Site icon InMarathi

गरीब ह्रितिक रोशन ते “गणेश गायतोंडे” : आयफोन्स विनोदांसाठी मिम्सचा पाऊस!

i phone memes inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

फ्री इंटरनेटमुळे आजकाल काहीही व्हायरल होतं, किंवा प्रसिद्ध होऊन जातं, आणि यात सिंहाचा वाटा असतो तो मिमस्टर्सचा. मिम हा प्रकार विनोदी आणि मनोरंजनाचा भाग आहे. या मध्ये एखादा फोटो किंवा व्हिडिओ घेऊन त्यावर टेक्स्ट टाकून किंवा ते एडिट करून तयार केले जातात.

कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती किंवा गोष्ट असेल, तर या लोकांच्या वक्तव्यावर या मिमकरांचं बारकाईने लक्ष असतं, किंवा नवीन कोणता चित्रपट आला, आणि त्यात काही विनोदी दिसलं तर त्याचे मिम तयार झालेच म्हणून समजा. बराचवेळा हे मिम जनसमान्यांवर पण होतात.

काही लोक मिमद्वारे सामाजिक प्रश्न देखील मांडतात, त्यातले त्यात राजकारण्यांवर होणारे मिम तर अफाट असतात. एवढंच काय तर आपल्या पंतप्रधानांवर देखील खूप मिम्स होतात, एकदा त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही हे मिम पाहता का तर त्यांनी या मिमकरांचं कौतुक केलं.

एवढं सगळं कसकाय सुचतं अस देखील म्हणले. हे मिमकर दररोज काही ना काही विषय शोधतच असतात. सध्या एक खूप महत्त्वाचा विषय त्यांनी धरलाय.

व्हिजनरी उद्योजक स्टीव्ह जॉब्ज यांच्या स्वप्नातून साकारला गेलेला i phone सर्वांना माहिती आहेच. जगभरातल्या “प्रतिष्ठित” लोकांमधे आयफोन वापरण्याची प्रचंड क्रेझ आहे.

slashgear.com

आता झालंय असं की अँपल या कंपनीने त्यांचा नवीन आय फोन इलेवन लाँच केला आहे. या मध्ये बरेच काही नवीन फीचर्स आहेत. याला रेअर साइड ला ३ कॅमेरे आहेत, आणि ही गोष्ट जास्त आकर्षक ठरतीये.

आता हा फोन आहे अँपल या कंपनीचा आणि या कंपनीचा फोन म्हणजे याची किंमत सर्वसामान्यांना मुळीच झेपणार अशी असते. याचे चांगल्यात चांगले फोन हे ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे आहेत. आता नवीन आलेला फोनची किंमत त्याहूनही जास्त असणार.

या किंमती इतक्या जास्त आहेत की किडनी विकावी लागती की काय असं सगळ्यांचं म्हणणं आहे, आणि हाच जोक सर्व मिमकरांचा कॉन्टेक्सट आहे. सध्या सगळ्यात जास्त कोणत्या विषयावर चर्चा किंवा मिम्स होत असतील तर ते आहे आय फोन इलेवन आणि त्याची किंमत, हे मिम्स बघून खूप हसायला येतं.

एकाने हृतिक रोशनचा त्याच्या नवीन चित्रपटाचा फोटो घेऊन आणि सुपर थर्टी चा फोटो घेऊन आय फोन घेण्या आधी आणि घेतल्या नंतर असा बिफोर आफ्टर मिम बनवलं आहे, जे बऱ्यापैकी व्हायरल होतंय.

 

काहींनी सेक्रेड गेम्स मधल्या गायतोंडेचे किंमत पाहून रडतानाचे फोटो एकत्रित टाकले आहेत. एकाने भरपूर किडनी जोक्स होताएत असं सांगणारं एक मिम बनवलं आहे. या कार्टून चा असा वापर कदाचित कोणालाच सुचला नसणार.

 

 

जसं की पेमेंट ऑपशन्स असतात, कार्ड/कॅश वगैरे तर एकाने त्यात किडनीचा ऑपशन टाकलाय.

 

तर काहींनी त्याच्या कॅमेराचा वापर करून मिम तयार केलेत, ज्यात त्या तीन कॅमेराचा चेहरा झालाय, आणि किंमत बघून ताचे देखील तोंड आणि डोळे मोठे झालेत.

 

 

क्रिएटिव्हिटी ला लिमिट नसते – असं जे म्हणतात – ते सिद्ध करणाऱ्या अशाच काही धमाल मिम्स :

 

अश्या अनेक प्रकारात मिम्स तयार केले आहेत, जे सध्या सर्व नेटकरांचं मनोरंजन करत आहेत.

थोडक्यात – आयफोन अनेकांना प्रेरणा देत असतो – असं जे म्हणतात ते काही खोटं नाही! 😉

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version