Site icon InMarathi

गेल्या अकरा वर्षात भारतात २००० अब्ज रुपयांचे बँक फ्रॉड्स झालेत- RBI ची आकडेवारी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

शेकड्यात, हजारात, लाखात किंवा दहा लाखाचे घोटाळ्याचे आकडे तर ऐकतोच नेहमी. गेल्या काही वर्षात तर बँक घोटाळ्यांची कित्येक प्रकरणे आपण ऐकलेली आहेत.

भारतभर असलेल्या बँका आणि त्यामध्ये झालेल्या अफरातफरीची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवली असता जे काही सत्य समोर आले ते पाहून डोळे दिपल्याशिवाय राहणार नाहीत.

भारतातील एकही अशी बँक नाही जिथे घोटाळा झालेला नाही, हे पाहून तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. इतका घोटाळा झालेला आहे, हे करणारे कोण आहेत? किंवा या गुन्हेगारांना काही शिक्षा आहे का? हे प्रश्न तर गुलदस्त्यातच आहे.

पण, भारतात गेल्या अकरा वर्षात तब्बल २००० अब्ज रुपयांचे बँक घोटाळे झाल्याचे RBIने उघड केले.

 

trak.in

यामध्ये ICICI बँकेचा क्रमांक सर्वात वरचा लागतो. या एकाच बँकेत फ्रॉड्सच्या ६,८११ केसेस आहेत, ज्यामध्ये एकूण ५,०३३ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे.

ICICI बँकेच्या खालोखाल स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), HDFC बँक यांचा नंबर लागतो. या बँकांमध्ये देखील सर्वात जास्त फ्रॉड्सच्या केसेस दाखल आहेत.

२००८-२००९ पासून ते २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एकूण ५३, ३३४ फ्रॉड्सच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये तब्बल २.०५ लाखकोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

यामध्ये ICICI बँकेत सर्वात जास्त म्हणजे ६,८११ केसेस दाखल असून यामध्ये सुमारे ५,०३३.८१ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

सरकार द्वारे चालवण्यात येणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय)मध्ये देखील ६,७९३ फ्रॉड्सच्या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एकूण २३,७३४.७४ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

त्या खालोखाल आहे एचडीएफसी बँक ज्यामध्ये २,४९७ फ्रॉड्सच्या केसेस नोंदवल्या असून त्यामध्ये १, २००.७९ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत कारण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना आरबीआयने ही आकडेवारी उघड केली आहे.

 

newsclick.in

बँक ऑफ बडोदा मध्ये २,१६० केसेस नोंदवल्या गेल्या आहेत ज्यामध्ये १२,९६२.९६ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. पंजाब नॅशनल बँक २,०४७ फ्रॉड्स (२८,७००.७४ कोटी) आणि अॅक्सीस बँक मध्ये १,९४४ केसेस दाखला झाल्या असीन एकूण ५,३०१.६९ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये १,८७२ केसेस दाखल झाल्या असून यामध्ये एकूण १२,३५८.२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

१,७८३ केसेस सिंडीकेट बँकेचे आहेत जिथे ५८३०.८५ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १,६१३ केसेस दाखल झाल्या असून ९०४१.९८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

आयडीबीआय बँक ली. मध्ये १,२६४ केसेस दाखल करण्यात आल्या असून यामध्ये एकूण ५९७८.९६ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेमध्ये १,२६३ केसेस नोंदवल्या गेल्या असून एकूण १,२२१.४१ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

कॅनरा बँक, १,२५४ केसेस आणि ५५५३.३८ कोटी रुपयांचा घोटाळा, युनियन बँक ऑफ इंडिया १,२४४ केसेस आणि ११,८३०/७४ कोटी रुपयांचा घोटाळा, कोटक महिंद्रा १,२१३ केसेसमध्ये ४३०.४६ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

याच दरम्यान इंडियन ओव्हरसीज बँकेने १, ११५ केसेस फ्रॉडच्या होत्या आणि यामध्ये १२,६४४.७ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. तर ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्समध्ये १०४० केसेस झालेल्या असून यामध्ये ३०५२.३४ कोटी रुपयांची अफरातफर झालेली आहे.

 

hindustantimes.com

स्टेट बँक ऑफ मैसूर, ३९५ केसेस आणि ७४२.३१ रुपयांचा घोटाळा. स्टेट बँक ऑफ पटियाला ३८६ केसेस ११७८.७७ कोटी पंजाब अँड सिंद बँक २७६ केसेस दाखल आहेत, ज्यामध्ये ११५४.८९ कोटीचा फ्रॉड झालेला आहे.

युको बँकेत १०८१ केसेस आणि ७१०४.७७ कोटी रुपयांचा घोटाळा, तामिळनाडू मार्कटाइल बँक ली. मध्ये २६१ केसेस आणि ४९३.९२ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

लक्ष्मी विलास बँक ली. मध्ये २५९ केसेस आणि ८६२.६४ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. भारतात चालणाऱ्या काही परदेशी बँकांमध्ये देखील या ११ वर्षात फ्रॉडच्या केसेस झालेल्या आहेत.

अमेरिकन एक्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशन मध्ये १,८६२ केसेस नोंदवण्यात आल्या असून इथे ८६.२१ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. सिटी बँक १,७६४ केसेस नोंदवण्यात आलेल्या असून ५७८.०९ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

हॉंगकॉंग अँड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (एचएसबीसी) ली. मध्ये १,१७३ फ्रॉड केसेस नोंदवल्या असून ३१२.१ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

द रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड पीएलसी मध्ये २१६ केसेसची नोंद झालेली असून १२.६९ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला असल्याचे आरबीआयच्या डाटा वरून स्पष्ट होते.

 

tosshub.com

स्टेट बँक ऑफ त्रावणकोर मध्ये एकूण २७४ केसेस नोंदवण्यात आल्या असून ६९४.६१ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. जम्मू अँड काश्मीर बँक ली. मध्ये १४२ केसेस नोंदवण्यात आल्या असून १६३९.९ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

द इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्प ऑफ इंडिया मध्ये नऊ केसेस असून एकूण ६७१.६६ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. धनलक्ष्मी बँक ली. ८९ केसेस नोंदवण्यात आलेल्या असून ४१०.९३ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

विजया बँक मध्ये ६३९ केसेस आहेत ज्यामध्ये १,७४८.९ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे, असे या डाट्यावरून स्पष्ट होते.

एस बँक ली. मध्ये १०२ केसेस असून ३११/९६ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक ली. मध्ये दोन केसेस असून ०.०२ कोटी म्हणजे २ लाख रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात शेड्युल्ड कमर्शिअल बँका आणि आर्थिक संस्थांनी नोंदवलेल्या ६,८०१ केसेस मध्ये एकूण ७१, ५४२.९३ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

या बातम्या प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेस पक्षाने एक पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारने बँकांच्या वाढत चाललेल्या घोटाळ्याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली होती.

 

intoday.in

२००८-२००९ या आर्थिक वर्षात, एकूण ४,३७२ केसेस नोंदवल्या असून यामध्ये तब्बल १,८६०.०९ कोटी रुपयांची अफरातफर झालेली आहे. २००९-१० मध्ये १,९९८.९४ कोटी रुपये आणि ४,६६९ केसेस नोंदवल्या आहेत.

२०१०-२०११ आणि २०११-२०१२ या सलग दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे ३,८१५.७६ कोटी आणि ४,५०१.१५ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

२०१२-१३ या आर्थिक वर्षात, ४,२३५ केसेस नोंदवल्या असून यामध्ये ८,५९०.८६ कोटी रुपयांचा तर, २०१३-१४ मध्ये ४,३०६ केसेस मध्ये १०,१७०.८१ कोटी रुपयांचा तर २०१४-२०१५ मध्ये ४,६३९ केसेस मध्ये १९,४५५.०७ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

एवढ्या सगळ्या बँका आणि त्यांच्यातील ही अफरातफरीची आकडेवारी पाहून-वाचून घेरी आल्याशिवाय राहणार नाही.

आपल्याला जिथे महिन्याचा हिशेब गडबडला तर तो सुरळीत लावताना घाम फुटतो, रात्रीची झोप उडते, मग एवढ्या देशभर पसरलेल्या या बँकांचे जाळे आणि त्यात झालेली ही अवाढव्य अफरातफर याची सारवासारव आरबीआय आणि सरकार कसे करते हे पाहणे गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version