Site icon InMarathi

४०,००० महिला सेनेच्या मदतीने तैमूरला अद्दल घडवणारी रामप्यारी; असामान्य साहसकथा!

rampyari im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय इतिहासात वीरांगनाही खूप आहेत, ज्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून शत्रूविरुद्ध लढा दिला. तशीच एक वीरांगना आहे रामप्यारी चौहान गुर्जरी.

तिने १३३८ मध्ये तैमूर-ए-लंगच्या विरुद्ध ४०,००० महिला सैनिकांवर लीडरशीप केली तर जोगराज सिंह गुर्जर यांनी ८०,००० सैनिकांवर लीडरशीप केली. तैमूरनी भारतावर ९२,००० सैनिकांना घेऊन भारतावर हल्ला केला.

त्यात घोडेस्वार पण होते. पण तो या हल्ल्यात जखमी झाला आणि तीन दिवसांनी मृत्युमुखी पडला. पाहुया या लढाईची कथा जी एका वीरांगनेने केली. खरंच तिच्या शौर्याला सलाम.

‘रामप्यारी गुर्जरी’ हिचा जन्म आत्ताच्या सहानपूर गावात गुर्जरगढ क्षेत्रात झाला. चौहान गोत्रातील गुर्जर होते. इ.स. १३३८ मध्ये जेव्हा तैमूर लैंग नी हरिद्वार हून प्राचीन दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा रामप्यारी गुर्जर ने तैमूरलंगच्या विरुद्ध लढाई लढली.

तेव्हापासून तिच्या नावाच्या आधी वीरांगना लावला जातं.

 

वीर गुर्जर इतिहास / Veer Gurjar History

रामप्यारीचं युद्ध कौशल्य पाहून तैमूरने तोंडात बोटं घातली. त्यानी आपल्या पुर्‍या आयुष्यात अशी महिला पाहिली नव्हती किंवा ऐकलंही नव्हतं. जी ४० हजार स्त्रियांना मार्गदर्शन करत होती.

तिचं असामान्य धाडस बघून तो घाबरून गेला. लहानपणापासून रामप्यारीवर जोगराज सिंह गुर्जर यांचा चांगलाच प्रभाव होता. जोगराज गुर्जर खूबड परमार वंशाचे योद्धे होते. १३७५ मध्ये हरिद्वार जवळील कुंजा सुनहाटी या गावात त्यांचा जन्म झाला होता. नंतर या गावावर मुघलांनी कब्जा केला व ते गाव उजाड केले.

मग जोगराज सिंहांचे वंशज सहारनपुरमध्ये आले. ते खूपच पराक्रमी होते. त्यांची उंची ७ फूट ९ इंच होती तर वजन ३२० किलो होतं.

अशा या जोगराज सिंहासारख्या पराक्रमी माणसाचा रामप्यारीवर प्रभाव होता. रामप्यारींना लहानपणापासून युद्ध, शौर्य अशा गोष्टी ऐकण्याची खूपच आवड होती. लहानपणापासून ती निर्भय आणि लढवैय्या स्वभावाची होती.

 

historiesandmystery.com

तिच्या लहानपणी देशावर गुलामीचं राज्य होतं तरी त्यांच्या शेतात ती एकटी जात असे, न घाबरता. तिला जराही भीती वाटत नसे. पहेलवान होण्यासाठी ती आपल्या आईकडून माहिती मिळवत असे, सतत आईकडे चौकशी करत असे.

संध्याकाळी शेतात किंवा एकांत ठिकाणी जाऊन व्यायाम करत असे. लहानपणापासून सुंदर, सुडौल शरीर असलेल्या यामुलीने व्यायामाचं कोंदण करून शरीर सुदृढ बनवलं. लहानपणापासूनच ती मुलांसारखेच कपडे घालत असे.

आजूबाजूच्या गावात ती कुस्त्या बघायला आपल्या भावाबराबेर आणि वडिलांबरोबर जात असे. अशा वीरांगना नेहमीच जन्माला येत नाहीत. रामप्यारीच्या या सगळ्या गोष्टींची चर्चा सार्‍या गावात झाली आणि आजूबाजूच्या परिसरात पण पसरू लागली.

एक मुलगी व्यायाम करते, कुस्ती बघते, मुलांसारखे कपडे घालते हे त्या काळी फारच अचंबित करणारं होतं. तिच्या घरच्यांनी पण तिच्या या गोष्टीला पाठिंबा दिला हेही खरंच कौतुकास्पद आहे. कारण तेव्हाच्या स्त्रियांना आत्तासारखं स्वातंत्र्य नव्हतंच मुळी.

जेव्हा जेव्हा इतिहासातील तैमुरच्या विरुद्ध लढाईचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा रामप्यारी गुर्जरी ची कथेचा आपोआपच उल्लेख होईल. 1398 मध्ये भारतावर घातक असा हल्ला झाला. तैमूरने अतिशय क्रूर आणि उघडउघड लयलूट सुरू केली ते अतिशय भयानक होतं.

मग सर्व समाजातील लोकांनी तैमूरच्या सैन्याबरोबर गमिनीकाव्याने युद्ध करण्याची युक्ती काढली. आणि महापंचायत समितीने संपूर्ण समाजाची फौज बनवली. ८०,००० योद्धा आणि ४०,००० तरुण महिला सैनिक हातात हत्यार घेऊन या युद्धात सहभागी झाले.

 

YouTube

महिलांचे प्रमुख नेतृत्व राम प्यारीकडे होतं, तर पुरुषांच्या ८०,००० योद्ध्यांचे सर्वोच्च सेनापती होते जोगराजसिंह गुर्जर तर हरवीरसिंग गुलिया सेनापती होते. या युद्धात बाण व भाले वापरले गेले.

तैमूर स्वत:चे संरक्षण करीत होता आणि त्याच्याभोवती खूप उत्तम योद्धे आणि घोडेस्वार होते, पण हरबीरसिंग गुलिया त्याच्यापुढे सिंहासारखे उभे राहिले आणि त्यांनी भाल्याच्या साहाय्याने तैमूरच्या छातीवर वार केले, त्याला गंभीर जखमी केले, तैमूर स्वत:च्याच घोड्याजवळ पडला.

त्याचा सैन्याचा सेनापती खिजरा त्याला वाचवण्यासाठी धावत आला आणि तैमूरच्या सैन्याने हरबीरसिंग गुलियावर जोरदार हल्ला केला. एकदम झालेल्या हल्ल्यामुळे हरबिरसिंग रणांगणावर बेशुद्ध पडले. ही बातमी कळताच जोगराज सिंह यांनी २२,००० योद्ध्यांसह शत्रूवर हल्ला केला.

जोगराज सिंह स्वत: घटनास्थळी गेले आणि हरबीरसिंगला स्वत:च्या हातांनी उचलून परत छावणीत आणले, पण काही तासांतच हरबीरसिंग शहीद झाले. पण या सैन्याने खूप बहादुरीने तैमूरच्या सेनेबरोबर लढत दिली. या युद्धात सामान्य लोक पण सहभागी झाले.

या युद्धानंतर तैमूर कधीही परतला नाही आणि आणखी १५० वर्षे भारतावर आक्रमण पण झाले नाही. तैमूरचे भारतीय भूभाग ताब्यात घेण्याची, लुटण्याची स्वप्ने या युद्धानंतर पूर्णत: वाहून गेली.

असं म्हणतात की काही दिवसांतच हरबिर सिंग बरोबर झालेल्या झटापटीमुळे खूप वाईट पद्धतीने जखमी झालेल्या तैमूरचा मृत्यू काही दिवसांतच झाला.

अशा या पराक्रमी सेनेचाच एक भाग होती वीरांगना रामप्यारी गुर्जरी. त्यांनी देश रक्षणासाठी शत्रूसाठी लढून प्राण पणाला लावण्याची प्रतिज्ञा केली.

जोगराजच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या ४०,००० ग्रामीण महिलांच्या युद्ध प्रशिक्षणाची व निरीक्षणाची जबाबदारी रामप्यारी चौहान गुर्जरी व तिच्या चार सहकार्‍यांवर होती. या ४०,००० महिलांमध्ये गुर्जर, जाट, अहीर, राजपूत, हरिजन, वाल्मिकी, त्यागी आणि इतर जातीचे योद्धा होते.

जशी इतर सेना होती, म्हणजेच योद्ध्यांची सेना ज्याप्रमाणे प्रशिक्षण घेत होती तसेच प्रशिक्षण महिला सेना पण घेत होती. त्याच्यात काही काटकसर नव्हती. महिला म्हणून कोणतीही सवलत त्यांनी घेतली नाही.

त्याचबरोबर प्रत्येक गावातील तरुण-तरुणींना आपल्या स्वत:च्या व देशाच्या संरक्षणासाठी पण शिक्षण दिले जात होते. संध्याकाळी कुस्तीच्या आखाड्यात सर्वांना एकत्र करून व्यायाम, मल्लविद्या, तसेच रणविद्या याचे धडे दिले जात होते.

काही खास प्रसंगी खापची सेना आपलं कौशल्य सार्वजनिक ठिकाणी दाखवायची. खापमधील सर्व सैनिक कधी संकट येईल सांगता येत नाही अशा दबावाखाली होते, पण संकटाशी सामना करण्यास ते नेहमीच तयार असत.

 

Hindu Philosophy

 

त्याचप्रमाणे रामप्यारी गुर्जरीची महिला सेना पण पुरुषांप्रमाणेच सदैव तयार असे. कष्ट, मेहनत यात त्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. या महिला पुरुषांच्या बरोबरीने तैमूरलंग च्या बरोबरीने, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या.

देशासाठी आपले प्राण पणाला लावणार्‍या रामप्यारी आणि तिच्या सेनेतील ४०,००० महिलांना मानाचा मुजरा.


===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version