Site icon InMarathi

काँग्रेस का पराभूत होते नि भाजप का जिंकत जातोय याचं अप्रतिम विश्लेषण

rahul modi inmarathi

News State

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

लेखक : मिलिंद जोशी, नाशिक…

=== 

कॉंग्रेस सध्या खरंच खूप मोठ्या संकटात आहे. यासाठी नाही की त्यांचे नेते निवडून आले नाहीत. तर यासाठी कारण सध्या ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांचे नेते करत आहेत त्यामुळे ते लोकांच्या मनातून उतरत चालले आहेत.

इतक्या दिवसात मला एक गोष्ट समजली आहे. राजकारणात इगो ठेवून चालत नाही.

वेळप्रसंगी माघारही घेता आली पाहिजे. पण कॉंग्रेसने स्वतःचा इगो इतका वाढवून ठेवला आहे की त्या इगोपायी त्यांचेच नुकसान होते आहे हेही त्यांना समजत नाहीये.

२०१९ची निवडणूक देखील कॉंग्रेस हारली त्याचे कारणही हेच होते. ज्या गोष्टी बोलायला पाहिजे त्यावर त्यांनी भर दिलाच नाही, आणि अशा गोष्टी बोलत राहिले ज्या त्यांना साबित करता येणार नाहीत.

उदा. नोटबंदी नंतरची परिस्थिती हाताळण्यास भाजपा सरकार अपयशी ठरली हे त्रिवार सत्य आहे. पण कॉंग्रेसने तो मुद्दा न बनवता नोटबंदी हा भ्रष्टाचार आहे असे म्हटले. जे जनतेला पचायला जड गेले. त्यानंतर GST ला फक्त ‘गब्बरसिंग टॅक्स’ म्हटले… पण कसा?

 

India TV

हे मात्र लोकांना समजावण्यात अपयशी ठरले. त्यानंतर तीच गोष्ट राफेल खरेदी, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट हल्ला… याबाबतही. हे मुद्दे भारतीय लोकांसाठी भावनिक होते पण कॉंग्रेसने त्यालाच विरोध केला.

त्यानंतर निवडणुकीसाठी जे आश्वासनपत्र बनवले गेले त्यातही म्हटले काय तर आम्ही कश्मीरचे कलम ३७० तसेच ठेऊ. मग कोण का म्हणून अशा लोकांना मते देतील?

बरे त्यानंतर निवडणुका झाल्या. जनतेने जो कौल दिला त्यावरून तरी कॉंग्रेसनेत्यांना जनतेच्या मनात काय चालू आहे ते समजायला नको का? कलम ३७० चा मुद्दाही असाच भारतीयांसाठी काहीसा भावनिकच.

त्यालाच कॉंग्रेस नेते विरोध करू लागले. त्यांचा प्रवक्ता संसदेत काय म्हणतो तर म्हणे… ‘कश्मीर मुद्दा अंतर्गत मुद्दा नाही, त्यामुळे आम्ही त्याला विरोध करतो.’ हे ऐकल्यावर कोण भारतीय माणूस कॉंग्रेसला पुन्हा मत देईल?

जी गोष्ट पाकिस्तान बोलते तीच कॉंग्रेसकडून बोलली गेली.

 

लोकसत्ता

बरे ज्या कॉंग्रेसमधील नेत्यांनी लोकांच्या भावना ओळखून या मुद्द्याचे समर्थन केले त्यांनाही कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले… ‘३७०च्या निर्णयावर सरकारचे समर्थन करायचे असेल तर आधी कॉंग्रेस सोडा…’ याला अभिमान नाही तर काय म्हणायचे? कधीकधी अति अभिमान मूर्खपणा ठरतो तो असा…

कॉंग्रेसच्या अहंकाराचे ताजे उदाहरण. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना काल भारतरत्न देऊन गौरवले गेले. राष्ट्रपती होण्याआधी ते कॉंग्रेसचे दिग्गज नेते होते. पण तो पुरस्कार बीजेपीने दिला ना?

मग त्याला चांगले कसे म्हणायचे? म्हणून कुणीही गांधी त्या पुरस्कार सोहळ्यास हजर राहिले नाहीत. आता काही जण म्हणतील… नसेल त्यांना वेळ मिळाला… मान्य… पण त्याबद्दल एक tweet देखील नाही?

रवीश कुमार यांना म्याग्सेसे पुरस्कार मिळाला तर त्यांना tweet करून त्यांचे अभिनंदन केले जाते आणि भारतरत्न विजेत्या, माजी राष्ट्रपतींचे अभिनंदन मात्र केले जात नाही? म्याग्सेसे पुरस्कार काय भारतरत्नपेक्षा मोठा आहे?

 

Business Today

पण हे या लोकांना कुणी सांगावे? प्रणव मुखर्जी RSS च्या कार्यक्रमाला हजर राहिले, त्यांनी मोदी जिंकून आल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या… हीच एकमेव खदखद कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये होती जी अशा कार्यक्रमात प्रकर्षाने दिसून आली.

या बाबतीत मला बीजेपीचे कौतुक वाटते… ज्या शिवसेनेशी त्यांचे कायम खटके उडतात त्याच शिवसेनेसोबत युती करण्यासाठी प्रसंगी अमित शहा मातोश्रीवर जातात.

त्यावेळी ते स्वतःचा इगो बाजूला ठेवतात आणि राजकारणासाठी कोणती गोष्टी महत्वाची हे लक्षात घेऊन निर्णय घेतात.

त्यावेळी लोक काय म्हणतील या गोष्टीचा ते विचार करत नाहीत. तीच गोष्ट नितीशकुमार यांच्यासोबतही.

आता काही जण असेही म्हणतील की ही गोष्ट नैतिक दृष्ट्या चूक आहे. पण हेच तर राजकारण आहे.. उगाच म्हणतात का… राजकारणात कुणीच कुणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो.

इगो जरूर असावा… पण तो व्यक्तीपेक्षा मोठा झाला तर व्यक्ती संपवतो आणि पक्षापेक्षा मोठा झाला तर पक्ष संपवतो. खरे तर अजूनही वेळ गेलेली नाही. राजकरणात व्यक्तिगत इगो बाजूला ठेवला तर जिंकण्याच्या संधीही कधीच संपत नाहीत…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version