आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पावसाळा संपलेला असेल, पण पावसाने या धरतीवर केलेली कलाकारी अजूनही जिवंत असेल. वर्षातील हे दिवस म्हणजे निसर्गाची अप्रतिम कलाकारी, वैशिष्ट्यपूर्ण विहंगम दृश्ये अनुभवण्याची अगदी योग्य वेळ.
या ऑक्टोबर मध्ये ट्रीप प्लॅन करताय?
मग आम्ही तुम्हाला देत भारतातील अशी काही डेस्टिनेशन्सची यादी जी तुमची ही ट्रीप अगदी, अविस्मरणीय बनवतील!
१. पचमार्ही, मध्यप्रदेश –
मध्यप्रदेश मधील एकमेव हिलस्टेशन, पचमर्ही, याला सातपुडा पर्वताची राणी म्हणूनही ओळखले जाते. या दिवसात निसर्गसौंदर्य असे खुललेले असते की, इथून दिसणारी विहंगम दृश्ये अगदी भुरळ पाडणारी असतात.
भारतात ऑक्टोबर मध्ये पाहण्यासारखे हे एक अत्यंत सुंदर ठिकाण!
२. कच्छ, गुजरात –
ऑक्टोबर मध्ये एक रात्र पांढऱ्या शुभ्र वाळूत उभारलेले झोपड्या अशा मस्त वातावरणात घालवू शकता. पाकिस्तानच्या सीमेलगत लागून असलेल्या या ठिकाणी पुरातन वस्तू, मंदिरे आणि अभयारण्ये अशा सर्व प्रकारची पर्यटनस्थळे या ठिकाणी पाहायला मिळतील.
पांढऱ्या शुभ्र वाळूत उगवलेला चंद्राच्या शीतल छायेचा आनंद लुटणे, हा एक अद्भुत अनुभव असू शकतो.
३. हंपी, कर्नाटक –
युनेस्कोने जाहीर केलेल्या ३२ वारसा स्थळांपैकी एक स्थळ आहे हंपी!
१३व्या शतकातील विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणजे हंपी! या शहरातील काही निवांत क्षण या ठिकाणी तुम्हाला तुमच्या धावपळीच्या, दगदगीच्या आयुष्यातून बाहेर काढतील!
४. झिरो, अरुणाचल प्रदेश –
ऑक्टोबर मधील अद्भुत वातावरण आणि अरुणाचल प्रदेशामधील हे एक विहंगम दृश्याचा नजराणा उलगडणारे मोहक ठिकाण! चोहोबाजूनी पर्वतरंगानी वेढलेला आणि एका बाजूला सळसळणारी हिरवीगार भात शेती!
हिवाळ्यातील मनमोहक वातावरणात या ठिकाणी भेट देणे तुमच्या ट्रीपचा आनंद द्विगुणीत करतील!
५. दार्जीलिंग, पश्चिम बंगाल –
डोंगर दर्यांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाची ऑक्टोबर ट्रीप, तुम्हाला एक रोमांचक अनुभव देईल.
पावसाळा संपल्यानंतर दार्जीलिंग मधील हे डोंगरदरी अंगभूत सौंदर्याने खुलून येतात.
धर्मस्थळे, राष्ट्रीय उद्याने, खोल दऱ्या, ढगांशी स्पर्धा करणारी पर्वत शिखरे, अशा अनेक प्रकारच्या पर्यटन स्थळांनी सज्ज असलेले दार्जीलिंग तुमच्या ऑक्टोंबर ट्रीपच्या यादीत असलेच पाहिजे.
६. हृषीकेश, उत्तराखंड –
रोमांचकारी पर्यटन स्थळांपैकी भारतातील एक ठिकाण म्हणजे उत्तराखंड मधील दार्जीलिंग! हरिद्वार हा जुळ्या शहरासोबत हृषीकेश एक पवित्र धर्मस्थळ देखील आहे.
रिव्हर राफ्टींग, बंजी जम्पिंग असे खेळ खेळण्यास हे उत्तम ठिकाण आहे.
७. दिघा, पश्चिम बंगाल –
समुद्र किनाऱ्याची ओढ कुणाला नसते, दिघा हा पश्चिम बंगाल मधील एक अत्यंत सुंदर समुद्र किनारा! कातर संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी अगदी पर्फेक्ट स्थळ!
८. वायनाड, केरळ –
बंगळूरू सारख्या धावपळीच्या शहरापासून दूर जाऊन निवांत क्षण घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण!
वायनाडला जायचे तर चेंब्रा शिखरवर ट्रेकिंग आणि वायनाड राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायलाच हवी. ऑक्टोंबरमध्ये तर इथले हवामानदेखील आल्हाददायक असते.
९. वर्काळा केरळा –
स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा, किनाऱ्यावर डोलणारे पाम वृक्ष, बाजूला पर्वत रांगा, इतकं सारं एकाच ठिकाणी पाहायला मिळालं तर…!
असंच एक ठिकाण म्हणजे केरळ मधील वर्काळा!
यातच भर म्हणजे पुरातन किल्ले, संतांची समाधी आणि पुरतन मंदिर…. देखील… ऑक्टोबरमध्ये भेट देण्यासारखे एक अत्यंत सुंदर ठिकाण.
१०. नैनिताल, उत्तराखंड –
भारतातील एक नयनरम्य आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे नैनिताल! ऑक्टोंबर मध्ये वातावरण फारसे थंड नसते. येथे तलावाच्या काठावर होणारा सूर्यास्त पाहणे हे एक जबरदस्त सुंदर दृश्य आहे.
बोटिंग, ट्रेकिंग, हॉर्स-रायडींग अशी अनेक अॅडव्हेंचर गेम येथे उपलब्ध आहेत.
११. मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम –
ऑक्टोबर मध्ये भेट देण्यासारखे हे एक अत्यंत सुरेख ठिकाण! युनेस्कोन जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणात याचा देखील समावेश होतो.
या राष्ट्रीय उद्यानाला पर्यावरणाच्या दृष्टीने देखील खूप महत्व आहे. म्हणूनच या उद्यानाला वाघांसाठी राखीव वनक्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
भुतानच्या राजाच्या ऐतिहासिक वाड्याला देखील तुम्ही येथे भेट देऊ शकता.
१३ गणपतीपुळे, महाराष्ट्र –
समृद्ध समुद्र किनाऱ्यानी नटलेले गणपतीपुळे हे एक महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यालगत वसलेल्या गावांपैकी हे एक.
इतर ठिकाणी पर्यटकांची अफाट गर्दी असते, तसे गणपतीपुळ्याला नसते. इथे पांढऱ्या शुभ्र वाळूच्या मधोमध गणपतीचे सुंदर मंदिर उभे आहे.
१४. जोधपुर, राजस्थान –
अनेक हिंदी चित्रपटांच्या शुटींग इथल्या मेहरांगड किल्ल्यावर केलेले आहे. या गावातील अनेक घरे निळ्या रंगाने रंगवलेली आहेत, म्हणून याला ब्ल्यू सिटी म्हणूनही ओळखले जाते.
राजस्थानच्या सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय सौंदर्याची मनमुराद अनुभूती घेण्यासाठी हे ठिकाण अत्यंत योग्य आहे.
१५. पावापुरी,नालंदा –
नालंदापासून हे ठिकाण अवघ्या २० किमी अंतरावर आहे. जैन धर्मात या ठिकाणाला पवित्र मानले जाते. गावाच्या अगदी मधोमध भगवान महावीरांची समाधी असून येथे, खूप सुंदर मंदिर बांधले आहे.
पुरातन स्थापत्यशास्त्राचे सुंदर नमुने येथे पाहायला मिळतात.
१६. नालंदा, बिहार –
भारताच्या गौरवशाली भूतकाळाचा साक्ष देणारे ठिकाण. प्राचीन भारतातील शैक्षणिक संकुलासोबतच समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा. ऐतिहासिक पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध ठिकाण.
जगातील सर्वात प्राचीन विश्वविद्यालय इथेच आहे. या ठिकाणी आज पुरातन मंदिरे, धर्मस्थळे आणि शैक्षणिक केंद्रे आजही आपल्या खाणाखुणा टिकवून आहेत.
१७. बीर बिलिंग, हिमाचल प्रदेश –
हिमाचल प्रदेश मधील एक छोटेसे गाव. अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे. ऑक्टोंबरमध्ये भेट देण्यासारखे एक सुंदर ठिकाण! या गावाला “टाऊन फॉर मेडीटेशन” म्हणूनही ओळखले जाते.
१८. स्पिती खोरे, हिमाचल प्रदेश –
ट्रेकिंगचे धर्मस्थळ आणि पृथ्वीवरील पवित्र स्वर्ग अशी याची ख्याती आहे. चारही बाजूनी हिमालयाच्या पर्वतरांगा…!
या ठिकाणी वर्षातील फक्त २५० दिवस सूर्याची किरणे उगवतात. देशातील अत्यंत थंड हवेचे ठिकाण!
१९. मैसूर, कर्नाटक –
याला सिटी ऑफ पॅलेस म्हणून देखील ओळखले जाते. देशातील एक अत्यंत मनमोहक ठिकाण म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ऐतिहासिक शाही वारसा, अगम्य स्थापत्यशास्त्र, प्रसिद्ध सिल्क साड्या आणि चंदनासाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
ऑक्टोबर मध्ये भेट देण्यासारखे एक सुंदर शहर!
याच काळात इथे साजरा केला जाणारा दसरा देखील जग-प्रसिद्ध आहे.
२०. कलकत्ता, पश्चिम बंगाल –
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर! भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले हे शहर पश्चिम बांगलची राजधानी आहे. कला, संस्कृती आणि बौद्धिक राजधानी अशीही या शहराची ओळख आहे.
या शहराला “सिटी ऑफ जॉय” म्हणून ओळखले जाते.
२१. शिमला, हिमाचल प्रदेश –
शिमला, हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. चोहोबाजूंनी वेढलेल्या सुंदर पर्वत रांगा आणि गूढ घनदाट जंगले. फक्त २२०० मीटर उंची वर वसलेले हे शहर हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठे शहर आहे.
गेल्या पन्नास वर्षात पर्यटकांनी याला भरपूर पसंती दिली आहे. एक अत्यंत रमणीय आणि ऑक्टोबर ट्रिपसाठी पर्फेक्ट ठिकाण!
काय मग?
ठरला प्लॅन?
आम्हाला कळवायला विसरू नका!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.