आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
खरं सांगायचं तर मनुष्य आयुष्यभर एकाच गोष्टीच्या शोधात असतो ती म्हणजे शांतता! तुम्ही म्हणालं समाधान देखील शोधत असतो. पण समाधान म्हणजे तरी दुसरं काय हो? एका शांत ठिकाणी निवांत वेळ व्यतीत केल्याने मनाला लाभणारे सुख म्हणजे समाधान नाही का? जेथे मनात ना कसले विचार येतील, की ना कोणी कोणाचा त्रास होईल, निव्वळ शांतता, ज्या माध्यमातून आपण स्वत: आपल्या मनाशी संवाद साधू शकू.
तर मनुष्य अश्या शांततेच्या शोधात असतो, पण दुर्दैवाने त्याला मिळणाऱ्या सगळ्या शांतात क्षणभंगुर असतात. त्यामुळे अजूनही मन सुखावणाऱ्या शांततेच्या शोधात मनुष्य भटकतोय. पण आता त्याचा हा शोध संपलाय असे जाहिर करायला हरकत नाही. कारण जगातली सर्वात शांत जागा सापडलीये. ती जागा तशीच आहे जी मनुष्याला हवी आहे, जिच्या शोधात मनुष्य वर्षानुवर्षे भटकतोय आणि गंमतीची गोष्ट माहिती आहे का? अहो जगातील ही सर्वात शांत जागा देखील मनुष्यानेच निर्माण केलीये.
ही जगातील सगळ्यात शांत जागा म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या बिल्डिंग नं. ८७ मधली ही अद्भुत शांततापूर्ण खोली होय. सगळ्यात शांत यासाठी की जगात कुठेही सापडणार नाही इतकी शांतता येथे सामावलेली आहे. ही खोली म्हणजे आहे एक अॅनकोईक चेंबर! जे मायक्रोसॉफ्टच्या वॉशिंग्टनमधील रेडमंड येथील बिल्डिंग क्रमांक ८७ मध्ये स्थित आहे. या इमारतीत अशा तीन खोल्या आहेत.
मायक्रोसॉफ्ट कंपनी या जागेची निर्माती आहे. त्यांच्या अतिसुपीक डोक्यातील अतिसुपिक कल्पनेतून निर्माण झालेलं हे जागतिक आश्चर्यच म्हणावं लागेल. ही ऑडिओ लॅब बांधायला एक वर्षाचा कालावधी खर्ची पडला. एकेल नॉईज कंट्रोल टेक्नॉलॉजीस या कंपनीच्या सहाय्याने ही लॅब उभारली गेली आहे.
या खोल्यांचं सर्वात मोठं वैशिष्टय़ म्हणजे या ९९ ते १०० टक्के ध्वनिविरहित (Soundproof) आहेत. याच वैशिष्ट्यामुळे जगातली सर्वात शांततापूर्ण जागा म्हणून मायक्रोसॉफ्टच्या या ऑडिओ लॅबला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील त्यांच्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. एवढी शांतता संतुलित राहण्याचं प्रमाण २०.६ डेसिबल इतकं आहे. हे प्रमाण जगात इतरत्र कुठेही आढळत नाही हे विशेष! पूर्वी जगातील सर्वात शांत जागेचा विक्रम हा दक्षिण मिनिऑपॉलिस येथील ओरफिल्ड लॅबोरेटरीजचा अॅनकॉईक चेंबरच्या नावावर होता.
मायक्रोसॉफ्टनं आपली विविध उपकरणं व ध्वनी यंत्रणांची चाचणी करून घेण्याकरिता या ऑडिओ लॅबची निर्मिती केली होती. या खोलीपर्यंत येणारा कोणताही ध्वनी शोषून घेतला जाऊ शकेल अशा धातू व लाकडापासून या खोल्यांच्या भिंती तयार केल्या आहेत.
तुम्हाला अजून एक गंमतीची गोष्ट सांगतो. या खोलीमध्ये बसून तुम्ही तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस जरी वाढवलात तरी त्याचा ही अगदी हलका ध्वनी निर्माण होतो.
मायक्रोसॉफ्ट प्रिन्सिपल ह्युमन फॅक्टर्स इंजिनीअरचे अधिकारी हुंदराज गोपाल यांच्या म्हणण्यानुसार,
मायक्रोसॉफ्टची ही ऑडियो लॅब अँटी व्हायब्रेशन स्प्रिंगवर उभी आहे. यामुळे कोणत्याही धक्क्यातून निर्माण होणारी कंपने मागे फेकली जातात आणि ती इथपर्यंत पोहोचत नाहीत. या चेंबर्समध्ये मायक्रोसॉफ्टच्या सरफेस, होलोलेन्स व कॉर्टाना यासारख्या उत्पादनांचं परीक्षण केलं जातं. तसेच कंपनीच्या इतर काही उत्पादनांवर संशोधन व चाचण्या येथे होतात.
आपल्या अवकाशातील वातावरण देखील भरपूर ध्वनिविरहीत असते. त्यामुळे अवकाशवीरांना अशा प्रकारच्या वातावरणाची सवय व्हावी यासाठी नासामध्ये देखील अशाच प्रकारची लॅब तयार करण्यात आली आहे.
संपूर्णत: ध्वनीविरहित निसर्गनिर्मित जागा शोधण्याचे प्रयत्न आजवर अनेकांनी केले. पण कोणालाच त्यात यश आलेले नाही. कारण कोणत्याही ठिकाणी गेल्यावर मानवनिर्मित ध्वनिपासून आपली सुटका होत नाही. जगभरातील दुर्मिळ जंगलांमधील शांतता देखील हळूहळू भंग पावत चालली आहे. त्यामुळे संपूर्णत: ध्वनीविरहित निसर्गनिर्मित जागा पृथ्वीतलावर सापडणे केवळ अशक्य भासतं !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.