Site icon InMarathi

टागोरांनी रक्षाबंधन साजरं केलं आणि बंगालची फाळणी काही काळासाठी थांबली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

रक्षाबंधन म्हटलं की आपल्यासमोर येते, ते म्हणजे भावा- बहिणीचं प्रेम. बहिण भावाच्या हातावर राखी बांधते तर, भाऊ बहिणीला सदैव तिची रक्षा करण्याचं वचन देत असतो. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे.

मात्र याच राखीचा उपयोग एका महापुरूषाने फाळणी रोखण्यासाठी केला होता. त्या महापुरूषाचे नाव होते भारताच्या राष्ट्रगीताचे जनक आणि नोबेल पारितोषिक विजेते रविंद्रनाथ टागोर.

 

 

१६ ऑक्टोंबर १९०५. भारताचे त्याकाळचे व्हॉईसरॉय लॉर्ड क्रुझोनने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याकाळी बंगाल हे खूपच मोठे प्रांत होते. त्यावेळी बंगालमध्ये आजचे पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम आणि आजचा बांग्लादेश या भागांचा समावेश होता.

एवढे मोठी प्रांत आणि त्यातही प्रंचड मोठ्या लोकसंख्येचा ब्रिटिश शासनाच्या विरोधातील उद्रेक, या गोष्टींमुळे ब्रिटिशांना प्रशासनीय कार्य करण्यास अडचणी निर्माण होत होत्या.

त्यावेळी बंगालमध्ये हिंदूंबरोबरच मुस्लिम समुदायाची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. याच कारणामुळे ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही निती वापरली होती.

 

ब्रिटिशांनी बंगालचे दोन तुकडे करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आसामबरोबर ढाका, त्रिपूरा, नोआखाली, चटगाव आणि मालदा हे भाग मिळून पुर्व बंगाल आणि आसाम नावाचे एक राज्य बनवण्याची ब्रिटिशांनी घोषणा केली होती.

ही फाळणी केवळ एका प्रांताची होणार नव्हती. तर या फाळणीबरोबरच हिंदू-मुस्लिम समुदायदेखील विभागले जाणार होते. भारतीयांना ब्रिटिशांची ही निती लक्षात आली होती. त्यामुळे सर्व भारतीयांनी या फाळणीला विरोध करण्यास सुरूवात केली. फाळणीला काँग्रेसने देखील विरोध करत स्वदेशी अभियान सुरू केले.

संपुर्ण देशात विदेशी कापडांची होळी करण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र रविंद्रनाथ टागोर यांच्या डोक्यामध्ये वेगळी कल्पना होती. आपल्या मातृभूमीचे असे विभाजन होणे टागोर बघू शकत नव्हते.

फाळणी रोखण्यासाठी त्यांनी वेगळ्याच मार्गाचा वापर केला. अखेर तो दिवस उजाडला. १६ ऑक्टोंबर, रविंद्रनाथ टागोरांनी आधीच जाहीर केले होते की, हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिवस असेल. टागोरांनी दिवसाची सुरूवात गंगेत स्नान करून केली.

त्यानंतर गंगेच्या किनाऱ्यापासून त्यांच्या मागेमागे लोकांची मिरवणूक निघाली. टागोर कोलकत्याच्या रस्त्यावरून चालत निघाले होते आणि जे दिसेल त्याच्या हातात राखी बांधत होते.

 

 

रविंद्रनाथ टागोरांना वाटत होते, या फाळणीच्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांना राखी बांधत एकमेकांची सुरक्षा करण्याचे, एकमेकांची साथ कधीच न सोडण्याची शपथ घ्यावी.

टागोर पुढे जात होते आणि प्रत्येक हिंदू-मुस्लिम बांधवांच्या हातात राखी बांधत होते. अनेकांना वाटले देखील की, ते उत्साहाच्या भरात अतिरेक करत आहेत, मात्र टागोर थांबणारे नव्हते. टागोरांबरोबर हजारो लोक जोडली गेली होती. लोक त्यांनी लिहिलेले गीत गात होते. सर्वच आनंदात होते.

या विरोध अभियानाचा परिणाम एवढा झाला की, बंगालची फाळणी काही काळासाठी रद्द करण्यात आली. ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांच्या विभाजनाचा प्रयत्न केला होता. मात्र हातावरील एका राखीने त्यांना त्यात यश मिळू दिले नाही.

हजारो हिंदू-मुस्लिम लोक टागोरांबरोबर जोडले गेले होते. यावरून हेच दिसते की, दोन्ही समुदायांना फाळणी नको होती. मात्र काही काळासाठी रोखली गेलेली ही फाळणी अखेर कधीना कधी होणार होतीच.

 

 

१९१२ ला अखेर ब्रिटिशांनी बंगालपासून बिहार, आसाम आणि ओडिसा हे प्रांत भाषेच्या आधारवर वेगळे केले. फाळणीनंतर ३५ वर्षांनी जेवढा हिंसाचार, रक्तपात संपुर्ण भारतात झाला नाही, त्या पेक्षा अधिक हिंसाचार एकट्या बंगालमध्ये झाला होता.

ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या नितीमुळे बंगालमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याला गालबोट लागले ते कायमचेच, त्याची प्रचिती नुकतीच तुम्हाला बंगालच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळाली असेलच!

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version