' साखरझोपेतून सकाळी वेळेवर उठायचंय? १०० टक्के यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स… – InMarathi

साखरझोपेतून सकाळी वेळेवर उठायचंय? १०० टक्के यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सकाळी सकाळी साखरझोपेतून जागे होणे म्हणजे एक मुश्कील काम. पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी छान गाढ झोप लागलेली असताना उठून कामाला लागणं जीवावर येतं.

पण, लवकर नाही उठलं तर, पुढची सगळी कामं रेंगाळत राहतात आणि मग कामं पेंडिंग राहिली की ताण वाढतो.

लवकर उठण्याचे फायदेही खूप असतात. सकाळी लवकर उठण्याने ताण कमी होतो, उत्साह वाढतो, व्यायामासाठी वेळ देता येतो, ज्यामुळे आरोग्याला देखील फायदा होतो.

लहानपणापासून घरातील वडिलधाऱ्या मंडळींकडून आपण हे ऐकत आलोय की, सकाळी लवकर उठल्याने आयुष्यात सफलता मिळते. विद्यार्थांसाठी तर सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय फार फायद्याची ठरू शकते.

तुम्हालाही सकाळी लवकर उठण्याची सवय लाऊन घ्यायची आहे का? मग त्यासाठी वाचा या काही खास टिप्स ज्यामुळे लवकर उठणं तुम्हाला अजिबात त्रासदायक वाटणार नाही.

१. झटपट बदल करू नका

सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची म्हणून उठण्याच्या सवयीत झटपट बदल करू नका.

तुम्हाला जर सकाळी ९ ला उठण्याची सवय असेल आणि एक दिवस अचानक तुम्ही ५ वाजता उठलात तर, हा अचानक झालेला हा बदल तुमचे शरीर पटकन स्वीकारणार नाही.

म्हणून बदल हळूहळू करा.

म्हणजे उद्या ९ ऐवजी ८.३० ला उठा. त्यानंतर हळूहळू ही वेळ रोज कमीकमी करत न्या.

 

Gradual Change InMarathi

 

२. निश्चित वेळापत्रक करा

सकाळी लवकर उठण्यासाठी एक निश्चित वेळापत्रक बनवा. वेळापत्रक नसेल तर, लवकर उठून आपण काय करणार, असे म्हणत आपण लवकर उठण्याचे टाळत राहतो.

सगळी कामे वेळेवर पूर्ण करण्याची सवय लावून घेतली तरच, लवकर उठण्याची सवय लागेल.

 

 

३. दिवसाची सुरुवात आनंदाने करा

सकाळी लवकर उठून काही चांगले, क्रिएटिव्ह काम केल्यास दिवसभर उत्साह टिकून राहील. सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला काहीआवडतं काम करायला मिळणार असेल तर, लवकर उठायचा कंटाळा येत नाही.

ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्यातील उत्सुकता टिकून राहील आणि दिवसभर तुमची कार्यक्षमता टिकून राहील.

 

startup 10 inmarathi

 

४. सुट्टीच्या दिवशीही लवकर उठा

सुट्टीच्या दिवशीही उठण्याचे शेड्युल बदलू नका. दररोज आपले रुटीन ठरलेले असते, पण सुट्टीच्या दिवशी आपण दिवसभर काय करणार आहोत, ते ठरवलेलं नसतं.

आठवडाभर सकाळची धावपळ सुरु असते. पण, सुट्टीचा दिवस आपण निवांत घालवतो. असे न करता, त्या दिवशी सकाळच्या वेळेत एखादा छंद वर्ग लावा. मित्रांसोबत ट्रेकींगचे प्लॅन करा.

सुट्टीच्या दिवशी सकाळचा वेळ अशा गोष्टी करा ज्या तुम्ही इतर वेळ कधीच करत नाही.

जो वेळ निवांत, लोळण्यात घालवायचा त्या दिवशी कामाचे प्लॅनिंग करणे विचित्र वाटेल पण, आठवड्यातून एकही दिवस सकाळी लवकर उठण्याचे टाळू नका.

 

planning Sequence InMarathi

===

हे ही वाचा – झोपण्यापूर्वीच्या या साध्या-सोप्या सवयी मिळवून देतील सर्वांगसुंदर, निरोगी शरीर! वाचा

===

५. सकाळच्या वेळच्या तुमच्या कामाचे योग्य नियोजन करा

सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय काय करणार आहात याचे नियोजन आदल्या रात्रीच करून ठेवा.

सकाळी उठल्यानंतर तुम्ही आधी ब्रश करणार की, दाढी? व्यायाम करण्यासाठी कोणती कपडे घालणार? चहा घेणार की, कॉफी?

तुमचे नियोजन यशस्वी झाले तर, लवकर उठण्यासोबतच तुमच्या सर्व गोष्टींना एक निश्चित शिस्त लागेल.

दररोजचे तुमचे रुटीन काय असणार आहे ते लिहून ठेवा. उद्या कोणती कपडे घालायची हे देखील आजच ठरवून ठेवा. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि उठल्यानंतर सर्व गोष्टी तुमच्यासाठी तयार असतात, तेंव्हा सकाळी लवकर उठणे फारच छान वाटते.

 

to do list inmarathi

 

६. चांगली झोप घ्या

सकाळी लवकर उठण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घ्या. वेळेत उठण्यासाठी वेळेत झोपा. तसेच, तुमचा आहार आणि व्यायाम याकडे देखील लक्ष द्या.

शरीर तंदुरुस्त असेल तर, तुमच्या झोपण्याच्या सवयी आणि उर्जा यावर चांगला परिणाम होतो.

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza01

 

७. अलार्म स्नूज करू नका

सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही अलार्म लावतच असाल. पण, अलार्म झाल्यावर जर तुम्ही तो स्नूज करून पुन्हा झोपत असाल तर, तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागणार नाही. त्याऐवजी दोन अलार्म लावा. दोन अलार्म मध्ये दहा मिनिटांचे अंतर ठेवा.

एक अलार्म जो लवकर होईल तो तुमच्या जवळ ठेवा आणि दुसरा तुमच्या बेडपासून थोडा दूरवर ठेवा.

पहिला अलार्म बंद करून तुम्ही झोपी गेलात तरी, दुसरा अलार्म झाल्यावर तुम्हाला उठावेच लागेल.

परंतु, एकदा अलार्म बंद केला तर, तुमच्या मनाला अलार्मकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागेल.

 

alarm-clock-inmarathi01

 

८. वेळ पाळा

झोपेची वेळ पाळायची त्याप्रमाणेच उठण्याची वेळ देखील पाळा. तुमच्या शरीराला झोपेच्या पॅटर्नची सवय झालेली असते. नेहमीच्या वेळी उठता तेंव्हा तुमच्या शरीराचे एक निश्चित वेळापत्रक तयार झालेले असते.

तुमचा अलार्म वाजण्याआधीच तुमचे शरीर उठण्यासाठी तयार झालेले असते. यामुळे काही दिवसांनी तुम्हाला लवकर उठण्यासाठी अलार्मची गरज देखील लागणार नाही.

 

Arguments Inmarathi

===

हे ही वाचा – वेळेवर झोप न लागण्याची कारणं आहेत, झोपतांना केलेल्या या ९ चुका!

===

९. सकाळी जाग आल्यानंतर जागे कसे राहाल?

काही लोकं सकाळी लवकर उठतात पण, एका तासानंतर त्यांना पुन्हा आळस येतो. डोळ्यावर पेंग येते आणि मग थोड्यावेळाने ते पुन्हा झोपून जातात.

सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेणे आणि ती टिकवून ठेवणे अवघड असते. शरीराचे वेळापत्रक बदलणे सोपी गोष्ट नाही.

जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा नव्या वेळेशी जुळवून घेण्यास शरीर तयार नसते. म्हणून उठल्या उठल्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

घरातून लवकर बाहेर पडून, फिरायला गेल्याने थंड हवेचा स्पर्श अनुभवल्याने आळस निघून जाईल आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.

 

exercise-in-morning-inmarathi

 

१०. सकाळी लवकर का उठणार आहात?

“लवकर उठल्याने मूड फ्रेश राहतो आणि लवकर उठणारे लोक अधिकाधिक कार्यक्षम असतात,” म्हणून मलाही लवकर उठायचे आहे, हे काही फार चांगलं कारण आहे असे नाही.

लवकर उठण्याचा निश्चय केला असेल तर, लवकर उठून तुम्ही काय करणार आहात?

सकाळी उठण्याची सवय लावून घेणे फार अवघड गोष्ट आहे, त्यासाठी त्यामागचं काही ठोस कारण, तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे.

लवकर उठल्यानंतर तुम्हाला जो थोडा अधिकच वेळ मिळणार आहे, त्याच तुम्ही कसा उपयोग करणार आहात?

– हे जर तुम्ही ठरवल नसेल तर, लवकर उठून तुमचा काही फायदा होणार नाही.

 

Self Motivated-inmarathi

 

११. एखादा पाळीव प्राणी बाळगा

दिलेली वेळ पाळण्याची चांगली सवय लावून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही एखादं मांजर पाळले आणि तिला जर, सकाळी ६.०० वाजता खाऊ घालण्याची सवय लावली, तर सकाळी ५.५५ वाजता तुम्ही तिचा खाऊ बनवत असाल याची ती काळजी घेईलच.

तिला खाऊ घालण्याच्या काळजी पोटी तुम्हीही लवकर उठून कामाला लागाल.

 

running-tips-inmarathi05

 

१२. मानसिक तयारी ठेवा

लवकर उठण्याचे कोणते फायदे असतात हे सांगणारे व्हिडीओज ऐकत रहा. लवकर उठण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींबद्दल वाचत राहा.

दिवसभराचा दिनक्रम लिहिण्याचा फायदा काय असतो, हे सतत स्वतःला सांगत रहा.

अलार्म वगैरे लावून तुम्ही लवकर उठाल देखील पण, मानसिक तयारी केली नसेल तर मात्र, सगळा दिवस आळसात आणि कंटाळवाणा जाऊ शकतो.

 

Motivation InMarathi

 

तर मंडळी, या गोष्टी लक्षात ठेवा – स्वतःच्या दिवसावर नियंत्रण मिळवा आणि – यशस्वी व्हा…!

या टिप्स इतरांशी शेअर करा…इतरांना ही प्रोत्साहित करा…!

===

हे ही वाचा – व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?