Site icon InMarathi

सावध व्हा: शरीरात रोज जाणवणाऱ्या या १९ गोष्टी चक्क कॅन्सरची लक्षणं असू शकतात

unwell woman inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हृदयविकारानंतर सर्वात जास्त जीवघेणा आजार म्हणजे, कॅन्सर!

आत्ता तर लहान मुले देखील या आजाराला बळी पडताहेत. विशेषतः स्त्रियांमध्ये देखील याचे प्रमाण जास्त दिसते. कॅन्सरच्या लक्षणांकडे वेळेवर लक्ष दिल्यास तो पूर्णपणे आणि लवकर बरा होऊ शकतो.

 

जाणून घेऊया कॅन्सरची काही लक्षणे, ज्याकडे हमखास दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. कॅन्सरची काही अगदी ठराविक आणि विशिष्ट लक्षणे आहेत असे नाही. पण, काही लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

बहुतेक वेळी दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा असे व्यसन करणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका जास्त संभवतो.

या शिवाय काही अनुवांशिक करणे देखील आढळून येतात.

१. सततचा खोकला आणि लाळेतून रक्त पडणे 

 

 

सततचा खोकला हे ब्राँकायटिसचे देखील लक्षण असू शकते.

फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा गळ्याचा कॅन्सरचे देखील हे लक्षण असू शकते. एका महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला असल्यास आणि खोकल्याद्वारे रक्त पडत असल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

२. सतत पोट बिघडणे 

खाण्यापिण्यात बदल झाल्यास किंवा खाण्यातून काही इन्फेक्शन झाल्यास सतत पोटाच्या तक्रारी उद्भ्वातात पण, पोट बिघडणे, वारंवार शौचास होणे, शौच्याच्या वेळा आणि सवयी बदलणे ही आतड्याच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

 

 

खाण्यात पिण्यात बदल न करताही जर, शौच्याच्या तक्रारी सलग काही दिवस दिसून येत असतील हे एक गंभीर लक्षण असू शकते.

शौचास जाऊन आल्यानंतर ही पुन्हा पुन्हा जाण्याची इच्छा होणे, हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.

३. शौचाद्वारे रक्त पडणे 

शौचाद्वारे रक्त पडण्यामागे अनेक करणे असू शकतात. परंतु, डॉक्टरांकडून शौचातील रक्ताची तपासणी करून घेणे चांगले.

मुळव्याधीच्या तक्रारीत शौचावाटे रक्त पडणे ही एक सामान्य बाब आहे. पण, बऱ्याचदा मुळव्याध हा देखील कॅन्सरचे एक लक्षण असू शकते.

 

 

शौचाद्वारे रक्त पडत असल्यास संपूर्ण आतड्यांची तपासणी करून घेणे उत्तम.

एक्सरे केल्याने देखील या प्रकारच्या कॅन्सरचे निदर लवकर होते. आतड्यांची एंडोस्कोपी केल्याने देखील याप्रकारच्या कॅन्सरचे निदान होऊ शकते.

४. रक्तक्षय

सततचा रक्तक्षय ज्याचे निदान करता येत नसेल तर, ते देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते. रक्तक्षय ही अशी स्थिती असते ज्यात रुग्णाच्या रक्तातील आला पेशींची संख्या वाढत नाही.

विशेषतः आतड्याच्या कॅन्सर मध्ये हे लक्षण विशेषत्वाने आढळून येते.

 

 

५. स्तनावर गाठ होणे किंवा स्तनातून स्त्राव होणे 

स्तनावर होणाऱ्या गाठी या बऱ्याचदा अल्सर देखील असू शकतात. परंतु, स्त्रियांनी स्तनांच्या कॅन्सर बाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. स्तनावर गाठ आली असल्यास त्याची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

स्तनांतून स्त्राव बाहेर पडणे ही देखील एक सामान्य बाब आहे, पण काही स्त्राव हे कॅन्सरचे कारण ठरू शकतात. वेळीच डॉक्टरांना भेटून आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्यास लवकर उपचार होऊ शकतात.

 

 

६. अंडकोषावरील गाठी 

अनेक पुरुषांना अंडकोषावर न दुखणाऱ्या गाठी उद्भवतात. ९०% पुरुषामध्ये अंडकोषावरील गाठी हे कॅन्सरचे कारण असते.

काही पुरुषांमध्ये अंडकोषाचा आकार वाढतो. याशिवाय अंडकोषाच्या शिरांना सूज येणे, अशी लक्षणेही आढळून येतात. पाहिण्यातून एकदा पुरुषांनी अंडकोषाची तपासणी करून घ्यावी.

 

 

७. मूत्राशयाच्या कार्यात बिघाड निर्माण होणे 

वारंवार लघवीला होणे, लघवीला साफ न होणे किंवा मूत्राशयाच्या कार्यात बिघाड निर्माण होणे ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. महिलांमध्ये युरीनरी इन्फेक्शनमुळे देखील हा त्रास वारंवार जाणवतो.

पुरुषांचे वय वाढेल तसे त्यांच्या प्रोस्टेटचा आकार वाढल्याने देखील हा त्रास उद्भवू शकतो. परंतु कधी कधी ही लक्षणे प्रोस्टेट कॅन्सरशी निगडीत असू शकतात.

 

 

८. मुत्रावाटे रक्त पडणे 

बऱ्याचदा मुतखडा किंवा युरीनरी इन्फेक्शनमुळे देखील मुत्रावाटे रक्त पडू शकते.

हे रक्त असेही डोळ्यांना दिसू शकते किंवा मुत्र तपासणीतही आढळून येऊ शकते. परंतु, हे आतड्याच्या कॅन्सरचे किंवा किडनीच्या कॅन्सरचे ही लक्षण असू शकते.

 

९. अनावश्यक तीळ येणे किंवा तिळाचा आकार वाढणे –

तिळाचा आकार आणि रंग बदलत असेल किंवा त्यातून पाणी येत असेल तर, असे तीळ कॅन्सरस असू शकतात.

तीळ आकाराने अगदी मोठे असतील तर, लवकरात लवकर त्यांची तपासणी करून घेतलेली बरी.

 

 

१०. अपचन किंवा गिळायला त्रास होणे –

काही लोकांमध्ये छातीत जळजळ होण्याचा जुनाट त्रास असतो. परंतु, वारंवार अँटासिडस् घेऊन देखील छातीतील जळजळ कमी येत नसेल तर, त्वरित निदान करणे फायद्याचे ठरेल.

घास गिळताना त्रास होणे, हे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

 

 

११. योनीतून होणारा अनियमित रक्तस्त्राव 

दोन पाळीच्या मधल्या काळातही रक्तस्त्राव होत असेल तर हे चिंतेचे कारण होऊ शकते. पाळी होऊन गेल्यावर ही दोन-तीन दिवसांनी परत येत असेल आणि यावेळी जास्त रक्तस्त्राव होत असेल तर, वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

रजोनिवृत्ती (मेनोपॉझ) नंतर होणारा रक्तस्त्राव चिंतेचे गंभीर स्वरूपाचा असू शकतो.

१२. अचानक वजन कमी होणे

अचानक वजन कमी होणे किंवा वजन कमी होण्याचे नेमके कारण न सापडणे हे हे अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये दिसून येणारे एक सामान्य लक्षण आहे.

अर्थात, टीबी सारख्या आजारांत देखील हेच लक्षण दिसून येते पण, वजन अचानक कमी झाले असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या अवश्य घ्या.

 

 

१३. जननेन्द्रियाच्या भागात सतत खाज सुटणे

जननेन्द्रीयाच्या कॅन्सर मध्ये त्या भागात सतत खाज सुटते. काही कॅन्सरमध्ये या भागातील त्वचेचा रंग बदलतो.

अनेक औषधोपचार करूनही खाज आटोक्यात येत नसेल तर या भागाची संपूर्ण तपासणी करून घेतलेली केंव्हाही चांगले.

 

 

 

१४. न भरून येणाऱ्या जखमा

जखमा शक्यतो लगेच भरून येतात. पण, एखाद्या भागातील जखमा लवकर भरून येत नसतील तर, हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

विशेषतः तोंडात झालेल्या जखमा, जिभेवर, हिरड्यांवर उठणारे चट्टे, ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

 

 

१५. डोकेदुखी

मायग्रेन किंवा जुनाट सर्दी सारख्या आजारातही सतत डोकेदुखी उद्भवते. पण यापेक्षा डोकेदुखीची तीव्रता आणि पद्धत वेगळी वाटत असेल तर, हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

वारंवार औषधोपचार करूनही सततची डोकेदुखी आटोक्यात येत नसेल तर, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण तपासणी करून घेतलेली चांगली.

 

 

१६. पाठीचे दुखणे, ओटीपोट दुखणे किंवा अपचन

अगदी रोजच्या आयुष्यात ही आपण या तक्रारी वारंवार अनुभवतो. परंतु, गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये बऱ्याचदा ही लक्षणे आढळून येतात.

गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान लवकर होत नसल्याने हा कॅन्सर शक्यतो लवकर बरा होत नाही.

 

FredHutch.org

 

१७. सतत ताप येणे

विशेषतः महिलांमध्ये सतत ताप येणे हे ल्युकेमिया किंवा रक्ताच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

आपली प्रतिकार शक्ती जेव्हा इतर आजारांशी लढत असते तेव्हाच आपल्याला ताप जाणवतो. वारंवार ताप येणे हे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

 

 

१८. अंगदुखी

वारंवार अंगदुखी उद्भवण्यामागचे निदान होत नसेल तर, हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते. सततची अंगदुखी ब्रेन कॅन्सर आणि हाडांच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

 

 

१९. पोटदुखी

पोटदुखीची अनेक करणे असू शकतात. पण वरचेवर आणि तीव्र प्रमाणात पोटदुखी पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. पोटदुखीचे नेमके निदान होत नसल्यास आपल्या डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.

 

 

वाचकांनो, या “लहानसहान” गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका…

या गोष्टींचा त्रास फार काळ झाला तर त्वरित स्पेशलिस्टकडे जाऊन तपासण्या करून घ्या!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version