' तब्बल १ लाख लोकांचा बळी घेणाऱ्या या भूकंपाच्या नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो! – InMarathi

तब्बल १ लाख लोकांचा बळी घेणाऱ्या या भूकंपाच्या नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निसर्गाच्या रौद्र रूपापुढे मानवी शहाणपणा आणि बुद्धीची कोणतीही किमया चालू शकत नाही. अनेक ठिकाणी आपण हे पाहिले आहेच की, निसर्गाच्या अशा विध्वंसक आपत्तीने मानवी जनजीवन कसे उध्वस्त होते.

निसर्गाच्या अशाच रुद्र रुपाची आठवण करून देणारा आणि या आठवणीनेही अंगावर काटे उभी करणारी एक घटना म्हणजे, १९२३ साली जपान मध्ये आलेला भूकंप!

या भूकंपाने अक्षरशः जपानची दोन शहरे नेस्तनाबूत करून टाकली. ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाने अगदी सर्व काही होत्याचे नव्हते केले. आजही जपान मधील लोकांना या भूकंपाची आठवण झाली तरी, हादरून जायला होते.

जपानच्या टोकियो आणि योकोहामा शहरांना या भूकंपाचा असा तडाखा बसला की, ही शहरे पूर्णतः उध्वस्त झाली. या भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या तब्बल १,४०,००० इतकी होती.

 

japan earthquake inmarathi
timeinc.net

 

शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त घरे जमीनदोस्त झाली होती. विटांची घरे तर पडली होतीच पण, पक्की घरे देखील कोसळली होती. शेकडो हजारो घरे एक तर हादऱ्याने पडली होती किवा भूकंपानंतर लगेचच उसळलेल्या आगीच्या लाटेत होरपळली होती.

या भूकंपाच्या धक्क्यानंतर सागामी गल्फच्या अतामी किनाऱ्यावर ३९.५ फुट उंचीची त्सुनामी उसळली. या त्सुनामीने १५५ घरे नष्ट झाली आणि ६० लोकांचा मृत्यू झाला.

तीव्रतेचा भूकंप आणि त्यानंतर निर्माण झालेली त्सुनामी यामुळे योकोहामा आणि टोकियो दोन्ही शहरांना प्रचंड नुकसान सोसावे लागले ज्यामुळे अनेक ऐतिहासिक घटनांची मालिका सुरु झाली.

या भूकंपाचा पहिला धक्का दुपारी ११.५८ ला जाणवला. सागामी खाडीच्या पृष्ठभागापासून सहा मैल खोलवर या भूकंपाचा केंद्र बिंदू होता, टोकियो शहरापासून किमान ३० मैल अंतरावर. तारीख होती १ सप्टेंबर १९२३.

ही घटना ग्रेट कांटो अर्थक्वेक म्हणूनही ओळखली जाते.

 

quanto earthqueak inmarathi
theatlantic.com

 

भूकंप प्रवण जपानसाठी ही एक महाभयंकर नैसर्गिक आपत्ती होती. सुरुवातीला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लगेचच ४० फुट उंचीच्या लाटा उसळणारी त्सुनामी आली. सलगपणे आदळणाऱ्या विशालकाय लाटांनी योकोहामा आणि टोकियो मधील हजारो लोकांना वाहून नेले.

यानंतर लगेचच भूकंपाच्या धक्क्यामुळे आगीचे लोळ निर्माण झाले, ज्यामध्ये योकोहामातील अक्षरशः हजारो घरांची राख झाली.

एकाच वेळी पूर, भूकंप आणि वणवा अशा तीन आपत्ती एका पाठोपाठ एक अशा कोसळल्या आणि यांची दाहकता इतकी तीव्र होती की संपूर्ण योकोहामा आणि टोकियो शहरामध्ये जणू मृत्यूचे तांडव सुरु होते. या नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखहून अधिक लोक मृत्युमुखी पडले.

ज्या ४४,००० लोकांना टोकियोच्या सुमिदा नदी किनाऱ्यावरील छावणीत सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरित करण्यात आले होते, त्यांना आगीने आपले भक्ष्य बनवले, ज्याला “ड्रॅगन ट्वीस्ट” म्हंटले गेले.

या भूकंपाने जपानच्या दोन मोठ्या शहरांना नेस्तनाबूत केले होते, ज्यामुळे संपूर्ण देश दुखाच्या खाईत लोटला होता.

२०११ च्या मार्च मध्ये ९.० स्केलचा भूकंपाचा धक्का जपानमध्ये बसला पण, त्यातही एवढी हानी झाली नाही. परंतु, या भूकंपात जी हानी झाली होती, त्याची तुलना कोणत्याच घटनेशी करता येत नाही. १९२३ च्या भूकंपाने एका मागोमाग एक अशा आपत्तींचे संकटच आणले होते.

 

 Japan earthquake inmarathi
japansociety.org

 

पहिले भूकंपाचा धक्का त्यानंतर त्सुनामी व त्यानंतर पेटलेली आग आणि त्यानंतर फुकुशिमा दैईची अणुभट्टीमधून झालेला किरणोत्सर्ग. त्सुनामीमुळे कित्येक गावेच्यागावे वाहून गेली.

ग्रेट कांटो अर्थक्वेक येण्याआधी जपान प्रचंड आशावादी देश होता. योकोहामा हे त्याकाळचे एक संपन्न शहर होते, ज्याला सिटी ऑफ सिल्क म्हणूनही ओळखले जायचे. योकोहामा आणि टोकियो ही जपान मधील त्याकाळातील कॉस्मोपॉलिटिन शहर होते.

अनेक उद्योजकांचे, गुन्हेगारांचे, व्यापाऱ्यांचे आकर्षण स्थळ होते. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील आणि शहरातील हेर आणि भटके इथे येत असत.

हे बंदर म्हणजे जणू “वाळवंटातील मृगजळ” होते असे वर्णन एका जपानी कादंबरीकाराने केलेले आहे. नोबेल नामांकन मिळालेला ज्यूनीच तानिझाकीने पटकथा लिहित, आणि भटकंती करत योकोहामा शहरात दोन वर्षे घालवली. तो लिहितो –

“पाश्चात्य रंग आणि सुगंधाची मौज इथे पाहायला मिळायची. सिगारेटचा दर्प, चॉकलेटचा सुवास, फुलांची दरवळ आणि परफ्युम्सचा सुगंध अशी प्रत्येक गोष्टीची मजा इथे अनुभवता येते.”

 

yokohama inmarathi
stateoffranklin.net

 

परंतु, ग्रेट कांटो अर्थक्वेकने एका दुपारीच हे सगळे होत्याचे नव्हते केले. जे कोणी या भूकंपातून वाचले त्यांच्या मते, सुरुवातीला हा धक्का १४ सेकंदासाठी जाणवला- ज्यामुळे योकोहामाच्या जलीय आणि अस्थिर मैदानावरील प्रत्येक इमारत कोसळली.

ओटिस मांचेस्टर पूल, ४३ वर्षीय अमेरिकन फर्मचा मॅनेजर आपल्या ऑफिस मधून बाहेर निसटला तेंव्हा त्याने पहिले की, “सर्वत्र पंढऱ्या धुळीचा जाडसर थर साचला होता, वरती धुराचे पिवळे लोट जात होते, या सगळ्या उध्वस्त परीस्थित तांबूस रंगाचा सूर्य आकाशात तळपत होता,” असे तो सांगतो.

जोराचा वारा, आगीचे लोट आणि फुटलेल्या गॅसची गळती यामुळे संपूर्ण शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

दरम्यान, होन्शु किनाऱ्यावर लाटेची एक मोठी भिंत उभी राहिली. ज्यामुळे कामाकुरा येथे ३०० लोकांचा मृत्यू झाला. २० फुट उंच लाटेने संपूर्ण गाव वाहून नेले.

“किनाऱ्यावरील मोठा भाग या महाकाय लाटांनी वाहून नेला,” असा वृतांत, हेन्री. डब्लू. किंने या टोकियो मधील ट्रान्स-पॅसिफिक मॅगझीनच्या पत्रकाराने लिहिला होता.

 

japan earthquake inmarathi
glaciermedia.ca

 

या सगळ्या दुर्दैवी आपत्तीत अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून आपदग्रस्तांना वाचवण्याचा देखील प्रयत्न केला. २२ वर्षाच्या एका अमेरिकन नौदल अधिकाऱ्याने योकोहामातील ग्रँड हॉटेल मध्ये अडकलेल्या एका महिलेला त्या हॉटेल मधून बाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी पोचवले, यांनतर काही सेकंदाच त्या कोसळलेल्या इमारतीला आग लागली. अशा अनेक घटना या काळात समोर आल्या.

यानंतर ताकी योनेमुरा या सरकरी वायरलेस स्टेशनच्या इंजिनियरने वायरलेस यंत्रणेद्वारे एक बुलेटीन जाहीर केले ज्यामुळे उर्वरित जगाला या विध्वंसाची तीव्रता जाणवली आणि इतर देशांकडून जपानला मदतीचा ओघ सुरु झाला.

या भयानक भूकंपाने जपानला तीव्र झटके दिले होते, आजही या भूकंपाच्या आठवणीने लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?