आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
काम छोटं असो की मोठं पण, कोणतेही कारण देऊन जर तुम्ही ते टाळण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या पेंडिंग कामाची यादी वाढत राहील आणि त्यामुळं तुमच्यावरील कामाचा ताण देखील वाढत राहील. ज्याचा पुन्हा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
म्हणजेच आधी छोट्याशा कारणानं कामं टाळल्याने नंतर त्याचे मोठ्या समस्येत कधी रुपांतर होईल हे सांगता येत नाही. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कामं वेळेत पूर्ण करण्याची ही सवय तुम्हाला अत्यंत फायद्याची ठरू शकते.
चालढकल करत आळसाने कामं टाळण्याची सवय तुम्हाला अपयशी करते.
या १७ गोष्टी दैनंदिन जीवनात पाळून हा दुर्गुण कायमचा हटवा.
१. जास्त ताण घेऊ नका –
हे काम केलं तरच आपल्याला करिअरमध्ये चांगले यश मिळाणार आहे, या प्रोजेक्ट मुळेच आपल्याला बढती मिळणार आहे, हे कामं नाही झालं तर, माझ्या नोकरीवर करिअर वर वाईट परिणाम होणार आहे, अशी स्वतःला अवास्तव भीती घालणे थांबवा. यामुळे तुमच्या वरील कामाचा ताण जास्त वाढेल आणि त्यामुळे तुम्ही हे महत्वाचं काम टाळण्यासाठी छोटी मोठी कारणं शोधात राहाल.
==
हे ही वाचा : यशस्वी झालेल्या ८ भारतीय स्टार्टअप्स बद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल बद्दल जाणून घ्या!
==
२. अतिविचार करणे किंवा विचारच न करणे दोन्ही धोकादायक आहे –
एखादं काम जर आपण परिपूर्ण पद्धतीने करत नसू तर ते न केलेलं बरं हे स्वतःला सांगणे आधी थांबवा. कोणती काम न करण्यापेक्षा ते सदोष झालं तरी पूर्ण केलेलं कधीही उत्तम!
३. लादलेलं नाही तर, निवडलेलं –
एखादं काम तुम्ही टाळत असता कारण, तुम्हाला असे वाटत असते की ते काम तुमच्यावर लादलेलं आहे.
समजा बॉसनी एखादा प्रोजेक्ट तुम्हाला पंधरा दिवसात पूर्ण करायला सांगितला आणि तुम्ही जर असा विचार केला की, बॉस तुमच्या प्रामाणिकपणे काम करण्याच्या वृत्तीचा गैरफायदा घेत आहे, तर तुम्ही तो प्रोजेक्ट वेळेत कधीच पूर्ण करू शकणार नाही.
त्याऐवजी जर तुम्ही असा विचार केला, की हा प्रोजेक्ट केल्याने मी माझ्या कंपनीला अजून जास्त यश मिळवण्यात मदत होईल, तर तुम्हाला ती जबरदस्ती वाटणार नाही आणि तुम्ही अधिक उत्साहाने तो प्रोजेक्ट करून दाखवाल.
म्हणून कोणतेही काम हे जबरदस्तीने करतोय असा विचार न करता, ते काम आपण स्वेच्छेने निवडलेले आहे यादृष्टीने त्याकडे पहा.
४. कामाची विभागणी करा –
काम पुढे ढकलण्याचे किंवा ते टाळण्याचे आणखी एक कारण म्हणजे, कामाकडे पाहण्याची अवास्तव दृष्टी. हे काम मला जमणार नाही किंवा हे काम खूपच मोठं आणि वेळ खाऊ आहे असा नकारात्मक विचार करणं.
एखादं काम खूप अवघड किंवा खूप वेळ खाऊ आहे असे वाटत असेल तर त्या कामाचे छोट्या छोट्या गटात विभागणी करा.
एकेक टप्पा पार करत गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे काम वाटत होतं तितकं अवघड नक्कीच नाही. एकेक टप्पा पार केल्यानंतर पुढील टप्प्यावरील कामाबाबतची उत्सुकता आणि उत्साह दोन्ही वाढेल.
५. स्वतःला बक्षीस द्या-
एखादे काम अमुक इतक्या वेळेत मी पूर्ण करणारच हे ठरवून ते पूर्ण केल्यावर त्याबदल्यात स्वतःला काही तरी बक्षीस देण्याचे प्रॉमिस करा. किंवा आता सलग ४५ मिनिटे मी या आणि याच कामावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे ठरवून काम हातात घ्या.
४५ मिनिटानंतर काही तरी गोड धोड खाऊन स्वतःला खुश करा.
६. हे तीन प्रश्न अवश्य विचारा –
कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला हे तीन प्रश्न जरूर विचारा: या क्षणी मी जे करत आहे त्यामुळे माझा वेळ सत्कारणी लागतोय का? हे काम करण्यासाठी मीच सर्वात योग्य व्यक्ती आहे का?
एखादं महत्वाचं काम, ज्यामुळे मला जास्त फायदा होणार आहे, ते करण्याचं टाळण्यासाठी मी हे काम करत आहे का?
==
हे ही वाचा : मारवाडी लोकांसारखं अफाट यश, मराठी माणूसही मिळवू शकतो, वाचा ही १५ सिक्रेट्स!
==
७. वेळेचा हिशेब ठेवा –
एक वही आणि पेन घ्या, पूर्ण आठवडाभर तुम्ही काय काय केलं आणि कोणत्या कामासाठी जास्त वेळ दिला, ते सगळं लिहून ठेवा.
एका आठवड्यानंतर कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो की, तुम्ही तुमचा बहुमुल्य वेळ नेटसर्फिंग करणे, असे काही ब्लॉग वाचणे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात फारसा काही फरक पडणार नाही, व्हॉटसपवर निरोपयोगी चाटिंग करणे आणि अशाच प्रकारच्या कामात तुमचा वेळ वाया घालवल्याचे लक्षात येईल.
हाच वेळ जर तुम्ही तुमचे आयुष्य अधिक चांगले होण्यासाठी योग्य ठिकाणी खर्च केला तर काय होईल हे तुम्ही स्वतःच स्वतःला विचारा…!
८. टायमर सेट करा-
एखादं महत्वाचं काम पूर्ण करताना ठराविक वेळेचा टायमर सेट करा. उदाहरणार्थ, ४० मिनिटे, हा ४० मिनिटांचा टायमर लावल्यानंतर जोपर्यंत अलार्म होत नाही तोपर्यंत मी माझं लक्ष दुसरीकडे वळू देणार नाही, किंवा हातातील कामावरून माझं लक्ष हटवणार नाही असा निश्चय करा.
४० मिनिटाच्या अलार्म नंतर थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा तुमच्या कामाला लागा. यावेळी देखील टायमर लावायला विसरू नका.
९. जास्त वेळ रेंगाळणाऱ्या पाहुण्यापासून सुटका करून घ्या –
एखादी व्यक्ती रोज रोज येऊन तुमचा वेळ खात असेल तर, या गोष्टी अंमलात आणा. संभाषणावर नियंत्रण मिळावा. चर्चा सुरु असताना स्वतःहून व्यत्यय आणा.
घडाळ्याकडे पहा, आणि “ओहो फारच वेळ झाला, मला काही महत्वाची कामं आहेत” हे सांगायला विसरू नका.
यामुळे ती व्यक्ती पुन्हा तुमचा जास्त वेळ कधीच घेणार नाही. हे वर्तन उद्धटपणाचे वगैरे वाटेल याचा अजिबात विचार करू नका.
कारण असे केले नाही तर, तुमचे वेळापत्रक बिघडू शकते.
१०. मूड झाल्याशिवाय काम न करणे टाळा –
कामाचा मूड झाल्यावर मग, बघू हे सांगणे टाळा. मूड नसताना देखील स्वतःला कामावर लक्ष केंद्रीत करण्याची सक्ती करा.
१२. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहा –
सोशल मिडिया, टीव्ही यासारख्या गोष्टी जर तुमच्या कामात व्यत्यय आणत असतील तर, त्यापासून थोडे दूरच राहा.
१३. शिक्षा द्या –
एखादं काम तुम्ही वेळेत पूर्ण करू शकला नाहीत तर, त्याची स्वतःलाच अद्दल घडवण्यासाठी म्हणून शिक्षा द्या. शिक्षा म्हणून तुम्ही तुम्हाला न आवडणारी गोष्ट करू शकता.
१४. खेळासाठी वेळ काढून ठेवा –
हो, हे थोडस विचित्र वाटत असले तरी, आपल्याला निवांत, मोकळं आणि रीलॅक्स वाटावं म्हणून थोडा वेळ काढून ठेवा.
हा वेळ जर खेळासाठी दिला तर, याचा तुमच्या शारीरिक आरोग्याला देखील फायदा होईल.
१५. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी डेडलाईन ठरवा –
कामाची छोट्या छोट्या गटात विभागणी केल्यानंतर प्रत्येक टप्प्यासाठी एक डेडलाईन निश्चित करा.
१६. पैज लावा-
तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीशी किंवा मित्राशी पैज लावा, की अमुक एक काम मी अमुक वेळेत पूर्ण न केल्यास त्याला कॉफी देईन किंवा त्याचे आवडते पुस्तक गिफ्ट म्हणून देईन.
आठवड्यानंतर जर तुमचे काम झाले नसेल तर, त्या व्यक्तीला दिलेले प्रॉमिस पूर्ण करा.
==
हे ही वाचा : यशस्वी लोकांमध्ये हमखास आढळतात या सवयी, तुमच्यात यापैकी किती आहेत?
==
१७. कामात रस निर्माण करा –
तुम्हाला दिलेला प्रोजेक्ट जर बोरिंग वाटत असेल तर ते टाळण्याची लाख बहाणे तुम्ही शोधाल. असे असेल तर तेच काम थोड्याशा इंटरेस्टींग पद्धतीने कसे करता येईल याच्या कल्पना शोधा.
या १७ सोप्या परंतु अतिशय परिणामकारक युक्ती वापरूनच यशस्वी लोक ही “चालढकल”ची सवय कायमस्वरूपी संपवतात.
तुम्हीपण या टिप्सचा वापर करा आणि तुमच्यातील यशस्वी मनुष्याला उत्तुंग ठिकाणी नेऊन ठेवा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.