' ‘जांभई’ संसर्गजन्य असते का? त्यामागचं रोचक उत्तर जाणून घ्या! – InMarathi

‘जांभई’ संसर्गजन्य असते का? त्यामागचं रोचक उत्तर जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ऑफिसमध्ये एका सहकाऱ्याला जरी जांभई आली तरी, आपणही त्या कांटाळवाण्या कृतीत कधी सामील होतो ते कळतही नाही.

समोरचा जांभई देत असेल तर, आपल्या तोंडूनही नकळत जांभई निघून जाते.

आपल्याला कंटाळा आला आहे, हे ओळखण्याचं एक चिन्ह म्हणजे जांभई!

 

yawing 4 InMarathi.jpg

 

पण, समोरच्याला कंटाळा आला की लगेच आपल्यालाही कंटाळा येतो का?

असं म्हंटल जातं की, जांभई ही संसर्गजन्य असते. एकाला जांभई आली की, तिथे उपस्थित असणाऱ्या काही लोकांना जांभई येतेच. पण, यावर विज्ञानाचं मत नेमकं काय आहे, वाचा विज्ञानाचं रोचक उत्तर!

आपण अशीच जांभई देतो की तो आपल्याला आपल्या कामात स्वारस्य नसल्याचे द्योतक असतो?

जांभई कशी असते ते आपल्या सर्वानांच माहिती आहे. संपूर्ण जबडा उघडून आपण जोरात श्वास बाहेर सोडतो. बऱ्याचदा जांभई दिल्यानंतर आपण उसासा देखील सोडतो.

 

yawing 1 InMarathi

 

खर तर सर्वच प्राणी जांभई देतात- काही प्राण्यांमध्ये – विशेषत: काही माणसांमध्ये – जांभई सांसर्गिक असते, हे खरे आहे.

पण, ही यंत्रणा मुळात कशासाठी अस्तित्वात आली, त्यामागचे कारण काय? जांभई दिल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात?

हा मुद्दा आधी समजून घेतला पाहिजे.

“खरं तर हा खूपच गमतीशीर विषय आहे, पण यामुळे काही आपण कोणाचा जीव वाचवू शकत नाही, त्यामुळे याकडे अजून संशोधकांनी फारसे लक्ष दिलेले नाही,”

अशी माहिती वेल कॉर्नेल मेडिसिन आणि न्यूयॉर्क प्रीस्बिटेरीयन येथे स्लीप एक्स्पर्ट असणारे डॅनियल बरोन यांनी दिली.

फार काळापासून जांभईच्या बाबतीत असाही एक सिद्धांत प्रचलित होता की, खोल वर, जोरात उच्छ्वास सोडल्याने आपल्या रक्ताभिसरण प्रक्रियेतील ऑक्सिजनची मात्रा वाढते, ज्यामुळे आपल्या थकलेल्या मेंदूला पुन्हा फ्रेशनेस मिळतो.

 

yawing 3 InMarathi.jpg

 

परंतु, या सिद्धांताचे अनेकांनी खंडन केले आहे.

पण जांभई दिली तरी आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण काही लगेच वाढत नाही. याबाबत बरोन म्हणतात, 

“आणि खरं तर यावर थोडा विचार केला तरी, याचे उत्तर मिळून जाईल. जर खरंच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी जांभई येत असेल तर मग, आपल्याला व्यायाम करताना जांभई का येत नाही? तेंव्हा तर आपल्या शरीराला ऑक्सिजनची फार मोठी आवश्यकता असते.”

 

obama yawn inmarathi4
the independent

 

सहसा, आपण दुपारी फिरायला जातो तेंव्हा कधी आपल्याला जांभई येत नाही. (सकाळी फिरायला गेल्यावर जांभई येते यामागे वेगळे कारण आहे).

अलीकडे जांभई का येते यावर थोडे फार संशोधन सुरु झाले आहे, यातून आणखी एक बाब पुढे आली आहे की, जांभईमुळे आपला मेंदू थंड होण्यास मदत होते.

आणखी एका अभ्यासातून हेही सिद्ध झाले आहे की, सारख्या जांभई देणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर गरम किंवा थंड वस्तू ठेवल्यास त्याचे जांभई देण्याचे प्रमाण अनुक्रमे जास्त किंवा कमी होते.

म्हणजेच, जांभई येण्याचे कारण आपल्या मेंदूच्या तापमानाशी निगडीत असावे.

 

yawing 2 InMarathi.jpg

 

जांभई दिल्याने तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढत नाही पण, त्यामुळे तुमच्या मेंदूचे तापमान निश्चितच थोडेफार कमी होते.

पूर्ण जबडा उघडल्याने रक्त मेंदूपर्यंत पोचते, तर खोलवर थंड श्वास घेतल्याने आपल्या रक्ताचा फ्लो देखील थंड होतो.

उन्हाळ्यात जांभई येण्याची शक्यता फार कमी असते कारण, सभोवतालची हवा उष्ण असते. अशी हवा, मेंदूचे तापमान कमी करू शकत नाही. त्यामुळे अशा उष्ण वातावरणात अर्थातच जांभई येत नाही.

बरोन सांगतात, 

“जेंव्हा तुम्ही थकलेले असता तेंव्हा तुमच्या मेंदूचे तापमान थोडेसे वाढलेले असते. हेच वाढलेले तापमान थंड करण्याचा प्रयत्न तुमचे शरीर करत असते.”

 

girl yawn inmarathi
shutterstock

 

 

याच उत्तरात जांभई संसर्गजन्य का असते याचे देखील उत्तर मिळेल.

ऑक्सिजन लेवल हा ज्याच्या त्याच्या शरीराचा वैयक्तिक प्रश्न आहे पण, जर आजूबाजूचे तापमान थोडे थंड असेल तर, दुसऱ्याला जांभई देताना पाहून तुमच्या शरीराकडूनही नकळतपणे तशाच प्रकारची क्रिया घडून जाते.

सभोवतालचे वातावरण थंड आहे, त्याचा फायदा करून घेण्याची सूचना तुमच्या मेंदूपर्यंत पोचते.

जॉर्जिया ग्विनेट कॉलेजचे सायकोलॉजीचे प्राध्यापक,स्टीव्हन पॅटेक यांच्या मते

“जेंव्हा तुमचा सहकारी जांभई देतो तेंव्हा त्यातून तुमच्या शरीरापर्यंत ही सूचना पोहचते की, जर त्याच्या मेंदूचे तापमान वाढले असेल तर निश्चितच मी ही त्या अवस्थेच्या जवळ आहे.

“मग तुमच्या मेंदूचे तापमान कमी करण्यासाठी तुमच्या शरीराकडूनही तीच प्रक्रिया केली जाते”

पॅटेक यांनी केलेल्या संशोधनानुसार एका व्यक्तीच्या जांभईला जांभई देऊन प्रतिसाद देण्याची वृत्ती सहानुभूती मिळवण्याच्या स्पर्धेतून निर्माण झाली आहे.

आणखी एका सर्वेक्षाणानुसार अपरिचित व्यक्तीच्या जांभई पेक्षा परिचित व्यक्तीच्या जांभईच्या आपल्यावर चटकन परिणाम होतो.

परस्परांविषयी वाटणाऱ्या सहानुभूती मुळेच इतर प्राण्यांपेक्षा माणसामध्ये जांभई जास्त सांसर्गिक आहे.

 

yawing 5 InMarathi.jpg

 

परंतु, सर्वच संशोधकांना हा सिद्धांत मान्य आहे, असे नाही. मेंदूचे तापमान नियंत्रित करण्यासाठी जांभई येते हे तद्दन चूकीचे असल्याचे काही संशोधकांचे मत आहे.

जांभई येणे ही पूर्णत: मानसिक क्रिया आहे, शारीरिक नाही असे यांचे मत आहे.

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, जांभई ही एका प्रकारची संवेदनशील सामाजिक सूचना आहे, जी आपण या सिग्नल द्वारे देत असतो.

जांभई का येते, कशामुळे येते, त्याचे नेमके कारण काय? या सगळ्या प्रश्नाबाबत संशोधकांमध्ये मतभेद असले तरी, जांभई दिल्याने आपल्या थकवा दूर होतो याबाबत मात्र यांचे एकमत आहे. खरे जांभई येणे ही झोपेची वेळ झाल्याची सूचना नाही, तर ती ही झोपेची वेळ नाही हे सांगणारी सूचना आहे.

जांभई येणे हे आपण एखाद्या गोष्टीला कंटाळल्याचेही चिन्ह असू शकते.

म्हणून तुमचा एखादा सहकारी जास्तच जांभई देतो असे तुम्हाला वाटत असेल तर, त्याच्यावर न चिडता किंवा त्याचा राग न करता हे समजून घ्या की आजूबाजूची फ्रेश हवा एन्जॉय करण्यासाठी तो जांभई देत आहे.

आपण ही या थंड हवेचा लाभ घ्यायला हवा. एक कप हॉट कॉफीपेक्षा ही बाब निश्चितच जास्त परवडणारी आहे!

 

630-06722655
masterlifestock photos

 

तर, जांभई का येते? कशी येते? यापेक्षा ती सांसर्गिक असते, आणि आजूबाजूला कोणी जांभई देत असेल तर, त्यामुळे आपल्यालाही जांभई येते ही बाब जास्त खरी आहे. यावर, संशोधकांचेही एकमत आहे.

कुणाला सतत जांभया येतात म्हणून आता चीडचीड करण्याचे कारण नाही; कारण, यामागची नेमकी प्रक्रिया आता स्पष्ट झाली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?