भाजप प्रवक्त्या शिवानी दाणी यांनी स्वराज यांच्या आठवणींना दिलेला उजाळा डोळ्याच्या कडा पाणावतो
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारतीय राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि असामान्य वक्तृत्वाचं, नेतृत्वाचं वरदान लाभलेल्या मा. सुषमा स्वराज याचं काल रात्री दुखःद निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाचे कधीच भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
विरोधी पक्षात असतानाही कधीही पटली न सोडता सत्ताधारी पक्षाला आपल्या वक्तृत्वाच्या बळावर चीतपट करण्याचा त्यांचा वकूब अनन्यसाधारण होता.
फक्त एक राजकारणीच नव्हे तर उत्कृष्ठ संसदपटू म्हणुन त्यांची कारकीर्द कायम स्मरणात ठेवण्याजोगी आहे.
एनडीए सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या काळात परराष्ट्रमंत्री म्हणुन त्यांनी काम पाहिले. या काळात परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत घेतल्या गेलेल्या अनेक निर्णयांनी भारतीय परराष्ट्र धोरणावर अमिट ठसा उमटवला आहे.
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
भाजपाच्या प्रवक्त्या शिवानी दाणी यांनी सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांची पोस्ट इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत..
===
मी साधारण २४ वर्षांची असेल, अटल जींचे दर्शन घ्यायला दिल्लीला गेली होती. कोहिनूरला बघायला गेली तर हिरे माणिक पाचू कसे दिसतात, तसे अनेक अनेक दिग्गज तिथे बघायला मिळाले.
वाळूच्या कणापेक्षा पण कमी अस्तित्व असलेली मी सुरक्षेचे सगळे टप्पे पार करून पायी दरवाज्यातून ६ कृष्णा मेनन मार्गावरील कोठीत आत जाऊ लागली तर बाजूनी १ कार आली, आणि सगळ्यांच्या नजरा त्या कार च्या दिशेने धावल्या, आणि काही गर्दी सुद्धा.
समोर बघतो तर काय, चक्क त्यातून सुषमा जी उतरल्या. सगळ्यांना भेटून त्या आत जाण्याची वेळ आणि मी चालत तिथवर पोहोचून माझी आत जाण्याची वेळ हि अगदी एकच…
सुषमाजी आणि अटलजींच्या कुणी नातेवाईक होत्या..त्या दोघींचा संवाद हा इतका घरघुती आणि अगदी जवळचा होता ज्याला शब्दात मांडणे कठीण आहे.
सुजी का हलवा बनवण्यासाठी एकमेकींना केलेले फोन आणि नंतर त्याची झालेली चव ह्यावरची चर्चा…माझी लायकी नव्हती तिथे असण्याची पण, पण सुदैवाने मी होती तिथे.
मोह तर खूप होता की पूर्ण ऐकावे पण मी अटलजींच्या दर्शनासाठी आले होती, मी तो मोह आवरला.
पण अटल जींच्या दर्शनानंतर मी त्यांना भेटायला गेली. पायाला हाथ लाऊन नमस्कार केला, त्यांना काही एक इंटरेस्ट नसणे अपेक्षित होते, पण मी “ये धरती ही बलिदान की” च्या सी डी घेऊन गेली होती. माझे म्हणणे शांत पणे ऐकून घेतले. त्यांचे मोठेपण हे असामान्यच होते.
सक्षात सरस्वती होती जिभेवर, १९९६ चं गाजलेलं त्याचं भाषण, जे ऐकून मी आणि माझ्या सारख्या अनेकांनी वक्तृत्वाचे धडे घेतले.
समितीच्या महाशिबिराला त्या आल्या होत्या. माझ्या कडे जल व्यवस्था असल्याने, अधिकारी कक्षात जाऊन त्यांना, सुमित्राजींना जवळून बघायची संधी मिळाली. पण परिचय कधी झाला नाही. त्याचा खल नक्कीच आहे पण काहींचे असणेच हे खूप काही देऊन जात असते, आणि त्यात त्या एक महत्वाच्या होत्या.
अटलजींच्या टीममधल्या त्यांच्या स्वतःच्या सहकारी….फक्त अटलजींमुळे त्या ग्रेट होत्या असे होते का? नक्कीच नाही. त्या स्वतःच अद्भुत होत्या.
युवा मोर्चा, महिला मोर्चा, बीजेपी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केबिनेट मंत्री हे सगळे त्यांचे होणे ते पण प्रतिकूल परिस्थिती मध्ये म्हणजे अवर्णनीय आहे.
बीजेपीचे राष्ट्रीय अधिवेशन होते नागपुरात, मी पत्रकार व्यवस्थेत होते. अरुण जेटलीजी, रवी शंकर प्रसादजी, राजीव प्रताप रुडीजी हे प्रवक्ते होतेत तत्कालीन पण अजून एक प्रमुख नाव होते ते म्हणजे सुश्माजींचे….
ह्यांचे मिडियाशी संवाद मिडियाला किती हवा होता माहित नाही पण आम्हाला खूप उत्सुकता होती की तो व्हावा, म्हणजे सुषमाजींना ऐकायला मिळेल, बघायला मिळेल.
देवेंद्र दादाला सगळे क्रेडीट देत होते की त्यांनी खूप मेहनत घेतली होती, अगदी पठाण सरांना झेलणे ते अधिवेशन यशस्वी करणे! पण आम्हाला त्यांना भेटता आले ते त्याच्या मुळे ह्याचे आम्हाला अप्रूप होते ते शब्दात सांगता येणार नाही.
आत्ता ३ महिन्यांपूर्वी त्या नागपुरात आल्या होत्या. एकदा श्री शक्तीपीठ च्या कार्यक्रमाला आणि एकदा निवडणुकीत. त्या निवडणुकीच्या त्या सभेत मंचावर बसण्याची संधी असून पण मी बसले नाही ह्याची सल आता आयुष्यभर राहील.
देशभक्ती असावी ती किती? आयुष्यात शेवटचे ट्वीट केले ते सुद्धा की त्या ३७० रद्द होण्याची वाट बघत होत्या. ते झाले आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.
१९७५ च्या जे पी मुवमेंट मधून तयार झालेली ही तरुणी, भारतीय राजकारणात इतकी परिपक्व झाली की पहिल्यांदा परराष्ट्रीय मंत्रालयाची उंची अजून वाढवली.
राष्ट्रीयता, देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा म्हणजे काय हे सुषमाजींच्या वक्तव्यातून, भाषणातून, कार्यातून नेहमी प्रकट होत गेले.
नव्या काळात इन्टरनेटचा उपयोग लोक जोडायला त्यांनी अलीकडच्या दिवसात अत्योच्च पद्धतीने केले, भारताबाहेर असलेल्या प्रत्येक भारतीयाची त्या आई होत्या.
आखाती देशांमध्ये युद्ध चालू असताना भातीयांना सुखरूप परत आणण्याचे आणि काही इतर लोकांना वाचवण्याचा त्यांचा धाडसी प्रयत्न होता तो अविश्वसनीय होता.
आज त्या अचानक पणे गेल्या, भारताच्या राजकारणातून साक्षात सरस्वती लुप्त झाली. हल्लीच्या काळात पाकिस्तानला जे खडे बोल सुनावले होते त्या क्षणाला प्रत्येक भारतीयाची छाती ४ इंच फुलली होती.
त्यांची भाषणे भाषण म्हणून जेवढी गाजली तेवढेच त्यांनी डॉ मनमोहन सिंग ह्यांना शेरो शायरीत दिलेले उत्तर फार गाजले.
आता ह्यांची भाषणे ऐकायला नाही मिळणार, पुन्हा एकदा वाघिणीची गर्जना ऐकायला नाही मिळणार. भारताच्या इतिहासाची जेव्हा सुवर्ण पाने लिहिली जातील त्यातील एक सोन्याची व्यक्ती म्हणजे सुश्माजी ह्यांना ह्या डोळ्यांनी बघता आले हेच सार्थक आहे.
शत शत नमन.
श्रद्धांजली!!!!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.