Site icon InMarathi

मनाच्या नाज़ुक मर्मस्थळावर अलगद मऊ कापसाचा बोंडा ठेवणारं : “आवारापन, बंजारापन”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका: सुलेखा पांडे

=== 

जाने ये कैसी आग लगी है इस में धुआँ ना चिंगारी,
हो न हो इस पर कहीं कोई ख़्वाब जला है सीने में,
आवारापन बंजारापन …

कितीतरी गाणी, कित्येक भाषेत आहेत, पण काही गाणी अशी असतात जी आपल्या मनाच्या सर्वात नाज़ुक मर्मस्थळावर अलगद हात फेरुन मऊ कापसाचा बोंडा ठेवतात.. हे गाणं ही तेच करतं..

मला माहीत नाही सगळ्यांबरोबर असं होतं की नाही, पण मला संध्याकाळी किंवा तिन्हीसांजेला अस्वस्थ वाटतं, लहानपणी आम्ही रोज़ समुद्रावर जात असत आणि तीच संवय आहे की काय, पण इकड़े समुद्र नसल्यामुळे मला अगदी बेचैन वाटतं.

मी जिस्म सिनेमा पाहिला तेव्हांपासून मी ह्या गाण्याच्या प्रेमात पडले.

जॉन अब्राहम खरंच एक वाया गेलेला प्रोफ़ेशनल दिसतोय ह्या गाण्यात. शुटिंग कुठं केलं आहे ते तर माहीत नाही, पन लोकेशन सुरेख आहे.

तो अफ़ाट समुद्र आणि हा एकटा जीव, इकडून तिकड़े उड्या मारतोय आपला…!

 

 

त्याचं डिप्रेशन, व्यथा, हतबलता, विवशता सगळं फ़क्त बॉडी लैंग्वेजनं व्यक्त केलं गेलं आहे

इस धरती पर जिस पल सूरज रोज़ सवेरे उगता है,
अपने लिए तो ठीक उसी पल रोज़ ढला है सीने में,
आवारापन बंजारापन …

सकाळ सगळ्यांना उठवते, जागं करते, पण हा म्हणजे सकाळीच सुर्यास्त अनुभवतो.. हताशा, अव्यक्त दुःख आणि व्यथा फ़क्त दोन लाइन्स मधे…

कहाँ किसी के लिए है मुमकिन सब के लिए एक सा होना,
थोड़ा सा दिल मेरा बुरा है, थोड़ा भला है सीने में,
आवारापन बंजारापन …

 

आपण किती वेगळं वागतो सगळ्यांबरोबर, एकसारखं वागणं संभव नाही, तरीही हा एडमिट करतोय, थोड़ा सा दिल मेरा भला है, थोड़ा बुरा है सीने में. लिरिक्स असो, किंवा म्युज़िक, एकदम स्लो, शांत, संथ गती आहे ह्या गाण्याला.

एका धुक्याच्या मलमली चादरीसारखं हे तुम्हाला गुरफटून तुमच्याच आत बघायला लावतं. आत कुठेतरी एक मर्मस्थळ असतं, हे गाणं एका सोनेरी किल्लीनं ते कुलूप लावलेलं दार हळूचकन उघड़तं, आत मधे शिरतं आणि मनाचा ताबा केव्हां घेतं, ते कळत नाही..

दिल जिस चीज़ को हाँ कहता है, ज़हन उसी को कहता है ना,
इश्क़ में उफ़ ये ख़ुद ही से लड़ना एक सज़ा है सीने में,
आवारापन बंजारापन ..

मनोहर श्याम जोशी (हम लोग/बुनियाद/कसप फ़ेम) आपल्या एपिक लव स्टोरी “कसप” मधे लिहितात..

‘ज़िंदगी की घास खोदने में जुटे हुए हम जब कभी चौंककर घास, घाम और खुरपा तीनों भुला देते हैं, तभी प्यार का जन्म होता है.. या यों कहना चाहिए कि वह प्यार ही है, जो हमें चौंकाकर बाध्य करता है कि घड़ी दो घड़ी घास, घाम और खुरपा भूल जाएं”…..

प्रेम करणं कधीही सोपं नसतं,

 

जो एक-दूसरे से प्यार करते हैं, वे लौकिक अर्थ में एक-दूजे के लिए बने हुए होते नहीं (कसप) स्वतः वर केलेला सर्वात मोठा अन्याय असतो कोणावर स्वतःहून जास्त प्रेम करणं.

एक सूड़ उगवतो आपण आपल्या मनावर, एक झुंज असते आपल्या मनाची आणि मेंदू ची.. एक होकार देत असतो आणि दुसरा सतत नकार…

ख़ंजर से हाथों पे लकीरें कोई भला क्या लिख पाया,
हमने मगर इक पागलपन में ख़ुद को छला है सीने में,
आवारापन बंजारापन …

 

YouTube

हातच्या रेशा, भवितव्य असतं तेच राहतं.. काही केल्या बदलत नाही, सुरा घेऊन नवीन रेशा काढल्या तरी ही नशिब बदलत नाही…
मी ते केलं, हातही जख़्मी केले आणि नशिब ही बदललं नाही.. हात मात्र रक्त बंबाळ करून घेतले…

ये दुनिया ही जन्नत थी, ये दुनिया ही जन्नत है,
सब कुछ खोकर आज ये हम पर भेद खुला है सीने में,
आवारापन बंजारापन …

झालं, संपलं….

स्वर्ग आणि स्वर्गच फ़क्त इथेच आहे.. सगळं गमावून कळलं ते..

२००३ ला आलेला हा सिनेमा, आणि यूट्यूब वर मिलियन्स व्यूज़, त्यात माझेच ५०००० असतील.

कसंतरी होतं ऐकून..

एक बिटरस्वीट फ़ीलिंग, एक अनाम ओढ़ वाटते जॉनच्या दुर्दैवी पात्राची..

त्याचं ते भरकटणं एका उद्दाम पंख तुटलेल्या पाखरासारखं, आपल्या विवश परिस्थितीतून सुटण्याचा निरर्थक प्रयत्न जीवघेणा वाटतो…

एकदम सहज चित्रांकन आणि एकदम स्लो पेस वर मद्धम गाणं…!

आवारापन, बंजारापन
चित्रपट: Jism 2003.
संगीतकार: M M Kreem
गीतकार: Sayeed Quadri
गायक द्वय: K K, M M Kreem

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version