आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगातील अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ हिऱ्यांमध्ये गणला जाणारा एक हिरा म्हणजे ‘कोहिनूर’. हा हिरा जितका दुर्मिळ आणि मौल्यवान आहे तितकाच विवादास्पद देखील आहे.
कोहिनूर हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ आहे, “प्रकाशाचा पर्वत”. या हिऱ्याला तितकाच जुना इतिहास देखील आहे. काही इतिहास तज्ञांच्या मते याला ५००० वर्षांचा इतिहास आहे.
५००० वर्षांपूर्वी एका संस्कृत साहित्यामध्ये या हिऱ्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याची कथा सांगितली जाते. अर्थात संस्कृत साहित्यात उल्लेखलेल्या त्या हिऱ्याचे नाव कोहिनूर नसून स्यमंतक होते, पण ते कोहिनूरचेच पूर्वीचे नाव असल्याचे मानले जाते.
आता कोहिनूर म्हणजेच स्यमंतक होता का, याबाबतही मतभेद आहेत. यानंतर सुमारे चार हजार वर्षे कुठल्याच साहित्यात याचे वर्णन वाचायला मिळत नाही.
इ.स. १३०४ पर्यंत हा हिरा माळवा राजांच्या खजिन्यात होता परंतु, तेंव्हाही याला कोहिनूर म्हणून ओळखले जात नव्हते. इ.स. १३०४ मध्ये हा हिरा अल्लाउद्दिन खिलजीने मिळवला आणि तो त्याच्या खजान्यात जमा झाला.
त्यानंतर १३३९ मध्ये हा हिरा पुन्हा समरकंद येथे आणण्यात आला जिथे ३०० वर्षे हा हिरा जपून ठेवण्यात आला होता.
१३०६ मध्ये या हिऱ्याच्या मागे एक शापित कथा जोडण्यात आली. या कथेनुसार
“हा हिरा जो कोणी परिधान करेल त्याचे आधिपत्य संपूर्ण जगावर राहिल परंतु, त्याला या हिऱ्यामुळे काही दुर्दैवी प्रसंगांना देखील तोंड द्यावे लागेल. हा हिरा एकतर देवाला अर्पण करावा किंवा स्त्रीने तो परिधान करावा तेव्हाच तो दोषमुक्त होईल.”
यानंतर १५२६ मध्ये मुघल सम्राट बाबरने आपल्या बाबरनामा या आत्मचरित्रात या हिऱ्याचा उल्लेख केलेला आढळून येतो. यात लिहिलेल्या नोंदीनुसार हा हिरा बाबरला सुलतान इब्राहीम लोदी करून भेट मिळाला होता.
जगाच्या दररोजच्या एकूण उत्पादनापैकी निम्मी रक्कम इतकी या हिऱ्याची किंमत असल्याचे त्याने नमूद करून ठेवले आहे.
बाबर नंतर त्याचा वारस असणाऱ्या औरंगजेबाने या हिऱ्याचे जतन करून ठेवले. त्याच्यानंतर हा हिरा त्याच्या वारसदारांच्या ताब्यात आला. औरंगजेबाचा नातू, देखील औरंगजेबप्रमाणेच शूर होता.
१७३९ मध्ये पर्शियन सेनापती नादिर शाह याने भारतावर हल्ला केला. त्याला भारतातील सत्ता हवी होती. या निकराच्या लढाईत सुलतान महम्मद पराभूत झाला आणि त्याने नादिर समोर शरणागती पत्करली.
नादिरनेच या हिऱ्याला सध्या प्रचलित असलेले कोहिनूर हे नाव बहाल केले, ज्याचा अर्थ होतो, प्रकाशाचा पर्वत.
परंतु, नादिर फार काळ जगाला नाही त्याच्या एका सेनापतीने त्याच्या खून केला आणि त्यानंतर हा हिरा अहमद शाह दुराणीच्या ताब्यात आला.
अहमद शाह दुराणीचा वारस असलेल्या शाह शुजा दुराणीने हा हिरा पुन्हा भारतात परत आणला आणि १८१३ साली तो राजा रणजीत सिंह (शीख साम्राज्याचे संस्थापक) यांना भेट दिला.
याबदल्यात राजा रणजीत सिंह यांनी शाह शुजाला अफगाणीस्तानची गादी परत मिळवून देण्यात सहकार्य केले.
राजा रणजीत सिंहांना हिऱ्यांची आवड होतीच पण, कोहिनूर सारख्या अतिमौल्यवान हिरा आपल्या खजान्यात असणे प्रतिष्ठेचे आहे असे देखील त्यांना वाटत होते. हा हिरा म्हणजे त्यांच्या सत्तेचे एक अलिशान प्रतिक होता.
हा हिरा जेव्हा सौंदर्याचे प्रतिक नसून सत्तेचे प्रतिक बनला तेव्हा खऱ्या अर्थाने आव्हानांना सुरुवात झाली.
ब्रिटिशांना तर त्याकाळात सत्तेचे प्रचंड आकर्षण होते. म्हणून हा हिरा जर त्यांना मिळवता आला तर, भारतावर आपले वसाहतीक वर्चस्व राखणे सोपे जाईल असे ब्रिटिशांना वाटत होते.
आत्ता या हिऱ्यावरून पूर्वी पेक्षा जास्त कलह आणि वैर निर्माण झाले.
राजा रणजीत यांचा १८३९ साली मृत्यू झाला पण तत्पूर्वी त्यांना हा हिरा एका हिंदू संधुंचा पंथाला दान द्यायचा होता. यावर ब्रिटीशांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
जगतील सर्वात सुंदर, अतिमौल्यवान आणि प्रतिष्ठित समजल्या गेलेल्या हिऱ्याचे हिंदू साधुना काय काम,” अशा आशयाचे संपादकीय इंग्लिश वर्तमानपत्रात छापून आले आणि लिहिणाऱ्याने ब्रिटीशांनी कोहिनूर आपल्या ताब्यात घ्यावा अशी विनंती देखील केली होती.
परंतु, राजा रणजीत सिंह यांच्या मृत्यू नंतर पंजाबच्या गादीवर चार वर्षांत चार राजे होऊन गेले. या राजकीय अस्थिरतेच्या, अराजकाच्या आणि हिंसेच्या काळात सर्वात शेवटी गादीवर आला तो राजा दुलीप सिंह आणि त्याची आई राणी जिंदान.
१८४९ मध्ये ब्रिटिशांनी राणी जिंदान हिला कैदेत डांबले. राजा दुलीप सिंहाचे वय तेंव्हा अवघे दहा वर्षांचे होते. राणीला कैद करून ब्रिटीशांनी राजा दुलीप सिंह कडून लाहोर करारावर स्वाक्षऱ्या करवून घेतल्या. ज्यामध्ये राजा दुलीप सिंहाने कोहिनूर हिऱ्यासोबतच राज्याची संपूर्ण सत्ता ब्रिटिशांना देऊ केली.
अशा रीतीने हा हिरा राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात गेला. ब्रिटीश जनतेला या हिऱ्याचे दर्शन व्हावे म्हणून १८५१ साली लंडन येथे भरलेल्या एका भव्य प्रदर्शनात हा हिरा देखील सामील करण्यात आला होता.
परंतु, लोकांना काही हा हिरा खास वाटला नाही कारण त्याकाळातील इतर हिऱ्यांच्या मानाने त्याची चमक कमी झाली होती.
१८५१ च्या द टाईम्स मध्ये छापून आलेल्या बातमी नुसार,
“त्याच्या बाह्य रूपावरून, अनेकांना तो हिरा कोहिनूर आहे यावर विश्वासच बसला नाही, कारण तो अगदी एका साधारण काचेच्या तुकड्याप्रमाणे दिसत होता.”
हिरा पाहून देखील तो कोहिनूर आहे यावर विश्वास ठेवायला ब्रिटीश जनता राजी नव्हती. तेंव्हा राणी व्हिक्टोरियाच्या नवऱ्याने प्रिन्स अल्बर्टने तो हिरा पॉलीश करण्यासाठी एका जवाहिराकडे दिला. हिऱ्याला मूळ चमक परत यावी यासाठी हा हिरा कट करण्यात आला.
आकाराने थोडा लहान झाला असला तरी पॉलीश केल्यानंतर हा हिरा पुन्हा पूर्वी प्रमाणेच चमकू लागला. राणी व्हिक्टोरिया अनेकदा आपल्या केसांतील पिन मध्ये तो हिरा वापरत असे. त्यानंतर राणीने घालावयाच्या राजमुकुटात तो हिरा जडवण्यात आला.
सध्या या हिरा, त्या राजमुकुटासह अमेरिकेच्या नॅशनल म्युझियम ऑफ नॅच्युरल हिस्ट्रीमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.