Site icon InMarathi

खरं वाटणार नाही पण पुरुषांच्या दाढीमुळे स्त्रियांना होत आहेत गंभीर आजार

Beard and STD IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : डॉ निलेश वाघमारे, पुणे
(सदर वैद्यकीय व्यावसायिक गेले २० वर्षे वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत)

===

दाढी – Passion की Fashion की आजाराचे कारण?

आजकाल सगळीकडे दाढी राखायचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण यातील धोका कुणी लक्षात घेताना दिसत नाहीये.

आजकालची जीवन पद्धती अतिशय वेगवान झालेली आहे. माणसांना दिवसाचे २४ तासही पुरत नाहीयेत. त्यामुळे दाढी राखणे व दाढीची स्वच्छता राखणे हे जोखमीचे काम झाले आहे.

 

 

मी स्वतः एक वैद्यकीय व्यावसायिक आहे. या महिन्यात माझ्याकडे किमान १० महिला urinary tract infection मुळे बाधित होऊन आलेल्या मी पाहिल्या. त्यातील काही recurrent त्रासाने बाधित होत्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

माझ्या एक लक्षात आले की त्यांचे पती किंवा अविवाहित मुलींचे “मित्र” दाढीधारी होते. क्षणात माझ्या मनात एका विचाराने उसळी मारली.

मी पुन्हा पुस्तके चाळली आणि गुगल सुद्धा केले.

आणि माझ्यासमोर त्या प्रश्नाचे उत्तर उलगडले.

 

 

आजार हटवणे हे तर आमचे कामच पण “आजाराचे कारण शोधून ते दूर केल्यास आजाराला कायमचा उपशय मिळतो” हे तत्व गुरुजनांनी मनावर बिंबवलेले होतेच.

बऱ्याचदा मूत्र मार्ग योनी मार्ग येथे रोग जंतूंची बाधा होते. त्यात फंगल इन्फेक्शन असते. तसेच सामान्यपणे खालील जन्तु असतात :

E Coli

Enterococcus Faecalus

Staphylococcus Aureus

 

विषय आणखी गहन न करता मूळ मुद्द्यावर येऊ या.

फंगल इन्फेक्शन आदी गोष्टी स्वच्छता न पाळल्याने,ओले कपडे घालण्याने अशा अनेकविध कारणांनी होऊ शकते. पण बाकीचे बॅक्टरीया यांचा सोर्स बघता मला आश्चर्यमिश्रित धक्का बसला…

कारण – आधी म्हटल्याप्रमाणे – या रुग्णांमध्ये एक गोष्ट समान होती की – यांचे पार्टनर हे दाढी राखणारे होते…!

 

 

यात दाढीचा काय संबंध आला असे तुम्हाला वाटेल.

पण आजच्या इंटरनेट जमान्यात लैंगिक भावना व पद्धती इतक्या पुढे गेल्या आहेत की सामान्य माणूस हैराण होऊ शकतो. या रुग्णांचा इतिहास मी थोडा घाबरत घाबरत विचारून घेतला.

त्यांच्या पती/मित्र/पार्टनरला पण सोबत ठेवले. बोलते केले. तर लक्षात आले की त्यांच्या लैंगिक क्रीडांमध्ये oral sex होतोच होतो.

आणि मला लगेच click झाले आणि मनात शिक्कामोर्तब झाले की दाढी हाच या बॅक्टरीयांचा सोर्स असला पाहिजे.

मी त्यांना गुगलवर सर्च करायला सांगितले. जे मी पाहिले ते त्यांनी सुद्धा पाहिले आणि मग सर्व प्रकरण त्यांच्याही लक्षात आले.

अभ्यासानंतर असं लक्षात आलं होतं की एखादया कुत्र्याच्या केसांमध्ये जेवढे बॅक्टरीया असतात तेवढेच दाढीमध्ये सुद्धा असू शकतात. (शास्त्रीय अभ्यासाच्या लिंक्स लेखाच्या शेवटी देतोय.)

स्त्रियांचा योनीमार्ग व जननमार्ग जरी वेगळा असला तरी मूत्रमार्गाची लांबी कमी असते. Oral sex करताना दाढीधारी पुरुष त्याच्या लाळेबरोबर दाढीतील बॅक्टरीया तिथे सोडत असतो. त्यामुळे हे सतत इन्फेक्शन होत होते.

तेथील जनन मार्गातील भागाची pap smear नावाची तपासणी सुद्धा तेच दर्शवत होती.

 

तसेच बरेच वेळा हे लक्षात येते की दाढी ठेवणारे पुरुष त्या प्रमाणात हायजीन ठेवताना दिसत नाहीत. ट्रिम करण्यासाठी ते सलून मध्ये जातात, पण सलुनमध्ये सुद्धा कात्र्या किंवा झिरो मशीन हे काय वैद्यकीय दृष्ट्या किंवा वैद्यकीय पद्धतीने स्वच्छ केले जात नाहीत.

स्टरलाजेशन किंवा निर्जंतुकीकरण करणारे सलून कधी कुणी पाहिले काय?

यात त्या स्त्रियांचा काहीएक दोष नसताना त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यात मला तर अविवाहित पण लैंगिक क्रीडाग्रस्त स्त्रियांची जास्त काळजी वाटते. त्याचे कारण आजारपण तर आहेच, पण रुबेला सारखा जंतू जर गर्भाशय पर्यंत लागण झाला तर primary infertilty म्हणजे वंध्यत्व सुद्धा येऊ शकते.

 

 

म्हणूनच यापुढे दाढीधारी व्यक्तींनी खूप काळजीने निगुतीने आपल्या दाढीकडे लक्ष द्यावे एव्हढंच या निमित्ताने सांगणे…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version