आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तुम्ही एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी रेल्वेचे रिझर्वेशन करता आणि तुम्हाला मिळालेलं तिकिट वेटिंगचं असतं. परंतु हेच तिकीट जर तुम्ही दलालाकडून घेतलं तर मात्र ते कन्फर्म असतं. असं का?
या दलालांजवळ कुठून आणि कशी येत असतील ही कन्फर्म तिकीटं? आता त्यांना दलाल म्हणा किंवा माफिया म्हणा त्यांना काही फरक पडत नाही.
बरं या दलालांनी दिलेले तिकीट देखील आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून किंवा पीआरएस काउंटर वरूनच मिळालेलं असतं. मग त्यांना कन्फर्म तिकीट मिळत असेल तर ते आपल्याला का मिळत नाही?
यामधील सगळ्या युक्त्या त्यांना माहिती असतात. ज्या आपल्याला माहित नसतात. त्यांना या ट्रिक्स जाणून घेणं गरजेचं असतं, कारण त्यांच्या पोटापाण्याची सोय यावरच होते.
एक उदाहरण पाहिल्यास आपल्या हे लक्षात येईल. समजा, तुम्हाला २५.१२.२०१९ रोजी झाशीहून नागपूरला जायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्लीपर क्लासमधील वेटिंग लिस्टमध्ये नाव लागले आहे.
अशावेळी झाशीपासून जे स्टेशन जवळ असेल जसे की, दातिया, डबरा, मुरैना ते नागपूर असे तिकीट उपलब्ध आहे का पहा. ते तिकीट खरेदी करा. झाशी ते दातिया हे अंतर आहे २५ किमी; दातिया ते नागपूर या सीटदेखील रिकाम्या आहेत.
दलाल सुद्धा अशीच युक्ती वापरतात. ज्यामुळे कन्फर्म तिकीट सहजपणे मिळते.
प्रत्येक सुविधेसाठी पैसे तर मोजावे लागतातच. मग, तुम्हाला थेट कन्फर्म तिकीट मिळवून देण्यासाठी दलालांनी जे तिकीट कन्फर्म करून घेतलेले असते त्यासाठी ते ज्यादा दर आकारतात.
दलाल आणि ट्रॅव्हल एजंट सामान्य कोटा आणि अतिरिक्त कोटा अशा दोन्ही कोट्यातून तिकिटे बुक करून ठेवतात आणि तुम्हाला ज्यादा दराने विकतात.
यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या अनोळखी लोकांवर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो. त्यात जर याबाबत तुम्हाला पुरेशी माहिती नसेल तर तुम्ही असाह्य होऊन जाता.
यावर आणखी एक उपाय हा आहे की, तुम्ही आरक्षित कोट्यातून तिकीट खरेदी करू शकता. तुमच्या भागाचे कोणी आमदार, खासदार जर तुमच्या ओळखीचे असतील, तर तुम्ही त्यांच्याकडून शिफारस पत्र घेऊन, व्हीआयपी कोट्यातून प्रवास करू शकता.
याशिवाय तुमची जर रेल्वे अधिकाऱ्यांशी ओळख असेल तर तेदेखील तुम्हाला त्यांच्या कोट्यातून तिकीट आरक्षित करून देऊ शकतात. मात्र ही सुविधा ऑनलाईन तिकिटासाठी अस्तित्वात नाही.
रीझर्व्ह चार्टमध्येही जर तुमचे नाव वेटिंगच्या यादीत असेल, तर प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला टीसी बर्थ उपलब्ध करून देऊ शकेल. ऑफलाईन तिकीट कन्फर्म करण्याच्या या काही टिप्स…
आता ऑनलाईन तिकीट कसे कन्फर्म करावे याच्या काही टिप्स पाहूया.
ट्रॅव्हल एजंट तुम्हाला तिकीट कन्फर्म करून देतात. तेच तिकीट तुम्ही या टिप्स वापरून स्वतः देखील काढू शकता.
१. वेब ऐवजी मोबाईलच्या सहाय्याने तिकीट बुक करणे सोपे राहील. कारण, वेबवर तीन-चार वेळा तुम्हाला कॅप्चा टाकावा लागतो. परंतु मोबाईल अॅप्लिकेशन वरून तीन-चार वेळा कॅप्चा टाकण्याची गरज नाही.
२. आधी मोबाईलवरून IRCTC वर लॉगीन करण्यासाठी ठराविक वेळ दिला जायचा आणि तात्काळ तिकीट बुक करता येत नव्हते. आत्ता मात्र आता असा नियम नाही. त्यामुळे मोबाईलद्वारे तिकीट बुक करणे आता सोप झालं आहे.
३. तुम्ही जिथून प्रवास सुरु करणार आहात आणि जिथे तुमचा प्रवास संपणार आहे त्या मार्गावर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या क्लासमधील रिझर्वेशन संपले असल्यास, दुसऱ्या क्लासचे रिझर्व्हेशन मिळते का हे पहा. त्यासाठी असणारा उपलब्ध कोटा पाहून घ्या.
अनेकदा आपण आपल्या घरातील स्त्रिया किंवा वृद्ध व्यक्तींसाठी तिकीट कन्फर्म करत असतो. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा स्वतंत्र कोटा आणि महिलांसाठी असणारा स्वतंत्र कोटा यामध्ये देखील रिझर्वेशन करू शकतो.
४. जास्त लांबच्या रेल्वे बऱ्याचदा अनेक रेल्वे झोन वरून जातात. यांचे संचलन कोणत्याही झोनमधून होत असले तरी, प्रवासादरम्यान यांचे संचलन वेगवेगळ्या झोन मधून होते.
उदाहरण घ्यायचे झाल्यास, दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या तामिळनाडू एक्प्रेसचे संचलन दक्षिण रेल्वे करते. परंतु ही रेल्वे उत्तर रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे मंडळातून प्रवास करत शेवटी दक्षिण रेल्वे मंडळात पोचते.
अर्थातच जितक्या रेल्वे मंडळाच्या हद्दितून ही रेल्वे प्रवास करेल त्या त्या रेल्वे मंडळाचा देखील प्रवासी कोटा असणार आहे. या कोट्याचा योग्य वापर करून तिकीट बुक करता येईल.
ही छोटीशी युक्ती, तुमचा प्रवास आरामदायक करण्यासाठी उपयोगी पडू शकते.
५. दिल्लीहून चेन्नईला जाण्यासाठी तुम्हाला थेट रिझर्वेशन मिळत नाहीये; तर या मार्गावरील मोठे जंक्शन, आग्रा, झांसी, बिना, भोपाल, इटारसी, नागपूर, बल्हारशाह, वारंगल आणि विजयवाडा या मधल्या स्टेशन वरून तुम्ही पुढील प्रवासाचे तिकीट बुक करू शकता.
समजा, झाशीपासून बल्हारशाहपर्यंतचे तिकीट उपलब्ध आहे तर, बल्हारशाह पर्यंतचा प्रवास करून तिथून पुढे थोडा वेळ थांबून पुढल्या ट्रेनने पुढचा प्रवास करू शकता.
६. आता तत्काळ तिकीटासंबधी एक महत्वाची गोष्ट! तुम्ही जर अँड्रॉइड युजर असाल तर सर्वात आधी IRCTC साठीचे auto fill application डाऊनलोड करा. कारण तत्काळ तिकीटासाठीचे रिझर्वेशन १० वाजता आणि १२ वाजता सुरु होते.
कोणत्या तारखेला आणि कुठल्या ट्रेनने तुम्ही प्रवास करणार आहात हे तुम्हाला आधीच माहिती असेल, तर तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.
७. auto fill मध्ये आपल्या आवडते बर्थचे डिटेल देऊ नका. कारण यासाठी तुम्हाला सर्वस्वी रेल्वेच्या मेहेरबानीवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
आरक्षण सुरु होताच auto fill application सुरु करा आणि बाकी इतर कामे आपसूक होऊन जातील. यासाठी केवळ दोन वेळा इनपुट द्यावा लागेल. आता थेट पेमेंट पेज वर या.
८. पैसे भरण्यासाठी रेल्वे वॉलेटचाच वापर करा. इतर बँकेचे पेमेंट अॅप वापराल तर connection time out चा धोका उद्भवू शकतो.
९. तुमचे तत्काळ तिकीट तुमच्या हातात असेल. पण, ध्यानात घ्या हे अॅप्लिकेशन फक्त स्वतःसाठीच वापरा. इतर कोणाला तरी तिकीट मिळवून देऊन पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर, हा एक दंडनीय अपराध आहे.
हे तुम्हाला खूप महागात पडेल. आयटी कायदा आणि ४२० ची अनेक कलमे तुम्हाला लागू शकतील. जी काही जोखीम घ्यायची ती पूर्ण विचार करून घ्या.
१०. दर दोन तीन महिन्यांनी रेल्वे auto fill application ची सोय रद्द करते. परंतु, डेव्हलपर नवीन अॅप्लिकेशन बनवतात. याशिवाय रेल्वे काही आयडी आणि वॅलेटचे ट्रांजॅक्शन पॅटर्न शोधते ज्याच्या सहाय्याने कायदेशीर कारवाई केली जाते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.