' ईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा ! – InMarathi

ईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ईमेल पाठवणं हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालंय. कोणतही ऑफिशियल कम्युनिकेश करायचं झालं की आजकाल समोरचा माणूस ईमेल करायला सांगतो. ऑफिसमध्ये देखील ईमेल शिवाय पान हलत नाही.

आजच्या युगातल्या प्रत्येक व्यक्तीला ईमेल करता येणं अतिशय गरजेचं आहे किंबहुना ईमेल ही काळाची गरज बनली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. तर असा हा महत्त्वपूर्ण ईमेल बऱ्याच वेळा समोरच्या माणसाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाची झलक देऊन जातो.

तुमच्या ईमेल वरून त्याच्या लक्षात येते की तुम्ही कसे आहात? त्यामुळे एका प्रोफेशनल वे मध्ये तुम्ही तुमचा इमेल ड्राफ्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीवर तुमची चांगली छाप पडेल.

आज आम्ही तुम्हाला अश्याच काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही इमेल ड्राफ्ट करताना वापरल्या तर तुमचा ईमेल अतिशय इम्प्रेसिव्ह बनेल आणि समोरचा व्यक्ती त्यामुळे प्रभावित होईल.

 

email-writing-tips-marathipizza

ईमेल विषयाला धरून लिहा
email-writing-tips-marathipizza01
ईमेल लिहिताना सर्वप्रथम ईमेलचा विषय समजून घ्या. ईमेल पाठवत असताना त्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करणे टाळावे. ईमेल लिहित असताना, नेमका विषय काय आहे, हे लिहायला बिलकुल विसरू नका किंवा बऱ्याचदा असे होते की आपल्या ईमेलचा आणि विषयात लिहिलेल्या शब्दांचा काही अर्थ नसतो अशी चूक होणार नाही याची दक्षता घ्या.

महत्त्वाचे मुद्धे ठळक करा

 

email-writing-tips-marathipizza02

एखाद्या इ-मेलला लगेच उत्तर मिळण्याची आणि त्यानंतर तुम्हाला काम पुढे सुरू ठेवण्याची गरज असेल, तर तसे मुद्दे ठळक करण्याची सवय लावा जेणेकरून ईमेल पाठवलेल्या व्यक्तीला तो पूर्ण वाचण्याची गरज आहे का किंवा तत्काळ उत्तर देणं अपेक्षित आहे का, हे लक्षात येईल.
एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, तर उत्तर देताना ‘रिप्लाय ऑल’ करा. त्यामुळे ईमेलची लांबी वाढत नाही.
योग्य आणि सहज भाषा वापरा
email-writing-tips-marathipizza03
प्रत्येक ईमेल करताना वेगळ्या भाषेची गरज असते. आपण ज्याला मेल करत आहोत त्याला डोळ्यासमोर ठेवून भाषा वापरावी. कारण आपल्या भाषेचा पोत कशा प्रकारचा आहे, त्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे शब्दांची योग्य निवड महत्त्वाची ठरते.
त्याचबरोबर, ईमेलचा शेवट तुम्ही कशा प्रकारे करता, ते बरंच काही सांगून जाणारे असते. भावनांबाबत जागृत राहा; कारण तुम्ही ज्यांना ईमेल पाठविणार आहात, ती व्यक्ती त्याचा कसा अर्थ लावेल, हे सांगता येत नाही. त्याचबरोबर, ईमेल करताना कॅपिटल अक्षरांचा जास्त वापर करू नका.
लहान आणि नेमका मजकूर
email-writing-tips-marathipizza04
ईमेल चा मजकूर शक्यतो लहान असल्यास उत्तम , ज्यामुळे आजकाल अनेकदा स्मार्टफोनवरून ईमेल पाहिले जातात. त्यामुळे ‘ऑफिशियल कम्युनिकेशन’मधील मजकूर हा छोटा, पण नेमका असा असावा. म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे, हे नेमक्या मुद्द्यांत, शब्दांत मांडता आले पाहिजे. त्यात गुंतागुंत नसणे उत्तम!
टिप्स अगदी सोप्या आहेत. एकदा Try करून बघाच…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?