आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
वेगवेगळ्या अतिरेकी संघटना सरकारची डोकेदुखी वाढवतात. त्यांनी केलेल्या अतिरेकी कारवाया जीवीतहानी, वित्तहानी करतातच शिवाय तरुणांची डोकी भडकवतात.. आणि हळूहळू या संघटना देशात हातपाय पसरायला सुरुवात करतात.
या संघटना मोडून काढणं हे सरकारपुढे असलेलं फार मोठं आव्हान आहे. बऱ्याच अतिरेक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
या वेगवेगळ्या संघटनांपैकी एक म्हणजे माओवादी संघटना!!!
माओवाद ही चीनमधील झेडांग माओ याने सुरु केलेली सशस्त्र चळवळ.येन केन प्रकारेण सत्ता हस्तगत करणे हा मुख्य उद्देश असलेली ही चळवळ.यांचा हिंसाचाराला जास्त पाठिंबा.
भारतातही या माओवादाने हातपाय पसरले आहेत. छत्तीसगडमध्ये ही चळवळ अजूनही चालू आहे. याच चळवळीत एक विलक्षण अनुभव आहे
सख्खे बहिण भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. कान्नी आणि वेट्टी रामा.. कान्नी ही माओवादी नेता आहे तर वेट्टी रामा हा भारतीय पोलिस दलात आहे. एका सकाळी हे दोघेही एकमेकांच्या समोर बंदूक घेऊन एकमेकांवर रोखून उभे राहिले.
छत्तीसगडमध्ये सुक्या जिल्ह्यातील ही गोष्ट.. २९ जुलै च्या रात्री गुप्त पोलिस स्क्वाड रात्रभर चालत होता. वेट्टी रामा हा त्यांचा प्रमुख.छत्तीसगढ पोलिस आणि त्या आॅपरेशनचा सेक्शन प्रमुख होता.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
त्यांचं लक्ष्य होतं वेट्टी कन्नी!!! वेट्टी कन्नी ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माओवादी गटाची मेंबर आणि इतर ३० जण.
हे समोरासमोर आले आणि वेट्टीच्या अंगरक्षक असलेल्या गार्ड्सनी व रामाने गोळीबार सुरू केला.यात दोन नक्षलवादी मारले गेले पण कन्नी पळून जाण्यात यशस्वी झाली.
या एन्काऊंटरनं एक गोष्ट लक्षात आली की दरवेळीच रक्त दाट असतं असं नाही. कधी कधी कर्तव्य बजावताना लोक नात्यापेक्षा कर्तव्य, देशकार्य महत्त्वाचे मानतात.
कन्नी ५० वर्षे वयाची तर रामा ४७ वर्षांचा. हे दोघे सख्खे बहिण भाऊ. पण भाऊ पोलिस आणि बहिण नक्षलवादी गटात!!!
रामा सांगत होता,
“मला तिच्यावर गोळ्या झाडायच्या नव्हत्या. पण तिच्या रक्षकांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला मग माझा नाईलाज झाला. मी त्यांच्या दिशेने गोळीबार केला पण ती मात्र जंगलातून पळून जाण्यात यशस्वी झाली.”
कन्नी ही कोंटा येथील नक्षलवादी गटाची एरीया कमिटी मेंबर. ती पोडीयारो म्हणून नियुक्त होती. पोडीयारो म्हणजे कायदेशीर बाबी सांभाळणारा माणूस. म्हणजे पकडले गेलेले नक्षलवादी यांच्या कायदेशीर बाबी पहायच्या.
मृत नक्षलवादी लोकांच्या कुटुंबातील लोकांना आधार द्यायचा ही कामे पोडीयारो करतात. जिच्यावर सरकारने पंधरा लाखाचं इनाम जाहीर केलं होतं. कोंटामध्ये प्रवेश करण्यासाठी बस्तर येथूनचा रस्ता वापरला जातो. बहुतेक माओवादी तिथूनच कोंटाला येतात.
–
- माओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)
- हा “माओवाद” नेमका आहे तरी काय? खरा की खोटा? समजून घ्या
–
हा भाग तेलंगणाच्या सीमेवर आहे. आणि माओवादी लोकांचा बालेकिल्ला म्हणा. माओवादी इथूनच ये जा करतात. आणि त्यांचा विस्तार इथंच जास्त प्रमाणात आहे.
याची सुरुवात १९८० साली झाली होती. माओवाद्यांनी या भागात साठ किलोमीटर भाग व्यापला आहे. यात एकूण ११६ खेडी येतात. पोलिसांच्या मते ५० खेड्यांत माओवादी समांतर सरकार चालवतात.
रामा आणि कन्नीची कथा-
१९९० च्या सुरुवातीला रामा आणि कन्नी दोघेही इतर तरुणांबरोबर नक्षलवादी गटात सामील झाले. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३० वर हे जाळं पसरलं आहे. बाल संघम या छोट्या मुलांच्या गटात ते सामील झाले.
त्यांना सांगितलं होतं की, ही चळवळ गरीब लोकांच्या कल्याणासाठी आहे. पण नंतर नंतर त्यातील उणीवा लक्षात येताच रामाने हा मार्ग सोडायचा निश्चय केला.
नुसता केलाच नाही तर त्याने पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय अंमलात आणला. २०१८ मध्ये तो पोलिसांच्या स्वाधीन झाला. आणि त्यासाठी त्याला काॅन्स्टेबलची नोकरीही सरकारनं देऊ केली. १० मोठ्या कारवायांमध्ये रामाला सामील करून घेतलं गेलं.
छत्तीसगड सरकारने गुप्त पोलिस ही पोस्ट खास लोकांसाठी तयार केली आहे. रामाला या दहा धाडसी कारवाया करण्यासाठी गुप्त सैनिक म्हणून बढती देण्यात आली. हे गुप्त सैनिक नेमणूक करायचे काम छत्तीसगढ सरकारतर्फे पोलिस अधिक्षक करतात.
त्यानंतर त्यांना काॅन्स्टेबल म्हणून बढती देण्यात आली.
रामाही पूर्वी मोस्ट वाॅण्टेड नक्षलवादी होता. त्याने आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याच्यावर सरकारने साडेसहा लाखाचे इनाम जाहीर केले होते. तो नक्षलवादी लोकांच्या गटाचा एरिया कमिटी मेंबर होता.
अतिशय प्रभावशाली नेतृत्व असलेला रामा तिथं नक्षलवादी लोकांच्या भरतीचं मोठं काम करत होता.त्याला खूप बारकावे माहीत होते त्यामुळे त्यांचं आत्मसमर्पण आमच्या पोलिस दलासाठी फार महत्त्वाचे आहे.
–
- भारतातून नक्षलवाद न संपण्यामागचं कारण आहे – एक व्यापक “कारस्थान”
- शाळेच्या पत्रलेखन स्पर्धेत ‘नक्षलवाद्याच्या’ मुलीने बापाला लिहिलंय हृदय हेलावून टाकणारं पत्र
–
उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांनी ही गोष्ट सांगितली.
रामाला त्याच्या आत्मसमर्पण करण्याचं कारण विचारलं तेंव्हा त्यानं सांगितलं, ज्या निष्ठेनं मी काम करत होतो ते बाजूला ठेवून मला पदोन्नती न देता एरिया कमिटी मेंबर या पदावरुन पदावनती दिली.
माझ्या पत्नीला मी सात वर्षे भेटलो नाही..मला भेटू दिलं नाही. आणि वरीष्ठ पातळीवर काम करणाऱ्या लोकांना माझ्या कामाची कदर नव्हती. माझ्या अस्वस्थ असण्याची जाणीव नव्हती.
आपल्या बहिणीनं ही आत्मसमर्पण करुन सुखी व्हावं म्हणून रामानं तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. तिला तीन पत्रं लिहीली. तिनं एकच उत्तर दिलं, मी क्रांतीकारक आहे. मला असल्या गोष्टी सुचवू नकोस. मी तुझ्यासारखी गद्दार नाही. मला सुधारण्याचा प्रयत्न करु नकोस.
हे पत्र हिंदुस्थान टाईम्स या वर्तमानपत्रात छापून आले. रामावर आरोपांची परत फेड झाडली होती की, रामा या चळवळीला खिळखिळी करतो आहे. पोलिस सेवेत गेल्यानंतर निष्पाप लोकांना कैद करण्याचे काम करत आहेस.
पण पोलिस दलाने या आरोपात कसलंही तथ्थ नाही असं स्पष्टीकरण देत नक्षलवादी चळवळीचे सारे आरोप फेटाळून लावले.
त्याची परिणीती म्हणून आणखी एक नक्षली अर्जुन माडकमही पोलिसांना शरण आला.
आपल्या बहिणीला मारणं इतकं सोपं नाही याची रामाला जाणीव आहे. तो आजही तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आता रामा पोलिस क्वार्टर्समध्ये आपल्या पत्नीसह राहतो. पण त्याला अजून आशा वाटते की कन्नी आत्मसमर्पण करुन नव़ आयुष्य सुरु करेल.
सख्खे बहिण भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे आहेत..एक पोलिस तर दुसरी नक्षली ही केस दुर्मिळ आहे. पण जगात आश्चर्यांची कमी नाही…नाही का?
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.