Site icon InMarathi

KBC १००० – कट्टर फॅन्सना देखील ठाऊक नसतील शो मधील या २१ गोष्टी

kbc 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“कौन बनेगा करोडपती” हा भारतीयांचा एक अत्यंत आवडता टीव्ही शो आहे. मध्यमवर्गीय सामान्य माणसात एक करोड रुपये जिंकण्याची आकांक्षा या शो ने जागवली. काळानुसार ही किंमत देखील वाढत गेली.

नुकतंच या शोचे १००० भाग पूर्ण झाले आहेत. १०००  भागाचे विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि त्यांचीच नातं नव्या नवेली नंदा, या दोघी १००० भागात सहभागी झाल्या आहेत. शोचा प्रोमो कालच सगळीकडे दाखवला जात आहे.

 

 

गेली २१ वर्ष हा शो हिट ठरण्यामागच कारण म्हणजे बिग बी सारख्या अभिनेत्याने आपल्या खास शैलीत केलेले याचे होस्टिंग! २००० मध्ये सुरु झालेल्या या शोने प्रेक्षकांना अक्षरश: टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवले. २०१४ मध्ये काही तांत्रिक कारणाने या शोचे प्रसारण बंद करण्यात आले होते.

 

 

या शोचे यापूर्वीचे सीजन स्टार प्लस वरून प्रसारित केले जायचे. नवव्या सीजन पासून सोनी टीव्हीवरून प्रसारित होतोय.सध्या १३ सीजन सुरु आहे. यातला एक सीजन शाहरुख खानने होस्ट केला होता. 

 

 

परंतु, तुमच्या अत्यंत आवडत्या अभिनेत्याद्वारे होस्ट केल्या जाणाऱ्या, या तुमच्या आवडत्या शोबद्दलच्या या काही खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

१. तुम्हाला जर वाटत असेल की, कौन बनेगा करोडपतीचा सेट टीव्हीवर जितका मोठा दिसतो तितकाच मोठा असेल, तुम्ही चुकीचा विचार करताय. हा सेट अगदी छोटा असून बाहेरून, हा सेट एखाद्या गॅरेज किंवा रेल्वेच्या डब्यासारखा दिसतो.

 

 

२. केबीसी सीजन ९ चे शुटींग मुंबई फिल्म सिटी मध्ये होत आहे. जिथे बिग बी ने या शो च्या पहिल्या भागाचे शुटींग केले होते. तब्बल १७ वर्षानंतर ते या ठिकाणी या शोचे शुटींग करत आहेत. बिग बी हे ठिकाण लकी असल्याचे मानतात.

परंतु सेटवर पुरेशी हवा खेळती राहील आणि ए.सी. सुरु राहतील याची पुरेपूर काळजी घेतली जाते. केबीसीचा सेट पूर्वी गोरेगांव मध्ये होता, २०१२ मध्ये तो हलवून वायआरएफ स्टुडीओमध्ये नेण्यात आला.

 

 

३. केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रत्येक स्पर्धकाबद्दलची संपूर्ण वैयक्तिक माहिती बिग बीकडे असते. शो सुरु होण्यापूर्वी ते सेट वर जाऊन ही शोच्या सदस्यांकडून त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे काम करतात.

 

 

४. केबीसीमधील स्पर्धक जिंकलेले असो, हरलेले असो किंवा त्यांनी खेळ अर्ध्यातून सोडलेला असो, जोपर्यंत शोचे संपूर्ण शुटींग संपत नाही तोपर्यंत त्यांना सेट सोडून बाहेर जाऊ दिले जात नाही.

 

 

५. या शोमध्ये प्रश्न विचारणाऱ्या आणि उत्तर लॉक करून घेणाऱ्या कॉम्पुटरजी  बद्दल तर तुम्हाला माहिती असेलच. खरंतर हे सगळे करण्यासाठी एक माणूस नेमलेला असतो जो जागेच्या कमतरतेमुळे बिग बी च्या खुर्ची शेजारी खाली जमिनीवर बसूनच हसत मुखाने आपल्या मॅक बुक किंवा आयपॅडवरून या गोष्टी हाताळत असतो.

स्पर्धकाच्या उत्तर देण्याच्या क्षमतेनुसार यातील प्रश्नांची काठीण्य पातळी ठरवली जाते.

 

हे ही वाचा – जेव्हा परवीन बाबीने केले होते अमिताभवर “अतिशय गंभीर” स्वरूपाचे आरोप

६. केबीसी पाहण्यासाठी आलेल्या सेटवरील सर्व प्रेक्षकांना खाऊ दिला जातो, जो अगदी फ्री असतो.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांविना अतिरिक्त प्रेक्षकांना सेटवर परवानगी नाही.

 

 

७. सेटवर शो पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी टिकून राहावी म्हणून अमिताभ बच्चन आपल्या खास शैलीत विनोद सांगून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम करत असतात.

 

 

८. बिग बी च्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या शोचा सीजन २ लवकर संपवण्यात आला होता.

 

 

९. या शोच्या तिसर्या सीजनचे होस्टिंग शाहरुख खानने केले होते. बिग बी ऐवजी या शोचे होस्टिंग करणारा तो एकमेव कलाकार आहे.

 

 

१०. ‘फास्टेस्ट फिंगर फस्ट’ या केबीसीच्या पहिल्या राउंडमध्ये पोचण्यासाठी तुम्हाला एसएमएस राउंड, दुसरा पर्सनल कॉल राउंड आणि तिसरा ऑडिशन राउंड – असे तीन टप्पे पार करावे लागतात.

 

 

११. ‘फास्टेस्ट फिंगर फस्ट’ राउंड जिंकल्यानंतर जो विजेता हॉट सीटवर बसणार असतो, त्याला मेकअप करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मध्ये ब्रेक घेतला जातो.

 

 

१२. १८ वर्षाच्या खालील मुलांना कॅमेऱ्याच्या जवळ बसवलं जातं, ते हॉटसीट वरील स्पर्धकाचे नातेवाईक असतील तरच त्यांना स्क्रीनवर दाखवलं जातं.

 

 

१३. यापूर्वीच्या सीजन मध्ये केबीसीच्या सेटच्या छतावर बसून कबुतर त्रास देत असत. त्यांचा आवाज रेकॉर्ड होऊ नये म्हणून टीम मधील लोकं त्यांना घाबरवून पळवून लावत. ती कबुतरं जात नाहीत, तोपर्यंत शोचे शुटींग थांबवण्यात येई.

 

 

१४. स्पर्धकाने जिंकलेल्या १ करोडमधील ३०% रक्कम प्राप्तीकर म्हणून तिथेच कट करून घेण्यात येतो. त्यामुळे स्पर्धकाला फक्त ७० लाख रुपयेच मिळतात.

 

हे ही वाचा – अमिताभजी, तुमची पुरुष-सत्ताक विचारसरणी सोडून द्या : KBC च्या प्रेक्षकांचा सल्ला…

१५. या शोच्या प्रत्येक एपिसोडला अमिताभ बच्चन जो सुट परिधान करतात, त्याची किंमत जवळपास १० लाख रुपये इतकी असते.


 

१६. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लॉक करण्यापूर्वी ते अमिताभ बच्चनला माहित असतं अशी एक सर्वमान्य समजूत आहे, जी पूर्णतः चुकीची आहे.

 

 

१७. सेटवर येताना बिग बी उजव्या बाजूने एन्ट्री करतात पण, कॅमेराचा फोकस बॅकग्राउंडवर जास्त असल्याने, ते एखाद्या गुप्त रस्त्याने सेटवर आले असतील असा भास होतो.

 

 

१८. शोचे शूट सुरु होण्यापूर्वी बिग बी आपली पूर्ण स्क्रिप्ट वाचून घेतात. तोपर्यंत सर्व स्पर्धक देखील शोसाठी ड्रेस घालून तयार होतात.

 

 

१९. शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला आणि त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबाला भेटून बिग बी त्यांची विचारपूस करतात आणि ऑटोग्राफ देखील देतात. बिग बी आपल्या चाहत्यांना कधीच नाराज करत नाहीत.

 

 

२०. २००० मध्ये केबीसीच्या पहिल्या सीजनचा विनर हर्षवर्धन नवाथे हा होता. ज्याने एक करोड रुपयांचे बक्षीस जिंकले होते.

 

 

२१. बिग बीची एक लोकप्रिय सवय म्हणजे सेटवर वेळेत हजर राहणे, त्यामुळे शोच्या सर्वच सदस्यांना वेळेवर हजर राहून शोचे शुटींग वेळेत सुरु करावे लागते.

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version