आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
प्रत्येक मानवी असक्षमतेवर उपाय शोधणे हाच विज्ञानाचा मूळ हेतू आहे. जिथे जिथे मानवाला काही गोष्टी आव्हानात्मक वाटतात तिथेतिथे विज्ञान त्याच्यासाठी वरदान ठरत आलंय.
मानवी जीवनातील काही गोष्टी अशा आहेत की, त्याबाबतचे गूढ अजूनही पूर्ण उलगडत नाहीये किंवा काही गोष्टींवर पूर्ण नियंत्रण मिळवणे
अशक्य आहे.
पण, अशक्य ते शक्य करत राहण्याचा विज्ञानाचा कयास मात्र सतत सुरु राहणार आहे. प्रजननही अशीच एक बाब आहे, जी पूर्णतः माणसाच्या आवाक्यातील बाब नाहीये.
आपल्या आजूबाजूला अनेक जोडपी अशी असतात, ज्यांना वंध्यत्वाचा शाप असतो किंवा कधी कधी सर्व काही ठीक असताना किंवा काहीही दोष नसताना देखील अपत्य प्राप्ती होत नाही.
टेस्ट ट्यूब, आयव्हीएफ सारखे प्रगत तंत्रज्ञान असले तरी, कधी कधी सगळेच प्रयत्न निष्फळ ठरताहेत. आयव्हीएफ तंत्रज्ञान १९७८च्या सुमारास उदयास आले.
सुमारे ४० वर्षापूर्वी टेस्टट्यूब तंत्रज्ञानाद्वारे पहिले अपत्य जन्माला आले.
या तंत्रज्ञानाच्या यशामुळे जगातील लाखो लोकांना अपत्य प्राप्तीचा आनंद मिळाला यात तिळमात्र शंका नाही. आयव्हीएफ तंत्रज्ञानामध्ये पुरुषातील शुक्राणू काढून त्यांचे स्त्रीबीजाशी गर्भाशयाच्या बाहेर मिलन घडवून आणले जाते आणि तो गर्भ पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो.
आत्ता इथे पहिली अट ही आहे की, ज्या दांपत्याला आई-वडील व्हायचे आहे त्यांच्यामध्ये पुरेशा प्रमाणत शुक्राणू आणि स्त्रीबीजांची
संख्या असली पाहिजे.
पण, एखाद्या व्यक्तीमध्ये जर शुक्राणूचे किंवा स्त्रीबिजांचे प्रमाणच कमी असेल किंवा ते निरोगी शुक्राणू आणि स्त्रीबीज तयार होत नसतील तर, त्यांना आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा काही एक फायदा होणार नाही.
म्हणूनच काही दांपत्यांमध्ये आयव्हीएफ तंत्रज्ञान देखील निष्फळ ठरत असल्याचे दिसून येते. अशा दांपत्यांना शुक्राणू दाता किंवा स्त्रीबीज दाता शोधण्याची वेळ येते.
पण, जर कृत्रिम शुक्राणू किंवा कृत्रीम स्त्रीबीजाचा शोध लावता आला तर, नक्कीच त्याचा फायदा अशा दांपत्यांना होऊ शकतो. म्हणूनच कॉर्नेल विद्यापीठाच्या तीन शास्त्रज्ञांच्या पथकाने यावर संशोधन करून कृत्रिम शुक्राणूंची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे.
गर्भाशयातील उतीमधील पेशींचा वापर करत शास्त्रज्ञांनी अधिक प्रभावी शुक्राणूंची निर्मिती केली आहे, हे शुक्राणू यशस्वीरित्या गर्भधारणा करू शकतात की नाही याची सध्या चाचपणी सुरु आहे.
सध्या या शास्त्रज्ञानी ज्या प्रकरच्या शुक्राणूंची निर्मिती केली आहे त्याला गोल्ड स्टॅंडर्ड स्पर्म सेल्स म्हंटले जाते. या पेंशीमध्ये वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट प्रकारची वाढ दाखवणे गरजेचे असते.
उदाहरणार्थ, क्रोमोझोम्सची योग्य संख्या आणि ज्याच्याकडून डीएनए घेण्यात आला आहे त्याची योग्य भाग. हे पप्रमाण सध्या करणे सोपे नसते. यापूर्वीच्या अनेक प्रयोगात सेक्स पेशींची योग्य प्रमाणात विभागणी करण्यात अपयश आले आहे.
आतापर्यंत शास्त्रज्ञांनी हे अचूक विभाजन साधताना सेक्स पेशींचे असे विभाजन करण्यात यश मिळाले नाही ज्यामध्ये वडिलांच्या क्रोमोझोम्सची संख्या निम्मी असेल.
त्यामुळे या टीमने पेशींचे योग्य विभाजन करवून आणण्यात ही यश मिळवले आहे. ज्यामुळे या पेशीद्वारे जन्माला येणारे तान्हुल्या बाळामध्ये नैसर्गिकरित्या जन्माला येणाऱ्या मुलांप्रमाणे आईचे निम्मे क्रोमोझोम्स आणि वडिलाचे निम्मे क्रोमोझोम्स असतील.
आमची टीम अशी पहिली टीम असणार आहे ज्यांनी यशस्वी गर्भधारणा होण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असतील, अशी माहिती या टीमचे सदस्य जिआहो शा यांनी दिली.
गेल्याच वर्षी चायनीज अकॅडेमीच्या सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ झुलॉजीच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत क्रियाशील उंदराच्या स्पर्म बनवण्यात यश आल्याचे जाहीर केले होते.
या टीमने नेमकं काय केलं? तर या संशोधकांनी उंदरातील प्रजनन उतींमधील पेशी काढल्या. त्यांची सायटोकिन्स नावाच्या रसायानासोबत अभिक्रिया घडवून आणली.
ज्यामुळे त्यांचे रुपांतर जर्म सेल्स मध्ये झाले- या अशा पेशी असतात, जे शरीरातील सेक्स पेशी (अंडी किंवा शुक्राणू) ची वाढ होण्यास मदत करतात.
या पेशी लैंगिक संप्रेरकांच्या शेजारी ठेवली जातात, जसे की टेस्टोटेरॉन, ज्यामुळे त्यांची वाढ स्पर्माटीड मध्ये होते. स्पर्माटीड म्हणजे अपुरी वाढ झालेले शुक्राणूच असतात! हे स्पर्माटीड इंजेक्शनद्वारे उंदराच्या स्त्रीबिजात सोडण्यात आले.
यातून यशस्वीरित्या तयार झालेला गर्भ उंदरीणीच्या गर्भाशयात सोडण्यात आला, जिने नोरोगी पिल्लांना जन्म दिला आहे. यावरून मेओसीसची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारे जर्म सेल्स प्रयोग शाळेत तयार करता येतात हे सिद्ध झाले आहे.
स्टेम सेल्स आणि काही केमिकल्स आणि टेस्टीक्युलर टीस्यूतील संप्रेरकांच्या मदतीने ही प्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण करता येते हे सिद्ध झालेला आहे.
आत्ता हे तंत्रज्ञानाचा प्रयोग फक्त उंदरांवर करण्यात येत आहे. त्यामुळे मानवी शरीरात देखील त्याचे काम तंतोतंत असेच होईल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही.
परंतु, भविष्यात एकेदिवशी शास्त्रज्ञ एखाद्या नपुंसक मानवातील पेशी- जसे की गालाच्या असतील किंवा हनुवटीच्या, काढून घेतील, त्यांना स्टेट पेशीमध्ये रुपांतरीत करतील आणि मग त्यापासून स्पर्माटीड्स तयार केले जातील ज्याचा वापर आयव्हीएफ मध्ये होऊ शकतो.
२०१६ मध्ये अशाच पद्धतीने उंदराचे स्त्रीबीज देखील तयार करण्यात क्यूशू युनिव्हर्सिटी, फुकुओका येथे यश मिळाले आहे. जपानच्या शास्त्रज्ञांनी उंदराच्या त्वचेतील पेशींचे रुपांतर आयपीएससी मध्ये गेले आणि याचे रुपांतर नंतर बीजामध्ये करण्यात आले.
पुन्हा अशाच प्रकारे रासायनिक मिश्रणाच्या सहाय्याने आणि गर्भाशयातील उतींच्या उपस्थितीत उंदराचे स्त्रीबीज निर्माण करण्यात आले. या स्त्री बिजांमध्ये जेंव्हा इंजेक्शनद्वारे शुक्राणू सोडण्यात आले तेंव्हा यशस्वी गर्भधारणा तर झालीच पण, याद्वारे जन्मलेली पिल्ली देखील निरोगी आहेत.
अशाच प्रकारे या तंत्रज्ञानाचा इतर काही प्राण्यांवर देखील प्रयोग केला जाईल. सध्या लगेच याचा वापर मानवी शरीरावर करता येत नसला तरी, तो लवकर करण्यात येईल.
पण, अशा प्रकारे जन्मलेल्या मानवी अपत्यांमध्ये काही नैसर्गिक दोष निर्माण होतील का याचाही शोध सुरु आहे, लवकरच यावरही उपाय शोधला जाईल आणि हे तंत्रज्ञान उपयोगात आणले जाईल अशी माहिती, जिआहो शा टीमच्या सदस्यांनी दिली.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.