मिशन मंगल बघावा की बघू नये? – इंटरनेट काय म्हणतंय वाचा आणि ठरवा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
१५ ऑगस्ट रोजी भारतीयांनी आपला स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला आहे, बॉलीवूड देखील स्वातंत्र्यदिनी लोकांसाठी खास चित्रपटांची मेजवानी घेऊन आले आहे. ह्या सर्व चित्रपटात सर्वात जास्त आकर्षण असलेला चित्रपट होता अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’.
भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रचंड मोठे यश समजल्या जाणाऱ्या मंगळयान मोहिमेवर हा चित्रपट बेतलेला आहे. निश्चितच प्रत्येक भारतीयाला अभिमानाला वाटावा असा तो क्षण मोठ्या पडद्यावर अनुभवायची मजाच काही और आहे.
हे काही आमचं मत नाही आहे, पण मिशन मंगल बघून आलेल्या अनेकांचे आहे.
ट्विटर आणि फेसबुकवर ह्या समाज माध्यमांवर अनेकांनी लोकांनी ह्या चित्रपटासंबंधीत आपलं मत मांडलं आहे. तर चला आपण निवडक ट्विट्स आणि फेसबुक पोस्ट बघुयात, ज्यातून आपल्याला ह्या चित्रपटाला बघितल्यानंतर लोकांचा एकूण सूर काय आहे हे तर कळेलच सोबत ह्या विकेंडला काय करायचं ह्याचं कोडं देखील सुटेल.
आधी आपण काही फेसबुक पोस्ट्स बघुया….
१) विभावरी बिडवे यांची फेसबुक पोस्ट
मिशन मंगल पाहिला, आवडला. फिल्मी आहेच. पण नाहीतर डॉक्युमेंटरी झाली असती!
इसरो मध्ये आहेच आणि म्हणूनच पिक्चरमध्येही आहे, महिलांचा प्रॉमिनन्स आवडला. आवर्जून दाखवलेलाही आवडला. त्यांचा साधेपणा, घर, घरातले प्रश्न आणि त्याची हाताळणी हा वेगळा पिक्चरचा विषय होऊ शकेल. ह्यासाठीही हा पिक्चर बघायला हवा.
खासकरून तारा जिच्या घरात अगदी धार्मिक वातावरण आहे तिचा मुलगा सुफी संगितामुळे इस्लामकडे आकर्षित होतोय. त्यामुळे ताराचा नवरा अतिशय भडकलेला आहे.
प्रत्यक्ष विषयावर न बोलता ती त्याच्याशी अधूनमधून जो संवाद साधते, अप्रत्यक्षरित्या त्याला काही उत्तरं मिळत जातात आणि आईबरोबर बोलताना तो निरूत्तर होत जातो. तसंच उशीरा घरी येणाऱ्या मुलीचं…. छान डील करते ती!
शास्त्रीय दृष्टीकोण प्रत्येक गोष्टीकडे बघायची अशी तार्कीकता देतो जी इतरत्र आयुष्य जगताना वापरली गेली तर तुम्ही हाडाचे शास्त्रज्ञ!
कामाविषयी विचार करत असताना तारा नवर्याच्या कटकटीकडे पूर्ण दुर्लक्ष करून, घरातून पर्स घेऊन बाहेर पडते, पडू शकते हे दाखवलेलंही आवडलं.
त्यातही आधीच्या मंगलयानाच्या अपयशाबद्दल नवरा तिला टोचून बोलतो तरी जराही मनावर न घेता तिचा आत्मविश्वास डळमळीत होऊ देत नाही.
स्त्रीवादाचं असं उदाहरण दुर्मिळच! एक पूर्णत्वाला पोहोचलेली व्यक्तीच असं वागू शकते. अशी उदाहरणं प्रत्यक्ष असतातच पण पिक्चर्समधून ती पोहोचवलीही पाहिजेत.
धार्मिक आस्था ठेवूनही वैज्ञानिक दृष्टीकोण उच्चतम होऊ शकतो. उलट Science and spirituality go hand in hand…. हे दाखवायचा प्रयत्नही चांगला.
महिला सक्षमता आणि समानतेसाठीही बघावा. डिव्होर्स, बाळंतपण, परिवार आजारपणं हे अडथळे नाहीत. त्यातूनही कार्यरत रहाता येतं, झोकून देता येतं आणि करिअरही केलं जाऊ शकतं. महिला करतात, जास्त सक्षमतेनं करतात.
झीरो फिगर ही भारतीय स्त्रीची एकमेव आकांक्षा नाही. चांगली जाडजूड स्त्रीही सर्वोच्च काम करते. साडी नेसून, गजरे घालूनही हे काम केलं जाऊ शकतं. It’s not outdated, it’s not old fashioned….
नासामध्ये काम करायला मिळणं इतक्याच उत्तमोत्तम संधी भारतातही आहेत हापण संदेश पिक्चर देतो. सोनाक्षी नंतर साडीमध्ये दाखवलीय हा बदल, बाहेर जाण्याच्या प्रतिक्षेत अशा एक जरी उच्चशिक्षित व्यक्तीला भारतात राहून काही करावसं वाटलं तरी हे पिक्चरचं यश आहे.
थोडा बाळबोध आहे, फिल्मी आहे पण बघावासा आहे.
२) अशोक वानखेडे यांची फेसबुक पोस्ट..,
एक अतिशय चांगला व चाकोरीबाहेरचा सिनेमा पहायचा असेल तर हा सिनेमा जरुर पहावा. विज्ञानावर आधारित एक चांगला सिनेमा पहायचा असल्यास जरुर पहावा.
अवकाश शास्राचा अभ्यास किती सखोल करावा लागतो हे कळून घेण्यासाठी तरी नक्की पहावा. शास्त्रज्ञ होणे म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी तरी नक्की पहावा.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे समजून घेण्यासाठी तरी पहावाच. सर्वसामान्यांचे जीवन व शास्त्रज्ञांचे जीवन यातील फरक जाणून घेण्यासाठी पहावाच पहावा.
ज्यांनी आपल्या कर्तव्यात सर्वस्व झोकून दिलेय त्यांचे वैयक्तिक आयुष्य किती खडतर असते, आपल्या संसाराची कशी वाताहत होवू शकते याची जाणीव होण्यासाठी तर नक्कीच पहावा.
अक्षय कुमार व विद्या बालन यांच्या साठी तरी जरुर पहावा. विद्या बालन is great, फारच सुपर काम झालेय विद्या बालनचे, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणायचे नसते हे जाणून घेण्यासाठी तरी पहावाच.
ज्यांच्या डोक्यात पक्षीय राजकारणाची किड नाही व ज्यांना आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे त्यांनी जरुर पहावाच.
ISRO च्या कर्तृत्वात तेथील शास्त्रज्ञांचे फक्त श्रेय असून त्या यशावेळी कुणाची सत्ता होती व कुणाची नव्हती याचा किस काढत बसत थिल्लर राजकारण करीत बसू नयें .
टिप : कृपया राजकिय कॉमेंट्स करु नये . नाहीतर अशा सिनेमांच्या वाट्यालाच जावू नये . मिडियाच्या नादी लागून अशा घटनांची समिक्षा नाही होवू शकत. असो.
३) सुचिकांत वनारसे यांनी अगदी कमी शब्दात आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यामातून चित्रपटासंदर्भातील आपलं मत व्यक्त केले आहे.
फेसबुकप्रमाणे अनेक लोकांनी ट्विटर आपलं मत मांडलं आहे. चला आपण बघुयात मिशन मंगल संदर्भातील काही निवडक ट्विट्स…
१) रोहित जयस्वाल यांचं ट्विट
२) सुमित कडेल यांचं ट्विट
३) टेमसुटूला इंसोन्ग यांचं ट्विट
४) फरीदुन शहरयार यांचं ट्विट
५) शुभा शेट्टी यांचं ट्विट..
अश्या प्रकारे बहुतांश लोकांच्या मते ‘मिशन मंगल’ हा चांगला चित्रपट असून, ह्यात देशाच्या अभिमानाची गोष्ट असलेल्या मंगळयान मिशनचे चित्रण करण्यात आले आहे.
आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांचं कार्य, माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ एपीजे अब्दुल कलाम सर यांचं योगदान आणि इस्रोचे कार्य समजून घ्यायचं असेल तर एकदा मिशन मंगल एकदा नक्की बघितला पाहिजेच.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.