आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस एकसारखा नसतोच. काही दिवस अगदी आनंदाची बरसात घेऊन येणारे, हास्याची कारंजी फुलवणारे, दिल खुश करणारे असतात, तर काही दिवस उगाच मनाचा हिरमोड करणारेही असतात.
त्यात नोकरी करणाऱ्यांचा तर, मूड कधी खराब होईल सांगता येत नाही. कधी बॉसची कटकट, कधी सहकाऱ्यांचे टोमणे, कधी वैतागवाणा बसचा प्रवास, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात.
पण, याने थोडं उदास व्हायला होतं. अर्थात मूड ऑफ-ऑन हा खेळ सुरूच राहतो, उन-सावली सारखा.
परंतु, या उदासवाण्या मानसिकतेतून लवकर बाहेर पडून पुन्हा उत्साही राहणं आवश्यक आहे, उदासीचा माहौल जास्त काळ रेंगाळत असेल तर, वेळीच त्याला लगाम घालावा लागेल.
उदासवाणा मूड बदलण्यासाठी या काही गोष्टी करून पहा, जीवन नक्कीच सुंदर वाटायला लागेल!
१. कॉमेडी शो-पिक्चर पहा –
ऑफिसमध्ये काही किरकोळ वादावादी झाली असेल आणि त्यामुळे मन उदास झालं असेल तर घरी आल्यावर एखादा कॉमेडी शो किंवा पिक्चर बघितल्याने मूड पुन्हा रुळावर येईल.
याने मनावरील उदास मळभ हटेल. हसल्याने आपल्यातील नकारात्मक गोष्टी बाहेर पडतात. मन ताजतवानं होतं. सकारत्मकता वाढते. झालेल्या गोष्टींचा विसर पडून तुम्हाला आनंददायी अनुभव येईल.
२. गाणी ऐका –
मूड ऑफ असेल तर संगीत ऐकणे हा कधीही उत्तम उपाय ठरू शकतो. संगीताने मनातील नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवता येते. एखाद अपरीचीत गाणं, किंवा ज्या तालावर तुमच्या शरीरालाही डोलावं वाटेल असं गाणं ऐका.
संगीत ऐकल्याने आपल्याला नवी उर्जा मिळते, मूड फ्रेश होतो, आणि डुलायला लावणारं संगीत असेल तर अर्थातच शरीरातील रक्ताभिसरण देखील वाढतं.
ज्यामुळे शरीराचा उत्साह आणि कार्यक्षमताही वाढते. छान उत्साही, आनंदी, वाटायला लागतं. एखादी अपरिचित धून ऐकल्याने देखील तुमचा मूड पुन्हा ठीक होईल.
३. नकारात्मक विचार थांबवा –
एकदा तुमचा मूड बिघडलाय याची तुम्हाला जाणीव झाली की, तुमचे मन नकारात्मक विचारांकडे झुकू लागते. एका क्षणासाठी बिघडलेल्या मूडमुळे संपूर्ण दिवस वाईट जाऊ शकतो.
तेंव्हा नकारात्मक विचारांची ही गती थांबवा. एका मागून एक चुकीचे विचार मनात येण्याआधीच त्यांना थोपवून ठेवा. आपण अशा वाईट विचारांच्या आहारी जायचं नाही, हे पक्क ठरावा.
मूड खराब असतानाही तुम्ही जर स्वतःतील सकारात्मकता जागृत ठेवली तर, त्याने तुमचा संपूर्ण दिवस खराब जाणार नाही. त्यामुळे अधिकचा ताण वाढणार नाही.
४. दीर्घ श्वासोच्छवास करा –
ज्या क्षणी तुम्हाला मन उदास झाल्याची जाणीव होईल तेंव्हा दीर्घ श्वासोच्छवास करण्याची सवय लावून घ्या. दीर्घ श्वासोच्छवास करणे हा मेडिटेशनचाच एक भाग असतो.
यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यास मदत होते. एका निवांत ठिकाणी बसा आणि फक्त दोन मिनिटांसाठी दीर्घ श्वासोच्छवास करा.
यामुळे तुमच्या मूडमध्ये असा जादुई बदल होईल की, तुम्हाला स्वतःला देखील आश्चर्य वाटेल.
–
हे ही वाचा – नोकरी धंद्याच्या तणावामुळे स्वतःला वेळ देता येत नसेल तर मग ह्या १० टिप्स फॉलो कराच!
–
५. दुसऱ्यांच्या कामात मदत करा –
तुमचा मूड जरी खराब असला तरी, अशा वेळी इतरांना त्यांच्या कामात मदत करा. मूड खराब असताना फक्त स्वतःला आनंदी ठेवण्याचा विचार करू नका. इतरांनाही आनंदी ठेवा.
इतरांचा आनंद पाहून तुम्हाला समाधान वाटेल. एखादी छोटीशी मदत देखील तुम्हाला तुमच्या बिघडलेल्या मूड मधून बाहेर येण्यास पुरेशी ठरू शकते.
६. कामावर लक्ष केंद्रित करा –
मूड खराब असताना तुम्हाला काम करावं असं वाटत नसेल पण, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास उदासवाण्या मानसिकतेतून बाहेर पडाल.
तुमचे काम अधिक मन लावून किंवा अधिक सर्जनशील पद्धतीने केल्यास त्याचा तुम्हाला नक्की आनंद होईल, त्यामुळे आपसूकच तुमचा मूड सुधारेल.
७. आवडते पदार्थ खा –
मूड ठीक नसेल तर तुम्हाला आवडणारी एखादी डिश बनवा आणि खा. कधीकधी जिभेचे चोचले पुरवल्याने देखील मूड चांगला होतो.
कधी कधी तुम्हाला एखाद्या कामाचं फार टेन्शन आलेलं नसतं पण तुमच्या शरीराला अधिक उर्जेची गरज असू शकते.
ज्यामुळे तुम्हाला थोडं कंटाळवाण वाटत असेल तर अशावेळी “खाणे” हा देखील एक चांगला उपाय ठरू शकतो.
८. व्यायाम करा –
मूड बदलण्यासाठी व्यायाम किंवा योगा करण्याचा देखील फायदा होतो.
फार वेळ नसेल तरी फक्त दहा मिनिटे जरी तुम्ही फक्त उड्या मारणे किंवा दोरीच्या उड्या मारणे, असे प्रकार केले तरी, यामुळे तुमचा मूड बदलेल आणि तुम्ही पुन्हा फ्रेश व्हाल.
९. चिडचिड करणे टाळा –
एकदा मूड बिघडला की तो कुठे तरी व्यक्त करावा असा वाटेल. उशीवर बुक्क्या मारणं किंवा कुणाशी तरी भांडण करणं, मुलांवर ओरडणं, याचा काहीही फायदा होणार नाही उलट तोटाच जास्त होईल.
त्यामुळे रागाला वाट करून देणे किंवा चिडणे हा काही उपाय नाही. म्हणून मूड खराब असताना कुणावरही त्याचा राग काढू नका.
याने मूड चांगला तर होणार नाहीच उलट त्याला पुन्हा पुन्हा चालना मिळत राहील. यामुळे तुमच्या नात्यात देखील कटुता निर्माण होण्याची शक्यता वाढेल.
१०. पूर्ण विचार करा –
तुमचा मूड वारंवार बिघडत असेल तर, त्याला दाबून ठेऊ नका. नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे हे घडत आहे, त्याचा खोलात जाऊन विचार करा. कोणत्या गोष्टीचा त्रास होतो, ती गोष्ट खरच तितकी महत्वाची आहे का?
म्हणजे वर्तमानपत्रातील एखादी वाईट बातमी वाचल्याने किंवा आणखी काही – तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीचे मूळ नेमके कशात आहे हे एकदा शोधून काढा आणि त्यावर काम करा.
त्या समस्येला चिघळत ठेवण्याऐवजी त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे.
११. पुरेशी झोप घ्या –
कामात लक्ष लागत नाही, नेमकं काय करावं समजत नाही अशी अवस्था असेल तर तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. घरी आल्यावर बेडवर निवांत पडून रहा.
यावेळी झोप आली तरी, खुशाल झोपा. झोप पूर्ण झाल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल.
१२. मेडिटेशन –
मेडिटेशन केल्याने शरीराला आणि मनालाही याचे फायदे मिळतात. राग, चिंता, भीती अशा नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिटेशनचा फार उपयोग होतो. त्यामुळे दहा-पंधरा मिनिटे मेडिटेशन देखील करू शकता.
१३. इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करा –
काही चिंता सातवत असतात तेंव्हा त्यांना बाजुला सारून मन वर्तमानात कसे रमेल याकडे लक्ष द्या. अशावेळी दररोजचे घरकाम केल्याने देखील फायदा होतो.
–
हे ही वाचा – दैनंदिन जीवनात ‘ह्या’ गोष्टी करत नसाल तर यशस्वी होणे अवघड होऊन बसेल!
–
कपड्यांच्या घड्या करणे, पसारा आवरणे, भांडी धुणे, अशी कामे केल्याने देखील मूड बदलतो. स्वच्छ कपड्यांचा सुगंध, साबणाचा वास, खरकटे स्वच्छ केल्याचा आनंद अशा गोष्टींमुळे देखील मूड पुन्हा ताजातवाना होऊ शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.