अमावस्या-पौर्णिमेचा आपल्या शरीरावर, भावनांवर परिणाम होतो का? समज, गैरसमज…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, ही खगोलीय माहिती मिळण्याआधी तो आपल्याला चांदोमामा याच नात्याने परिचित असतो. तर, दूरवर वसलेल्या या चांदोमामाची गाणी ऐकत-म्हणतच आपण मोठे झालो.
या चंद्राबद्दल जशा भावनिक गोष्टी जोडलेल्या आहेत तशाच अनेक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहेत.
दिवसेंदिवस त्याचे पालटणारे रूप तर कवींपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वाना आकर्षित करत असते. ज्योतिषशास्त्रात तर या चंद्राला विशेष स्थान आहे.
त्याच्या प्रभावाने लोकांच्या जीवनात खूप फरक पडतो असे हे शास्त्र सांगते. परंतु, विज्ञान काय सांगते ते ही समजून घेतले पाहिजे.
खरंच चंद्राच्या बदलत्या कलांचा मानवी जीवनावर काही ठोस परिणाम होतो का? विज्ञान याबद्दल नेमके काय सांगते जाणून घेऊया.
पूर्वीच्या काळी ग्रीस आणि रोम मधील तत्ववेत्त्यांना असे वाटत असे की, ज्याप्रमाणे सागराला भरती ओहोटी येते त्याचप्रमाणे आपल्या मेंदूतील द्रवाला देखील भरती ओहोटी येत असावी, म्हणूनच जेंव्हा केंव्हा चंद्र आकाशात येतो तेंव्हा मनुष्य प्राण्याच्या वर्तनात अचानक विचित्र बदल दिसून येतो असे या तत्ववेत्त्यांचे मत होते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
शेकडो वर्षापासून याप्रकारची आख्यायिका या ना त्या स्वरुपात जगभरातल्या सर्व देशांमध्ये पोचलेली आहे. त्यात त्या-त्या देशातील सांस्कृतिक संचिताची भर देखील पडली आहे.
अशा अख्यायीकांना प्रत्येक संस्कृतीत कमी-जास्त महत्व आहेच. परंतु आजचे विज्ञान याबाबत काय सांगते.
खरे तर आपल्या दंडावर बसलेल्या एका मच्छरचे गुरुत्वाकर्षण बल हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या कितीतरी पट अधिक असते.
मग मच्छर दंडावर बसला म्हणून कधी माणसाच्या वर्तनात विचित्र बदल झाल्याचे आपण पहिले किंवा ऐकले आहे का? नाही ना!
मग, इतक्या दूरवर असणाऱ्या चंद्राचा आपल्या वर्तनावर असा काय मोठा परिणाम होणार आहे?
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे समुद्राला भरती ओहोटी येते. चंद्र आपल्या गुरुत्वाकर्षण बलाने समुद्रातील पाणी वरच्या दिशेने खेचून घेतो अगदी त्याच पद्धतीने चंद्राच्या या बलाचा परिणाम मानवी देहातील पाण्यावर होतो ज्यामुळे मानवी वर्तनात बिघाड होतो, असा समाज प्रचलित आहे..
–
- ग्रहणाची शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यावर “अंधश्रद्धांवर” हसावं की रडावं कळतंच नाही..!
- तुम्ही ज्या विश्वात राहतं ते विश्व नेमकं कसं आहे? तुम्हाला माहिती असायलाच हवं…
–
चंद्राच्या बलाने समुद्रात भरती ओहोटी येते हे जरी मान्य केले तरी, तसा संबंध मानवी वर्तनाशी जोडणे असंबद्ध आहे. कारण, चंद्राच्या या बलाचा परिणाम उघड्या असणाऱ्या जल स्त्रोतावर होतो, जसे की समुद्र किंवा नदी-नाले बंदिस्त जलाशयावर नाही जसे की, मानवी शरीरातील पाणी.
मानवी शरीरात तर ७०% पाणीच असते, किंबहुना ते जास्तीत जास्त पाण्याचेच बनलेले आहे. मग, फक्त मेंदूतील पाण्यावरच कसा बरे फरक जाणवेल?
म्हणजे चंद्राच्या बदलत्या कलेमुळे मानवी वर्तनात बदल होतो, ही गोष्ट वैज्ञानिक कसोटीवर टिकतच नाही मुळात. आणखी एक बाब, म्हणजे चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पौर्णिमा आणि अमावस्या अशा दोन्ही रात्रीला सारखीच असते.
म्हणजे तो पूर्ण उगवला काय किंवा नाही उगवला काय त्याच्या प्रभावावर काही परिणाम होत नाही.
परंतु, कोणतीही वास्तविक तथ्ये नसताना काहीजण असा दावा करतात की, गुन्ह्यांचे प्रमाण, अपघातांचे प्रमाण किंवा शस्त्रक्रिया करताना होणाऱ्या चुका यामागे चंद्राच्या कलेचा संबंध असतो. खरे तर, त्यांचे हे गृहीतक काही ऐकीव माहितीवर अवलंबून असते.
एका अभ्यासातून यातील एखाद दुसरी गोष्ट खरी असल्याचेही सिद्ध करून दाखवण्यात आले आहे. परंतु, एक अभ्यास म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही.
सातत्याने आणि अनेक अभ्यासातून चंद्राच्या कलेचा मानवी वर्तनावर काही ठोस परिणाम होतो, हे सिद्ध करता आलेले नाही.
खरे तर इव्हान केली, जेम्स रॉटन आणि रॉगर कल्वर यांनी जेंव्हा या अभ्यासातून काढण्यात आलेल्या निष्कर्षाचा पुनर्राभ्यास केला तेंव्हा हे निष्कर्षातून फारसे तथ्य हाती लागले नाही किंवा चंद्र आणि मानवी वर्तन यांतील ठोस संबंध देखील सिद्ध करता आला नाही.
यातील अनेक संशोधने ही निकृष्ट दर्जाची होती. बदलत्या घटकांचा काही परिणाम यात गृहीत धरण्यात आला नव्हता.
(यातील एका संशोधनात असा निष्कर्ष काढण्यात आला होता की, पौर्णिमेच्या दिवशी जास्त कार अॅक्सिडंट होतात. पण ज्या ज्या वेळी अशा पौर्णिमेच्या रात्रीचा डाटा गोळा करण्यात आला त्या सर्व रात्री विकेंड देखील होता – त्यामुळे विकेंडला कार अॅक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, यामागे दुसरी कारणे देखील असू शकतात.)
विचित्र मानवी वर्तन हे फक्त पौर्णिमेच्याच रात्री दिसून येते किंवा त्याच रात्री वाढते यातही फारसे तथ्य नाही.
पौर्णिमेच्या रात्री प्रमाणेच ज्या रात्री पूर्ण चंद्र आकाशात नसेल त्या रात्री देखील वर्तनात बदल होऊ शकतो. विशेषत: त्या व्यक्ती मध्ये आधीच काही मानसिक दोष असतील तर, ते केंव्हाही उसळी मारून वर येऊ शकतात.
त्याच्याशी चंद्राच्या कलेचा काही विशिष्ट संबंध असण्याचे कारण नाही.
केली, रॉटन, कल्वर यांनी असे देखील दाखवून दिले की, चंद्राची कला आणि मानवी वर्तन यांत निश्चित संबंध असतो असे दाखवून देणारे संशोधक स्वतः विशिष्ट संज्ञानात्मक पक्षपातीपणाच्या प्रभावाखाली होते, त्यांनी तटस्थपणे हा अभ्यास केला नव्हता.
त्यांना फक्त त्याच रात्री आठवत होत्या ज्या पौर्णिमेच्या रात्री काही विचित्र घटना घडल्या असतील. पण पौर्णिमेची रात्र असूनही काही शानदार गोष्ट घडल्याचे त्यांना आठवत नव्हते.
किंवा प्रत्येक गोष्ट त्यांना विचित्र किंवा असामान्य वाटत होती कारण, त्या रात्री आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता.
“चंद्राच्या कला आणि मानवी वर्तन याबद्दल काही ठोस निष्कर्षाप्रत पोहचण्यापूर्वी दोन अडथळे पार करणे गरजेचे आहे, एक म्हणजे वेगवेगळ्या संशोधकांकडून विश्वासार्ह (म्हणजे पुन्हपुन्हा सिद्ध होणारे) निरीक्षणे मांडण्यात आली पाहिजेत.
दुसरा अडथळा म्हणजे, यातील संबंध क्षुल्लक गोष्टीवरून काढलेला नसावा. परंतु, या दोन्ही कसोटींवर चंद्राबाबतची गृहीतके सपशेल अपयशी ठरतात,”
असे केली, रॉटन आणि कल्वर यांचे मत आहे.
पौर्णिमेच्या रात्री जन्मदर वाढतो असे एका अभ्यासांती सांगण्यात आले. पण, यावर झालेल्या अनेक संशोधनानंतर हे सिद्ध झाले की, पौर्णिमेची रात्र आणि जन्मदर वाढण्याचा काही एक संबंध नाही.
पाच वेगवेगळ्या देशातून करण्यात आलेल्या अभ्यासातून देखील जन्मदर आणि चंद्र कला यांचा काहीही विशिष्ट संबंध प्रस्थापित करण्यात आला नाही.
२००१ साली ७ कोटी बालकांच्या जन्माचा अभ्यास करण्यात आला पण, यातूनही विशेष निष्कर्ष हाती लागला नाही.
अनेकदा करण्यात आलेल्या विस्तृत विश्लेषणातून आणि पुनर्विश्लेषणातून हाती आलेल्या निष्कर्षानी वारंवार हेच सिद्ध केले आहे की, चंद्रकला आणि मानवी वर्तन यांचा थेट संबंध अजिबात नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.