Site icon InMarathi

महिला पोलीस ऑफिसरचे एका गुन्हेगारावर प्रेम जडलं – पुढे काय झालं?

gangster rahul and payal InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

=== 

कथा कादंबऱ्यातून आणि अनेक हिंदी चित्रपटातून प्रेम कथा तर खूप पहिल्या असतील. काही तुमच्या आजूबाजूलाही घडल्या असतीलच! प्रेम कधी, कुठे सुरु होईल हे सांगणे तसे फारच कठीण. कित्येक प्रियकर प्रेयसीच्या कथांनी तर अजूनही लोकांच्या मनावर गरुड केले आहे.

रोमिओ-ज्युलीएट असो की हिर-रांझा यांच्या प्रेम कथा अजूनही चवीने चर्चिल्या जातात. आदर्श प्रेमाच्या परीकथा म्हणून त्यांची मान्यता आजही अबाधित आहे.

 

steemit

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पण, आत्ता तुम्ही जे वाचणार आहात ती जगातील एक अत्यंत वेगळी आणि आश्चर्याचा धक्का देणारी प्रेम कथा आहे.

एक पोलीस कॉन्स्टेबल कुख्यात गुंडाच्या प्रेमात पडल्याची अशी विलक्षण कथा तुम्हाला कुठल्या कादंबरीत किंवा चित्रपटातून देखील वाचायला किंवा पाहायला मिळणार नाही. परंतु, वास्तवात मात्र अशीही एक प्रेमकथा समोर आली आहे.

कित्येक वर्षे त्यांच्या प्रेम आराधनेला आत्ता यश मिळाले आहे. तुम्हीही वाचून आवाक व्हाल!

 

scoopwoop

 

त्यांची भेट झाली ती एका न्यायालयाच्या आवारात. तो एक गुन्हेगार ज्याच्यावर दरोड्यापासून ते खुनापर्यंतचे गंभीर आरोप होते, आणि ती एक पोलीस कॉन्स्टेबल! “सद रक्षणाय, खल निग्रहणाय” चे ब्रीद घेऊन काम करणारी. जनतेला कायद्याची आणि शांततेची हमी देणारी.

हे ही वाचा –

===

 

quora

 

त्यांची भेटच झाली एका न्यायालयाच्या आवारात जिथे त्याला एक खुनाच्या गुन्ह्या अंतर्गत खटला चालवण्यासाठी नेले जात होते. तो एक कुख्यात गुंड आहे आणि त्याचे अनेक क्रूर किस्से तिला माहित असून देखील तिचे मन त्याच्यावरच जडले.

प्रेम आंधळे असते असे म्हंटले जाते, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. हा किस्सा फक्त प्रेमावरच थांबला नाही तर, काही काळापूर्वी  हे प्रेम लग्नात परिवर्तीत देखील झाले होते.

राहुल थासाराना हा उत्तरप्रदेशातील अनिल दुजना टोळीतील एक कुख्यात गुंड. त्याच्यावर दरोडे टाकणे, खंडणी वसूल करणे, खून करणे, असे अनेक गंभीर आरोप त्याच्यावर पूर्वीही लावले गेले होते.

९ मे २०१४ रोजी त्याला मनमोहन गोयल या व्यापाऱ्याच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. याच दरम्यान त्याची ओळख कॉन्स्टेबल पायलशी झाली होती. त्यावेळी पायलची सुरजपूर न्यायालयात नेमणूक करण्यात आली होती.

तो जेल मध्ये असताना आणि जामिनावर बाहेर आल्यावर देखील पायल त्याच्या संपर्कात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अलिकडेच राहुलने आपल्या लग्नाचे फोटो ट्विटरवरून व्हायरल केले होते.

 

Scoopwoop

 

ज्यात ते दोघेही वधू-वराच्या वेशात एका मंडपात बसलेले दिसताहेत. पण, त्यांनी नेमके कुठे लग्न केले, ते मात्र गुपित ठेवण्यात आले आहे. मात्र आपल्या दनकौर मधील मित्रांसोबत राहुलने हे फोटो शेअर केले होते.

सध्या पायलची नेमणूक गौतम बुद्ध नगर पोलीस स्टेशनमध्ये होती. मात्र, तिथल्या वरिष्ठांना तिच्या या लग्नाची काहीही खबर लागलेली नाही. एसपी रणविजय सिंग यांनी  तिचे सर्व रेकॉर्ड चेक केले.

“या महिलेची कुठे कुठे पोस्टिंग झाली होती, त्याची सगळी माहिती आम्ही घेत आहोत, लवकरच तिच्या विरोधात ऍक्शन घेण्यात येईल,” असेही ते म्हणाले होते!

 

upsc ias exam

 

ती महिला नक्की पायलच आहे का याची खातरजमा देखील केली जात होती, कारण ती पायल नसावी असाही पोलिसांचा अंदाज होता!

मात्र ती पायाल आहे, हे उघड झाल्यास तिच्या या कृत्यासाठी तिच्याविरोधात नक्कीच काही तरी ठोस पावले उचलली जातील असेही ते म्हणाले. पोलीसांसाठी देखील हे प्रकरण एक विलक्षण अनुभव देणारे ठरले!

२००८ साली पहिल्यांदा राहुलने गुन्हेगारी जगतात पाऊल टाकले होते. त्यानंतर तो उत्तरप्रदेशातील अनिल दुजना गँगशी जोडलेला होता. अशी माहिती नोएडा युनिटचे एसपी राजकुमार मिश्रा यांनीच दिली होती!

२००९ मध्ये त्याला प्रसिद्ध व्यापारी मनमोहन गोयल यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानतर त्याने सगळी शिक्षा देखील पूर्ण केली.

शिक्षा पूर्ण करून बाहेर आल्यावर मे २०१६ मध्ये तो पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला.

२०१६ मध्ये त्याची आई स्थानिक पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहिली होती. तेंव्हा आपल्या आईच्या विरोधात कुणी उभे राहिल्यास त्याची खैर नाही अशा धमक्या तो गावकऱ्यांना देत होता,” असे मिश्रा म्हणाले.

हे ही वाचा –

===

 

santabanta

 

२०१७ मध्ये आग्रा येथील बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याने स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. या प्रकरणी देखील त्याला कोठडीत डांबण्यात आले होते. सध्या तो याप्रकरणी जामिनावर बाहेर आहे.

जामीन मिळाल्या मिळाल्या त्याने पायलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता!

राहुल ज्या गावाचा रहिवासी तेथील नगरिकांच्या म्हणण्यानुसार, राहुल जेलमध्ये असताना देखील पायल दोन चार दिवसांनी गावकऱ्याना भेटत असे. तुमच्या समस्या आम्हाला कळवा आम्ही त्यावर तोडगा काढू, तुमच्या समस्यांसाठी सरपंचाला भेटायची गरजा नाही.

त्यांच्यापर्यंत तुम्ही जाऊच नका असे आवाहन ती गावकऱ्यांना करत असे, अशी माहिती सरपंच असणाऱ्या महिलेच्या पतीने दिली. राहुलने गावकऱ्यांना धमक्या देऊन देखील त्याच्या आईने ही निवडणूक हरली होती.

पोलीस कॉन्स्टेबल असणाऱ्या पायलला आता याप्रकरणी कोणती शिक्षा मिळेल ही एक उत्सुकता आहेच. त्याच्यावरील अनेक गंभीर आरोपातून त्याची अजून निर्दोष सुटका झालेली नाही.

 

 

अशाही परिस्थिती या प्रेमवीरांनी जो निर्णय घेतला तो धक्कादायक तर आहेच पण, कुतूहल वाढवणारा देखील आहे.

राहुलच्या मागील त्याची नकारात्मक प्रतिमा तशीच राहील का? त्याच्या भूतकाळाच्या सावलीचा त्याच्या भविष्यातील संसारावर काही परिणाम जाणवेल का?

असे अनेक प्रश्न असले तरी, त्या दोघांनी मात्र जगाची परवा न करता आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. सध्या तरी त्यांच्या सुखी संसाराचा मांडव उभारला जात आहे, हे मात्र नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version