“गॅस बर्नर” घरच्या घरी स्वच्छ ठेवण्याचे हे सोप्पे उपाय समजून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणत्याही घरातल्या स्त्री ला जीला हाऊसवाईफ असेही संबोधले जाते तिचे विश्व म्हणजे स्वयंपाकघर! सध्याच्या स्त्रिया तर नोकरी करून सुद्धा घरातली बाजू सांभाळतात, त्यामुळे फक्त चूल आणि मुलं इतकंच स्त्रियांच विश्व राहिलं नसलं तरी किचनमध्ये स्त्रीच्या असल्याने एक वेगळीच जान येते!
जस घरातली बाई आपल्याला चांगलं चुंगलं खायला मिळावं यासाठी सतत धडपडत असते,तसंच त्या किचनची निगा राखण्याची जवाबदारी सुद्धा तिच्यावर असते!
त्यामुळे त्या साफ सफाईची काळजी जशी तिने घ्यायची असते तशीच टी जवाबदारी आपली पण असते! कोणाला स्वयंपाक येवो अथवा न येवो, पण स्वच्छता सगळ्यांनाच जमते आणि त्यात घरातल्या प्रत्येकाने हातभार लावलाच पाहिजे!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अजिबात साफसफाई न करता गॅस भरपूर दिवस वापरला की काय होते ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. गॅस बर्नर जरा जास्त प्रमाणातच काळा दिसू लागतो म्हणजे त्यावर काजळी निर्माण होते.
त्याचा परिणाम म्हणून गॅस नीट काम करत नाही. तुमच्यापैकी भरपूर जणांनी हे देखील पाहिलं असेल की अश्या कित्येक दिवस साफ न केलेल्या गॅसवर एखादं भांड ठेवलं की त्या गॅसची काजळी भांड्यावर देखील जमा होते.
याचं कारण आहे- अनेकदा गॅसवर ठेवलेला पदार्थ उतू जाऊन गॅस बर्नरवर पडतो. आपण तो फडक्याने वरचेवर साफ करतो म्हणा, पण गॅस बर्नरमध्ये गेलेला तो पदार्थ आता तसाच चिकट होऊन राहतो.
असं बऱ्याचदा होऊन देखील आपण गॅस बर्नर साफ केला नाही की गॅस बर्नरमध्ये कचरा जमा होऊन तो नीट काम करत नाही. तो गडद पिवळ्या रंगासारखा प्रज्वलित होतो किंवा काही वेळेला तो वाकडा-तिकडा कसाही पेटतो.
–
- बाथरूम मध्ये गॅस गिझर वापरताय? सावधान अपघात टाळण्यासाठी या टिप्स वापरा!
- गॅस एजन्सीकडून लूट होतीये? या नागरिकाचा मार्ग सर्वांनी शिकायला हवा!
–
मग अश्या वेळेस गरज निर्माण होते गॅस बर्नर स्वच्छ करण्याची! बहुतेक जण आपापल्या परीने नवनवीन शक्कल लढवत हा गॅस बर्नर स्वच्छ करतात. पण तुम्हाला कदाचित माहिती नसले की हा गॅस बर्नर स्वच्छ करण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे. चला तर आज ती पद्धत जाणून घेऊया!
- गॅस बर्नर स्वच्छ करताना तो अलगद शेगडीपासून वेगळा करावा. हे करण्यापुवी गॅस सिलेंडर बंद आहे याची खात्री करून घ्यावी.
- बर्नरच्या वरचं झाकणं देखील हलक्या हाताने दूर सारावं.
- त्यानंतर गरम पाणी करून त्यात थोडासा साबण टाकून त्या पाण्यामध्ये बर्नरचे भाग बुडवून ठेवावेत. थोडय़ा वेळाने बर्नरचे भाग पाण्याबाहेर काढावे आणि एखादी टोकदार वस्तू घेऊन त्या साहाय्याने बर्नरमधील घाण काढून टाकावी. पाण्यात यासाठी भिजवावे की त्यामुळे बर्नरवरील चिकटपणा लवकर निघून जातो.अजून एक गोष्ट करावी ती म्हणजे एका भांडय़ात पाणी घेऊन त्यात सोडा टाकावा आणि त्यात बर्नरचे भाग बुडवून ठेवावेत. नंतर ते भाग चांगल्या, स्वच्छ पाण्यात स्वच्छ करून घ्यावेत.
- बर्नरचे भाग पूर्णत: स्वच्छ करून झाले की मऊ कापडय़ाने ते पुसून घ्यावे.
–
- घरगुती गॅस सिलेंडर अधिक काळ टिकवण्यासाठी उपयोगी ठरतील या टिप्स
- सिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं !
–
गॅसचा बर्नर साफ करताना या काही गोष्टींचा वापर केल्यास ते स्वच्छतेचे काम आणखीन सोपे होते, त्या वस्तु म्हणजे भांडी घासायचा साबण,खाण्याचा सोडा, व्हीनेगर!
या तीन गोष्टी गॅस स्वच्छ करण्यात मदत करतात आणि जे जिद्दी डाग असतात ते सोप्या पद्धतीने काढायला मदत करतात!
खाण्याच्या सोड्याने बर्नर स्वच्छ करत असाल तर पहिले ते बर्नर गरम पाण्याने नीट धुवून घ्या, त्यानंतर त्या वर खाण्याच्या सोड्याची पाण्यात मिश्रण करून ते मिश्रण त्या बर्नर वर लावावे आणि २० मिनिटं तसेच ठेवून नंतर हलक्या हाताने घासून बर्नर स्वच्छ करावे!
तसेच गॅस बर्नर वर नियामितपणे व्हीनेगर चा स्प्रे मारल्यास ते आणखीन स्वच्छ राहतात, शिवाय पहिली प्रकिया म्हणजेच गॅस चा वरचा भाग साफ करून झाल्यावरच व्हीनेगरचा वापर करावा!
ही सगळी मेहनत जर वाचवायची असेल तर गॅस बर्नर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
यासाठी वेळोवेळी गॅस साफ करून घ्यावा म्हणजे त्यांमुळे गॅसवर कचरा जमा होत नाही किंवा चिकट थर जमा होत नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.