Site icon InMarathi

मातीपासून तुटलेल्या मराठी मनाची गणेशोत्सवात होणारी घालमेल…!

sudhakara youtube ashish lotangane

जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपली नाळ मायदेशाशी जोडलेलीच असते…!

आजकालच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणामुळे किंवा बौद्धिक क्षमतेमुळे नव नव्या संधी ह्या लगेच उपलब्ध होत आहेत. तरुण पिढी त्या संधींकडे पंख विस्तारून झेपावत आहेत.

अशीच एक संधी ओंकारला त्याच्या शिक्षणानंतर उपलब्ध झाली. आणि संधीचं सोनं करण्याच्या हेतूने, तो थेट अमेरिकेत आला.

अमेरिकेत तो हळू हळू रुळला आणि बघता बघता आता त्याला ६ वर्षे पूर्ण झाली.

जेव्हा तो मागे वळून बघतो तेव्हा लक्षातयेतं कि या धकाधकीच्या जीवनात आपण बऱ्याच गोष्टी मागे विसरून आलोय. काही तरी सुटतंय.

आता तर तो ग्रीन कार्ड च्या स्पर्धेत पण यशस्वी झालाय…! लवकरच तो अमेरिकेचा कायस्वरूपी रहिवाशी होणार आहे.

पण…काहीतरी हरवतंय ही बोच त्याच्या मनात घर करून बसलीये.

अमेरिकेत पैसा आहे. मोठमोठाली घरं आहेत. चैनीच्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र घराला घर पण देणारी माणसं आणि पाठीवर शाबासकीची थाप देणारे आईचे हात नाहीत.

ओंकार व्यावहारिक जगाच्या भावनाहीन स्पर्धेत धावतोय खरा – पण या स्पर्धेत मागे राहतंय ते त्याचं गाव, त्याची माणसं आणि विशेष म्हणजे – वर्षानुवर्षे चालत आलेला गणेश उत्सव…!

तसं हल्ली गणपती अमेरिकेतही थाटामाटात बसतोच. पण ओंकारसाठी तो आनंद, ती मजा , ती परंपरा आणि ते सुख मात्र इथे नाही.

ओंकारच्या – आणि खरंतर आपली मायभूमी सोडून सातासमुद्रापार गेलेल्या लाखो मराठी तरुणांच्या – मनाची घालमेल आणि द्विधा मनःस्तिथी ह्या विडिओ मधून फार सुरेखरित्या दाखवल्या गेली आहे.

नक्की बघा, शेअर करा…!

 

 

गणपती बाप्पा मोरया…!

Exit mobile version