Site icon InMarathi

प्रसूत आदिवासी मातेसाठी डॉक्टरने जे केलं ते पाहून तुम्ही म्हणाल ‘माणुसकी जिवंत आहे’!

doctor-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शहरात आधुनिक सोयी-सुविधांनी सर्व दवाखाने सज्ज आहेत. लोक काही ना काही करून दवाखान्यात जाऊ शकतात. प्रसंगी स्पेशालिस्टकडे जाऊन जादा पैसे देऊनही उपचार करून घेतात. जीव वाचवणं एवढं एकच ध्येय असतं.

पण हे कधी? जेव्हा तुमच्याकडे योग्य सोयी असतील तेव्हा…

एखादा गरीब माणूसही डॉक्टरसाठी कर्ज काढून स्वत:चा जीव वाचवतो, पण त्यासाठी सोय असणं महत्त्वाचं आहे. जर दवाखान्यात जाण्यासाठी रुग्णाला वाहनच मिळालं नाही, तशी काही सोयच झाली नाही, तर रुग्णाचा जीव नाहक जाण्याचा धोका असतो.

अजूनही काही आदिवासी भागात अशा प्रकारच्या सोयी-सुविधांवाचून लोकांचे हाल होत आहेत त्यावर काहीतरी ठोस उपाययोजना व्हायला हवी.

 

 

जंगलातील भागात कोणत्याही प्रकारची वाहनं मिळत नाहीत, तिथे रस्तेही नाहीत त्यामुळे तिथे जाण्यासाठी काहीच सोय नाही, अशा परिस्थितीत काहीतरी उपाय करायला हवा.

अशाच एका घटनेमुळे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णाला मदत तर केलीच, पण आता पुढे अशा काही घटना घडू नयेत म्हणून फीडर अ‍ॅम्ब्युलन्स अशी एक योजना अस्तित्वात आणली आहे.

आदिवासी लोकांना जंगल भागात कोणत्याही सोई, सुविधा मिळतच नाहीत. तेलंगणच्या एका दुर्गम गावात हल्लीच एक घटना अशी घडली की, तिथे एका घरीच प्रसूत झालेल्या बाळंतिणीला डॉक्टरांनी वेळेवर मदत केली म्हणून तिचा जीव वाचला. त्यासाठी त्यांनी डोलीसदृश्य अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तिला घेऊन चालत प्रवास केला. पाहुया काय आहे ही घटना.

गुट्टी कोया या आदिवासी समाजातील सुकी नावाच्या २० वर्षांच्या महिलेने दोन जुळ्या मुलांना घरातच जन्म दिला, पण तिची अवस्था फारच चिंताजनक होती.

 

 

तिला प्रसूतीच्या आधी खूपच रक्तस्राव झाला होता. प्रसूतीनंतरही तिचा रक्तस्राव थांबला नव्हता. तिची प्रकृती चिंताजनक होती. तिला दोन्ही मुलगेच झाले होते. एका मुलाचे वजन २ किलो व दुसर्‍याचे १.७५ किलो असे होते.

वातावरण चांगले नसल्याने किंवा आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असल्याने आणि याच वातावरणात मुलांची नाळ तोडल्यामुळे मुलांना संसर्ग, तसेच सेप्टिक होण्याची भीती होती, म्हणजेच तिघांच्याही जिवाला धोका होता.

यावर उपाय करण्यासाठी महिलेला शहरी भागात हलवण्याची गरज होती. पण तशी काहीच सोय नव्हती.

ही गोष्ट उल्वानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामबाबू यांना समजताच त्यांनी स्वदेशी विकास संस्था (आयडीओ) चालवत असलेल्या डॉ. नरेंद्र यांच्यासह रेल्ला चेलुकामधील त्या आदिवासी महिलेच्या घरी धाव घेतली.

त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली. आदिवासी महिलेच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण फार कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तसेच तिथल्या वातावरणामुळे मुलांनाही धोका असल्याचे त्यांना जाणवले. मग त्यांनी कसलाही विचार न करता त्या बाळंतीण स्त्रीला आणि तिच्या दोन मुलांना कुटुंबातील लोकांच्या मदतीसह डोली सदृश्य स्टे्रचर (अस्थायी स्ट्रेचर) मध्ये घेतले.

 

 

डॉक्टरांनी स्वत: ती ‘डोली’ घेऊन ५ किलोमीटरवरील अंतरावरील दवाखान्यात जवळच्या वाटेने चालत जाऊन त्या महिलेला व तिच्या शिशुंना मोठ्या रुग्णालयात नेण्याचे कार्य केले.

शहरातील भद्रचलम् नावाच्या रुग्णालयात त्या तिघांना हलवण्यात आले. त्या दवाखान्यात एकूण १०८ रुग्णवाहिका आहेत. म्हणजे हॉस्पिटल होते, तिकडे अ‍ॅम्ब्युलन्स सुद्धा होत्या.

फक्त जायला-यायला रस्ता नसल्याने रुग्णांना आयत्या वेळी मदत मिळू शकत नाही. जंगल भागात राहणार्‍या लोकांसाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करणे नक्कीच आवश्यक आहे.

डॉक्टरांचे कौतुक यासाठी की, व्यवसायाचा भाग म्हणून पेशंटला तपासणे किंवा डॉक्टरी कर्तव्य करणे हे बरोबर आहे, पण त्यापलीकडे जाऊन माणुसकी दाखवून त्यांनी त्या रुग्णाला योग्य उपचारासाठी नेऊन तीन जणांचे प्राण वाचवले हे खरी कौतुकास्पद गोष्ट आहे.

त्या महिलेला त्या दवाखान्यात नेल्यानंतर तिला रक्त दिले गेले. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्यावर योग्य उपचार केले. त्यानंतर त्या महिलेची प्रकृती स्थिर झाली.

प्रसंगावधनामुळे त्या तिघांचे प्राण वाचवण्यात डॉ. रामबाबू यांना यश आले.

या महिलेवर व तिच्या बाळांवर उपचार झाले आणि त्यांचे जीव वाचले, पण असे अनेक रुग्ण वेळेवर उपचार न झाल्याने प्राणाला मुकतात. आदिवासी लोक जंगल भागात राहतात तिथे त्यांना वेळेवर सोयी उपलब्ध होत नाहीत, यावर काहीतरी उपाय करायला हवा.

 

 

यावर उपाय म्हणून मुलाकपल्ली, गुंडाळा आणि अन्य ठिकाणी फीडर रुग्णवाहिका सुरू करण्याची योजना आखण्यात आली.

जंगलातील लोकांना लगेच मदत मिळावी आणि त्यांचा धोका टळावा यासाठी प्रशासकीय अधिकारी डॉ. विनोद यांनी खास फीडर रुग्णवाहिका सुरू करण्याची योजना आखली आहे.

जिल्हाधिकारी रजतकुमार सैनी यांच्या पुढाकारानंतर जिल्ह्यात पाच फीडर रुग्णवाहिका मंजूर करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे.

फीडर अ‍ॅम्ब्युलन्स म्हणजे काय तर एक मोटारसायकल असेल. त्याला एक छोटी केबीन जोडलेली असेल ज्यात कुशनचा सोफा असेल, जो सेमी स्लिपर असेल. म्हणजे रुग्णाला थोड्याफार प्रमाणात आरामदायी वाटेल.

पण मोटारसायकल मुळे जलद गतीने जाता येईल. चालत डोली करून रुग्णाला नेण्यात फार वेळ जाऊ शकतो, तेवढ्या वेळात पेशंटच्या जिवाला धोका पण असतो.

पण या फीडर अ‍ॅम्ब्युलन्समुळे जरी रस्ते छोटे असले तरी तिथे ही अ‍ॅम्ब्युलन्स जाऊ शकते आणि रुग्णांना मदत होईल.

 

 

या अ‍ॅम्ब्युलन्समुळे रुग्ण कमी वेळात शहरी भागातील प्रशिक्षित डॉक्टरांच्या देखरेखीखाली हलवण्यात मदत होऊ शकेल. आणि तेथील सोई-सुविधांचा लाभ घेऊ शकेल.

सुक्कीला फार मोठ्या दिव्य परीक्षेतून जावं लागलं, पण तिच्या या दिव्य परीक्षेमुळे जणू बाकीच्या रुग्णांना त्वरित आधार मिळण्यासाठी काही योजना आखली गेली. म्हणजेच तिच्यामुळे बाकीच्या रुग्णांना आता फायदा होणार आहे.

लवकरात लवकर सर्व भागात अशा प्रकारच्या सोई उपलब्ध करून देण्याचे कार्य झाले पाहिजे, जेणेकरून रुग्णांना त्याचा फायदा होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version