Site icon InMarathi

काश्मीर विषयावर पाकिस्तान्यांचा लंडनमध्ये धुडगूस, त्यावर भारतियांचे “स्वच्छता मिशन” उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

काश्मीर प्रश्नाबाबत पाकिस्तान अनेक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर हर एक प्रकारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. तब्बल एक महिना उलटल्यानंतर, काश्मीर मुद्द्यावर त्यांच्या मताला आंतरराष्ट्रीय पातळीवर दुजोरा मिळावा म्हणून पाकिस्तानी प्रचार यंत्रणेचा अगदी पराकोटीचा आटापिटा सुरु आहे.

येनकेन प्रकारे आपल्या म्हणण्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो हे, या घटनेवरून सिद्ध होते.

या प्रसंगी निषेध नोंदवताना पाकिस्तानी नागरिकांच्या एका गटाने लंडन मध्ये काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागले. पाकिस्तानच्या या कृत्याचा सर्व थरातून निषेध होत आहे.

काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील अंतर्गत प्रश्न असल्याचे काही देशांनी निक्षून सांगितले असले तरी, पाकिस्तानने मात्र लंडनमध्ये धुडगूस घातलाच!

 

indiatimes.in

परंतु, चीन सोडला तर या मुद्द्यावर पाकिस्तानला इतर कोणत्याही देशाने पाठींबा दिलेला नाही. अनेक देशांनी, अगदी ज्या इस्लामिक राष्ट्रांकडून पाकिस्तानला आशा होत्या त्यांनी देखील ही दोन देशातील समस्या असल्याचे स्पष्ट केले.

अगदी इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी देखील हे मान्य केले आहे की पाकिस्तानने आपला हक्क गमावला असून त्यांच्यापुढे फारसे पर्याय शिल्लक नाहीत.

याच कारणाने पाकिस्तान प्रचंड निराश झाला असून त्याची ही निराशा काही अनर्थक घटनांच्या रूपाने समोर येत आहे.

लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर काही पाकिस्तानी ब्रिटीश नागरिकांनी मंगळवारी हिंसक आंदोलन केले. शेकडो अंडी, टोमॅटो, दगड, चप्पल,धूर बॉम्ब आणि बाटल्या फेकल्या. यात इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. इमारतीच्या अनेक खिडक्या तुटल्या आहेत. भारतीय उच्चायुक्तांनी तुटलेल्या खिडक्यांचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

“३ सप्टेंबर २०१९ रोजी, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालया बाहेर आणखी एक हिंसक आंदोलन झाले. या आंदोलनाने उच्चायुक्तालयाच्या बाहेरील आवारात प्रचंड नुकसान झाले आहे,” असे या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

 

दरम्यान लंडनच्या मेट्रोपॉलीटन पोलीस प्रवक्त्यांनी सांगितले की, या हिंसक आंदोलनासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.

लंडनचे महापौर सादिक खान यांनी देखील, या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. “या असमर्थनीय कृतीचा मी तीव्र निषेध करत आहे,” असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

 


गेल्या एका महिन्यात भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर हिंसक उच्छाद मांडणारे आणि तोडफोडीची ही दुसरी घटना आहे.

१५ ऑगस्ट रोजी भारतीय वंशाचे टोरीचे संसद सदस्य शैलेश वारा यांनी देखील हाउस ऑफ कॉमन मध्ये सांगितले की, भारतीय वंशाच्या नागरिकांवर दुसर्या एका गटाकडून हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांनी पाकिस्तानी निदर्शकांचा स्पष्ट उल्लेख देखील केला.

भारत सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर मधील कलम ३७० रद्द करत जम्मू आणि काश्मीरचे विशेषस्थान काढून घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतरच अशा प्रकारच्या हिंसक निदर्शनांच्या घटना वाढत आहेत.

 

indiatimes.in

संसदेच्या सत्रा दरम्यान, ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांनी संसद सदस्यांशी बोलताना या घटने बाबत चिंता व्यक्त केली.

ते म्हणले की, ७ ऑगस्ट रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी आपण या विषयावर चर्चा केली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. काश्मीर बाबतच्या घडामोडींवर ब्रिटनचे बारकाईने लक्ष राहील, याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर पाकिस्तानी लोकांनी हिंसक आंदोलन केल्यामुळे, उच्चायुक्तालायाच्या आवारात अंडी, टोमॅटो, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, चपला, दगड अशा कितीतरी वस्तूंचा खच पडला होता.

संपूर्ण आवार घाणीने माखून गेला होता. याचवेळी लंडनमधील भारतीयांनी या हिंसक आंदोलनाला अभिनव पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. लंडनमधील या भारतीयांनी आपण या प्रसंगी आपल्या देशासोबत असल्याचे दाखवून देण्याचे ठरवले.

या सगळ्यांनी एकत्र येऊन पाकिस्तानी निदर्शकांनी केलेला कचरा स्वतःहून साफ करून ब्रिटनमध्ये एक अनोख्या पद्धतीचे “स्वच्छता मिशन” राबवले. भारतातील स्वच्छता मिशन या निमित्ताने इंग्लंमध्येही पोहचले.

 

indiatimes.in

ब्रिटीश काश्मिरी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या काश्मीर स्वातंत्र्य मोर्चाच्या दरम्यान या गटाने भारतीय उच्चायुक्तालया बाहेर केलेल्या हिंसक आंदोलनाचा आणि तोडफोडीचा ब्रिटनमधील अनेक नागरिकांनी निषेध केला आहे.

कश्मीर प्रश्नावर भारतीय उच्चायुक्तालया बाहेर मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी हजारो लोकांचा जमाव एकत्र जमला होता. या जमावाने भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर अंडी, चपला, बूट, दगड फेक करत इमारतीचे नुकसान केले. या हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या.

या जमावाच्या हातात पाकव्याप्त काश्मीरचे झेंडे होते आणि ते काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देत होते.

या इमारतीवर अंडी, टोमॅटो, भाजीपाला, धूर गोळे आणि थंड पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. इमारतीच्या भिंतीवर डाग पडले होते आणि खिडक्या तुटल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी लंडनमधील भारतीय नागरिकांनी उच्चायुक्तालयाचा हा परिसर उत्स्फूर्तपणे स्वच्छ केला. निषेध व्यक्त करताना हिंसक झालेल्या ब्रिटीश पाकिस्तानी नागरिकांना भारतीयांचे हे उत्तर फारच समर्पक ठरले.

या घटनेनंतर ब्रिटनमधील अनेक नेत्यांनी भारतीय उच्चायुक्तालयाला भेट दिली. तसेच लंडनचे महापूर साजिद खान यांनी एवढ्या मोठ्या जमावाला काश्मीर मुद्द्यावर निदर्शने करण्याची परवानगी दिली याबद्दल त्यांचाही निषेध केला.

 

 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी देखील या तोडफोडीचा आणि हिंसक निदर्शनाचा निषेध केला आहे.

ही घटना असमर्थनीय असल्याचे भारताचे मत असून या घटनेविरोधात आवश्यक ती कठोर पावले उचलण्याची विनंती भारताने ब्रिटनकडे केली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच आयुक्तालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचालावीत अशी देखील विनंती केली आहे.

लंडनचे महापौर साजिद खान यांनी निदर्शनाचा हा हिंसक प्रकार अजिबात समर्थनीय नसल्याचे म्हंटले आहे. पाकिस्तानी निदर्शकांचे हे वागणे अस्वीकारार्ह असल्याचेही ते म्हणाले.

 

indiatimes.in

या निदर्शकांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. भारताने या घटने बाबत तीव्र चिंता व्यक्त करत ब्रिटनने यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची विनंती केली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version