. त्याचं गाणं ऐकून डोळे पाणावतात, त्याचा आवाज ऐकला की उस्ताद नुसरत फतेह अली खान यांची आठवण येतेच.

 

 

त्याचं हे गायन सर्वत्र व्हायरल झालं. ते इतकं व्हायरल झालं की स्वतः राहत फतेह अली खान यांनी देखील त्याचे कौतुक केले. त्याचे कौतुक करताना ते म्हणाले की नुसरत साहेबांची आठवण आली.

एवढंच काय तर महिंद्रा अँड महिंद्रा चे मालक आनंद महिंद्रा यांनी देखील त्याचा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला, आणि त्यावर विशाल ददलानी यांनी तो परत शेअर करत धन्यवाद दिले होते.

 

 

ऑडिशन राउंड मध्ये त्याने आफ्रीन आफ्रीन गायलं ते जजेस ना खूप आवडलं. तेव्हा त्याने त्याच्या बद्दल काही गोष्टी सांगितल्या.

तो एका गरीब घरातून येतो. तो बूट पॉलिश करतो. त्याची आई दारोदारी जाऊन तांदूळ मागते किंवा फुगे विकते. अशी सगळी त्याची कहाणीने तिथे सांगितली, जी खरंच प्रेरणादायी होती.

पण या आधी आपण जसं बोललो की कलाकारांच्या स्टोरीज दाखवून इमोशनल केलं जातं, आणि एक प्रकारे सहानुभूती मिळवली जाते. आता यामधील सनी मलिक याची देखील कहानी दाखवण्यात आली आहे. पण काही लोकांचा आक्षेप आहे की ती खोटी आहे.

या आधी देखील तो त्याचं गाण यु ट्यूब वर टाकत असे. असे काही व्हिडिओ देखील आहेत. त्या व्हिडिओ मध्ये तो स्वतः बद्दल जी माहिती सांगतोय ती आणि इंडिअन आयडलमध्ये त्याने सांगितलेली स्वतःबद्दलची माहिती ही बऱ्यापैकी वेगळी आढळून आली आहे.

त्यासंबंधित यु ट्यूब वर व्हिडिओ देखील आहे, ज्यात या गोष्टी उघड होताना दिसत आहेत.

त्याने सांगितले होते तो भटिंडाचा आहे .पण यु ट्यूब व्हिडिओ करताना तो स्वतःला दिल्लीचा सांगतोय. असे बरेच पुरावे त्यात आढळून येत आहेत.

 

हे ही वाचा – “हिंदू धर्मविरोधी बॉलिवूडसाठी मी गाणी म्हणणार नाही!” : गुणी गायिकेची अशीही कथा..!

सहानुभूती मिळवण्यासाठी अशा रियालिटी शोज् चे असे बरेच प्रयत्न होताना दिसतात. हे कितपत योग्य आहे माहीत नाही. आणि हे फक्त हिंदीत चालते असे नाही अगदी मराठी आणि इतर भाषेतील रिऍलिटी शो मध्ये सुद्धा असाच प्रकार आढळून येतो.

ज्या शोमुळे आज अभिजित सावंत लोकांना परिचित झाला त्याच शोवर तो आज आरोप करत आहेत, यामागे नक्की काय कारण असू शकेल सांगता येत नाही. इतक्या वर्षानंतर त्याला ही समज आली का? असे अनेक प्रश्न उभे राहतात.

 

कलाकार चांगला असून फक्त एखादी सॅड स्टोरी नाही म्हणून एखाद्याला रिजेक्ट करणे हे नक्कीच चुकीचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version