Site icon InMarathi

संगीत रसिकांसाठी All India Radio ची मेजवानी – “रागम्”

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

All India Radio / आकाशवाणी घरांघरांत पाहोचलेली आहेच. ही आहे सर्वात जुनी भारतीय प्रक्षेपण संस्था जिचा कधीच ‘तार’ यंत्रणेसारखा ऱ्हास व्हायला हवा होता, पण श्रोत्यांची आवड, काळाची गरज, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर अशा एक ना अनेक काळजीपूर्वक बदललेल्या बाबींमुळे आकाशवाणी चिवटपणे तग धरुन आहे.

 

Image source: huffingtonpost

हीच आकाशवाणी रसिकश्रोत्या कानसेन मंडळींसाठी घेऊन आली आहे एक नवी कोरी वाहिनी जी पुर्णपणे – अगदी दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस – शास्त्रीय गाण्यांसाठीच dedicated आहे. शिवाय आपल्याला AIR website, app आणि DTH service वर विवीध कार्यक्रमांची live streaming सुद्धा ऐकायला मिळू शकते.

तरुण तुर्कांपासून जुन्या जाणत्यांपर्यंत सर्व शास्त्रीय संगीत रसिकांना मेजवानी ठरणारी ही वाहीनी 26 जानेवारी 2016 ला launch झाली असुन जिचं नाव आहे “रागम्”.

 

 

26 जानेवारीच्या ह्या launch बद्दल माहिती AIR च्या twitter handle कडून मिळाली. ह्या बातमीचं सर्वत्र स्वागत झालं.

 

नेहमीप्रमाणेच launch साठी आकाशवाणी ने catchy पोस्टर्स वापरलेत…

 

आणि launch धडाक्यात पार पडलं.

तेव्हापासून ही वाहिनी रसिकांना मंत्रमुग्ध करत आहे.

तर रसिक श्रोतेहो, यथेच्च आस्वाद घ्या ह्या मेजवानीचा आणि आकाशवाणीला AIR च्या twitter account वर तुमचा feedback कळवा.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version