आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मुल जन्माला येणं ही एक जितकी वैश्विक तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आणि आनंददायी घटना असते. घरात येणाऱ्या या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यास सर्वच जण उत्सुक असतात.
प्रत्येक आईच्या दृष्टीने मुल जन्माला येणं ही जितकी आनंददायी घटना असते तितकीच ती प्रचंड वेदनादायी देखील असते.
अगदी विश्वाच्या सुरुवातीपासून ही घटना आजतागायत सुरु असली तरी, आजही यातील सर्व गूढ पूर्णत: उकलेलं नाही. आजही काही गोष्टी मानवी आवाक्याच्या बाहेरच्या आहेत.
घरात प्रसूत होणं ही संकल्पना आता मागं पडत असली तरी, मुलाच्या जन्माशी संबधित काही मिथकं, रूढी आजही प्रचलित आहेत. या रूढी कधी कधी जीवघेण्या देखील ठरतात.
फक्त भारतातच नाही तर, जगभरातील संस्कृतीमध्ये नवजात अर्भकाच्या स्वागत करण्यासाठी आणि आईला हिम्मत देण्यासाठी काही विशिष्ट रूढी प्रचलित होत्या काही ठिकाणी आजही त्या आहेत. जाणून घेऊया वेगवेगळ्या देशातील नवजात अर्भकाच्या स्वागतासाठी केले जाणारे काही विशिष्ट प्रकार, जे वाचून तुम्ही अचंबीत व्हाल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा –
===
१. अमेरिका – पानांच्या ढिगावर केली जाणारी प्रसुती
इतिहास तज्ञांच्या मते, अमेरिकेतील काही जमातीमध्ये पूर्वी ही प्रथा प्रचलित होती. आईला वेदना सुरु झाल्यानंतर तिला झोपू दिलं जात नसे, उलट बाळाचा जन्म होईपर्यंत तिला फिरवत राहायचे.
तिने उभे राहूनच बाळाला जन्म दिला पाहिजे, त्यासाठी तिच्या प्रसुतीच्या वेळी झाडांच्या पानाचा मोठा ढीग तयार करत आणि त्यावर तिला उभे केले जाई.
पक्षिणी जशा पानापासून तयार केलेल्या घरट्यात अंडी देतात अगदी त्याच पद्धतीने हा संस्कार पार पडला जाई. एक तर नवजात अर्भक फारच लहान असते, त्याला हातात घेणे देखील अवघड असते, म्हणून कदाचित त्याला पानांच्या ढिगाऱ्यावरच त्याचा जन्म होई.
२. रोम – वडिलांचा निर्णय
प्राचीन रोमने अनेक संशोधनांचे वरदान जगाला दिले आहे. परंतु त्यांच्याकडील बाळाच्या जन्मवेळची प्रथा मात्र फारच विचित्र होती. बाळाच्या जन्मानंतर त्याला त्याच्या वडिलांच्या पायावर ठेवले जात असे.
त्याने त्या बाळाला उचलून घेतले तर, एखाद्या राजकुमाराप्रमाणे त्याचा सांभाळ केला जाई. पण, जर त्याने त्या बाळाला उचलून नाही घेतले तर, त्याला गुलाम बनण्यासाठी विकले जाई किंवा त्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले जाई.
३. ग्रीस – कसलीही गाठ नको
ग्रीसमध्ये जेव्हा आई बाळाला जन्म देणार असते त्याआधीच घरातील सर्व गाठी सोडल्या जात. अगदी केसांच्या वेणीपासून ते बुटांच्या लेसपर्यंत एकही गाठ ठेवली जात नसे. बाळाच्या जन्माच्या वेळी घरात अशी एक जर गाठ राहिली तरी ती अशुभ समजली जात असे.
ज्यामुळे बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेत व्यत्यय येईल किंवा होणारच नाही अशी अंधश्रद्धा होती. बाळाच्या जन्मानंतर त्याला त्वरित स्वच्छ पुसून वाईट नजरेपासून त्याचा बचाव व्हावा म्हणून त्याच्या कपाळावर एक खुण केली जात असे.
४. बेली डान्स
हो अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. प्राचीन इजिप्तमध्ये गर्भवती जेव्हा प्रसूत होणार असते, तेव्हा सगळ्या सुईणी मिळून बेली डान्स करत असत, याने गर्भवतीच्या वेदना कमी व्हायला मदत होते अशी समजूत होती.
फक्त सुईणीच नव्हे तर खुद्द त्या आईला देखील हा डान्स करावा लागत असे. या डान्स मध्ये होणाऱ्या पोटांच्या हालचालीमुळे वेदना कमी होऊन प्रसूती सुसह्य होते अशी समजूत होती.
५. क्रीपी डान्सिंग
अँग्लो-सॅक्सॉन संस्कृतीत प्रसुतीच्या वेळी आईची काळजी घेणे आणि तिची वेदना सुसह्य करणे आवश्यक आहे, असे समजून तिला क्रीपी डान्स करायला लावत.
यात दोन व्यक्तींची गरज लागत असे, एक जिवंत, एक मृत. ऐकायला थोडसं विचित्र वाटेल पण, हा डान्स त्या मृत व्यक्तीच्या थडग्यावर केला जात असे.
६. नेदरलँड्स – सुईण की डॉक्टर?
नेदरलँड्समध्ये गर्भवती स्त्रिया आजही प्रसूतिशास्त्रतज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. तर, त्याऐवजी त्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने एखाद्या सुईणीकडून तपासणी करून घेतात आणि तिच्याकडूनच डिलिव्हरी सुद्धा करून घेतात.
नेदरलँड्समध्ये स्त्रिया स्वतः हे ठरवतात की, त्यांना घरीच डिलिव्हरी करायची आहे की, दवाखान्यात.
अगदी जास्तच गुंतागुंतीची केस असेल तरच डॉक्टर डीलीव्हरीच्या वेळी उपस्थित राहतात. एखाद्या गर्भवती स्त्रीने दवाखान्यात डिलिव्हरी करून घेण्याचे ठरवले तरी, डिलिव्हरीची अपेक्षित वेळ जवळ आल्यानंतर पहिल्यांदा सुईणच तिला तपासते पुरेशा प्रमाणात कळा तीव्र झाल्यानंतरच ती तिला दवाखान्यात जाण्याचा सल्ला देते.
घरच्या घरी डिलिव्हरी करण्यासाठी पुरेपूर काळजी घेतलेली असते. एखाद्या प्रथमोपचार पेटीप्रमाणे डिलिव्हरीच्या वेळी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून तयार ठेवले जाते.
डिलिव्हरीच्या वेळी लागणारे मेडिकल साहित्याचा देखील यामध्ये समावेश असतो. डिलिव्हरी जर दिवसाच्या वेळेत झाली तर, दोन तासांनी बाळ आणि आई दोघेही घरी जाऊ शकतात.
परंतु, त्यानंतर सात दिवस नर्स घरी येऊन बाळाच्या आणि आईच्या तब्येतीची काळजी घेते, त्यांना आहार कसा द्यायचा, स्वच्छता कशी ठेवयाची त्या नवजात अर्भकाची काळजी कशी घ्यायची याच्या सगळ्या सूचना ती घरी येऊन देते.
हे ही वाचा –
===
७. जर्मनी – बाळाचं नाव…
नेदरलँड्स प्रमाणेच जर्मनीमधील गर्भवती स्त्रिया देखील त्यांच्या गर्भापणात सुईणीकडूनच तपासणी करून घेतात आणि त्यांच्या निगराणीखालीच त्यांच्या आरोग्याची देखभाल केली जाते. उलट, इथे सुईणींचा इतका आदर केला जातो, प्रत्येक डिलिव्हरीच्या वेळी सुईण उपस्थित असणं तिथे कायद्याने सक्तीचे आहे.
जर्मनमध्ये मुलांची नावे सरकारी अधिकारी स्वतःकडे रजिस्टर करून घेतात. मुलांची प्रचलित नावांची एक यादी ते स्वतःकडे ठेवतात. पालकांना या नावापैकी एक नाव निवडावे लागते.
परंतु, याऐवजी पालकांनी जर काही वेगळे नाव ठेवले तर, ते का ठेवले याचे स्पष्टीकरण या अधिकाऱ्यांना द्यावे लागते. विचित्र नाव ठेवल्याने पुढे जाऊन त्या मुलाला नावावरून कुणी अपमानित करू नये, आणि त्या मुलाची मानसिक पिळवणूक होऊ नये, यासाठी सरकार अशी खबरदारी घेते.
८. जपान – माहेरपण
जपानमधील स्त्रिया देखील नैसर्गिक डिलिव्हरीसाठी जास्त प्रयत्न करतात. डिलिव्हरीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या वेदनाशामक औषधे घेण्यास त्या इच्छुक नसतात. याचे मूळ बुद्धाच्या वेदनानुपास्येत आहे. जपानी लोकांमध्ये अशी धारणा आहे, की, डिलिव्हरीच्या काळात होणाऱ्या वेदना या त्या स्त्रीला मातृत्वाची जबाबदारी पेलण्यास सक्षम बनवतात.
डिलिव्हरी नंतर जपानी स्त्रियांना विश्रांतीसाठी त्यांच्या माहेरी ठेवले जाते. किमान २१ दिवस त्यांनी बाळासोबत पूर्ण वेळ घालवता यावा म्हणून इतर कोणत्याही कामात त्यांना लक्ष घालू दिले जात नाही. याकाळात त्यांनी फक्त बाळाची काळजी घ्यायची आणि पूर्ण विश्रांती घ्यायची असते.
९. तुर्की – लोहूसा सरबती, अंडे आणि पीठ
तुर्कीमध्ये देखील सुईणीकडूनच डिलिव्हरी करून घेण्यावर भर दिला जातो. अर्थात आता, तिथे डॉक्टरांची संख्या वाढली असल्याने दवाखान्यात डिलिव्हरी करण्याचे प्रमाण वाढते आहे. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळाला २१ दिवसांची विश्रांती दिली जाते.
याकाळात बाळाला भेट द्यायला येणाऱ्या पाहुण्यांना लोहूसा सरबती नावाचे एक विशिष्ट पेय दिले जाते. त्यानंतर जे पाहुणे या काळात बाळाला भेटायला येतात, त्यांना आई आणि बाळ पुन्हा त्यांच्या घरी जाऊन भेट देतात.
यावेळी त्यांना पाहुण्यांकडून एक रुमाल दिला जातो ज्यामध्ये एक अंड (हे बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी) आणि एक कॅन्डी (हे बाळाच्या गोड स्वभावासाठी) असते. त्यानंतर ते बाळाच्या कपाळावर थोडसं पीठ चोळतात यामुळे त्याला जास्त आयुष्य मिळते असा समाज रूढ आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.