आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
वनप्लस टेक्नॉलॉजी (शेन्झेन) कंपनी लि., ही कंपनी चीनमधील एका स्मार्टफोनची कंपनी आहे. ती वनप्लस कंपनी या नावानेच ओळखली जाते. पीट लॉ (सीईओ) आणि कार्ल पे यांनी डिसेंबर २०१३ मध्ये ही कंपनी सुरू केली.
या कंपनीचा विस्तार इतका वाढला की, २०१८ पर्यंत ती जगभरातील ३४ देशांमध्ये अधिकृतपणे सेवा पुरवू लागली. त्यांनी असंख्य मोबाईल उपलब्ध केले. भारतीय स्मार्टफोन बाजारात वनप्लस हा स्मार्टफोन खूपच प्रसिद्ध झाला.
माऊथ पब्लिसिटी आणि सकारात्मक विचार, प्रचार यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. त्यामुळे ही कंपनी न थांबता पुढे जोमात चालू राहिली.
स्वस्त दरात, जास्त फॅसिलिटी ग्राहकांना मिळवून देण्यासाठी कंपनी एकामागून एक सुंदर असे मोबाईल फोन मार्केटमध्ये आणत गेली. तेही स्वस्त किंमतीत, त्यामुळे कंपनीला ग्राहक मिळू लागले आणि कंपनीचा फायदा होत गेला.
मोबाईल मार्केटमध्ये नाव मिळवत असताना कंपनीने हळूहळू बाकीच्या क्षेत्रातही प्रवेश करायला सुरुवात केली. त्यांनी टीव्ही बनविण्याकडे लक्ष वळवले. आपल्या सर्वांच्याच जीवनात टीव्ही हा एक अविभाज्य भाग बनला आहे.
स्मार्ट फोनमुळे घड्याळ, रेडिओ ही कन्सेप्ट मागे पडली असली तरी टीव्ही अजूनही पाहिला जातो. टीव्ही क्षेत्रात आधीच खूप प्रतिस्पर्धी आहेत. तरीही वनप्लस कंपनीने तयार केलेला टीव्ही विक्रीसाठी तयार होत आहे आणि लोकांच्यात या टीव्ही बद्दल खूप उत्सुकता आहे. कारण त्याची ऑफरच अशी आहे. ‘स्वस्त किंमतीत प्रिमियम उत्पादन’.
या टीव्हीबद्दल ग्राहकांच्या मनात खूपच उत्सुकता आहे. खूप वाट पाहिल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात हा टीव्ही लाँच करण्यात येत आहे अशी बातमी घोषणा एक वर्षापूर्वी प्रथम केली गेली.
या टीव्हीला ‘वनप्लस टीव्ही’ असे म्हटले जाईल. या टीव्हीबद्दल अजून बरीच माहिती नाहीये पण ब्लूटूथ एसआयजी प्रमाणपत्रामुळे हा टीव्ही ४३ इंच ते ७५ इंच अशा साईजमध्ये तयार केला जाईल असं समजत आहे.
काही रिपोर्टनुसार असं सांगण्यात येतंय की, ४३ इंची टीव्ही फक्त भारतासाठी तयार केला जातोय तर ५५ इंच, ६५ इंच आणि ७५ इंच संपूर्ण जगासाठी तयार केला जात आहे. सर्वांत आधी टीव्ही भारतात आणि चीनमध्ये लाँच केले जाणार आहेत आणि नंतर ते सगळीकडे डिस्ट्रीब्युट केले जातील.
असं म्हटलं जातंय की, हा टेलिव्हिजन अँड्रॉइड व्हर्जनवर चालू होईल, पण प्रत्यक्षात तो कशा पद्धतीने चालू होतो हे तो प्रत्यक्षात लाँच झाल्यावरच समजेल. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचा फाँट असेल की, अँड्राइडटीव्ही प्लॅटफॉर्मवर चालेल.
त्या शिवाय ब्ल्यूटूथ एसआयजी प्रमाणपत्रात असेही दिसून आले आहे की, वनप्लस टीपीव्ही डिस्प्ले टेक्नॉलॉजीज कडून पॅनेल मिळवत आहे, ती डिस्प्ले कंपनी तंत्रज्ञानाच्या जगातील एक दिग्गज कंपनी आहे.
२०१८ च्या वित्तीय अहवालात कंपनीचे अध्यक्ष जेसन हसुआन यांनी फिलिप्स टेलिव्हिजन आणि त्याच्या नवीन ओएलईडी टीव्हीचा जगभरात कसं कौतुक केलं याचा उल्लेख आहे.
२०१८ पर्यंत टीपीव्हीला जगात फिलिप्स टीव्ही विक्रीचे अधिकार होते, परंतु भारतात मात्र ते विक्री करू शकत नव्हते. कंपनीचे तेव्हाचे भागीदार व्हिडिओकॉन या ब्रँडला रॉयल्टी देण्यास अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी हे अधिकार संपादन केले.
वनप्लस टीव्हीच्या सॉफ्टवेअर, यूझर इंटरफेस आणि इतर वैशिष्ट्यांविषयी आताच बाकी काही सांगता येत नाहीये किंवा तशी बातमीही मिळत नाही, परंतु असे वाटत आहे की या पॅनेलची गुणवत्ता किंवा आकार फिलिप्स टीव्हीशी साधर्म्य राखणारा असेल.
वनप्लसचा टीव्ही सर्वांत मोठा टीव्ही आहे ही कदाचित अफवाही असू शकेल, पण या क्षणी काहीच सांगू शकत नाही. कदाचित ते टीव्ही आपल्या नेहमीच्या टीव्हीसारखे पण असू शकतील, पण हा टीव्ही वापरणार्यांना एक वेगळाच अनुभव येईल असं मात्र कंपनी सांगत आहे. पाहू काय होतंय ते.
वनप्लस कंपनी ही मोबाईल फोनमध्ये चांगलीच नावाजलेली कंपनी आहे. ही कंपनी उत्पादनांमध्ये भिन्नता ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरवर अवलंबून असते.
स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम बर्याचदा खूप चांगल्या प्रकारे हाताळलं जातं आणि यूझर फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केला जातो. कोणतीही सिस्टीम जर यूझर फ्रेंडली असेल तर ती ग्राहकाला नक्कीच आवडते आणि त्यांना ती आवडून जाते. प्रभावित करते.
त्यामुळे या टेलिव्हिजनच्या लाँचिंगसाठी भारतीय युझर्ससाठी कंपनी काहीतरी स्थानिक सॉफ्टवेअर वापरले अशी शक्यता आहे. म्हणूनच ब्लूटूथ एसजी सबमिशनमध्ये वनप्लस टीव्हीला ‘अद्वितीय अँड्राईड टीव्ही.’ असे नमूद केले असावे.
वनप्लस कंपनीने स्मार्टफोनमध्ये खूप यश मिळवलं आहे. सध्या एलईडी टीव्हीची मोठी क्रेज आहे, पण यासाठी वनप्लस कंपनीला झिओमीसोबत कडक स्पर्धेला सामोरे जावे लागेल.
झिओमी या कंपनीने देशातील दोन दशलक्ष एमआय एलईडी टीव्ही विकले आहेत आणि त्यांच्याकडे ३९% स्मार्ट टेलिव्हिजन मार्केटमध्ये येण्यासाठी तयार आहेत.
वनप्लस टीव्ही सप्टेंबरच्या अखेरीस लाँच होण्याची अपेक्षा आहे. हा वनप्लस टीव्ही प्रीमियम टीव्ही म्हणला जाईल. भारतीय बाजारात हा अॅमेझॉन साइटवर किंवा ऑनलाइन, किंवा दुकानातही मिळू शकेल असे सांगितले जात आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीट लॉ यांनी गेल्या वर्षी म्हटले होते की, ‘वनप्लस टीव्ही प्रीमियम आणि फ्लॅगशिप पर्याय म्हणून उदयास येईल. वनप्लसने आपल्या नवीन स्मार्ट टीव्हीचे नाव व लोगो जाहीर केला आहे.
फेसबुक पोस्टद्वारेही या टीव्हीचे प्रमोशन केले आहे. कंपनीच्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, टीव्ही कंपनीची मूल्ये व्हिजन आणि वापरकर्ता यांच्यात काहीतरी नावीन्य निर्माण करेल. म्हणजेच या टीव्हीमध्ये काहीतरी नावीन्य असेल.
हा टीव्ही बर्याच स्मार्ट क्षमतेसह सादर केला जाईल जो वापरकर्त्यांना एक स्मूथ अनुभव देऊन जाईल. वनप्लस टीव्हीसाठी जो लोगो आहे की ज्यामध्ये आधी + साईन आहे आणि टी आणि व्ही मध्ये जी स्पेस आहे ती दुप्पट आहे.
असे म्हटले जाऊ शकते की, दोन्ही शब्दांमध्ये समान जाडी आहे, जे समरूपता आणि ऐक्य निश्चित करते.
भारतीय बाजारपेठेत या कंपनीच्या मोबाईलला खूपच लोकप्रियता मिळाली होती, त्यामुळे टीव्हीलाही तशीच लोकप्रियता मिळेल अशी कंपनीला खात्री असावी. पण टीव्ही कंपन्यांमध्ये बरीच मोठी स्पर्धा मात्र या वनप्लसमुळे निर्माण होईल हे नक्की.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.