Site icon InMarathi

ओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अमेरिकेच्या इतिहासातील सुवर्णमध्य ठरलेल्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बजावलेल्या सर्वोतम कामगिरीच्या जोरावर जनमानसात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झाले होते. अमेरिकेच्या जनतेमध्ये ओबामांची प्रचंड क्रेझ होती. जागतिक महासत्तेचा कारभार त्यांच्या हाती असून देखील अजिबात गर्व न बाळगता अतिशय विनम्रपणाने त्यांनी प्रत्येक गोष्ट हाताळली आणि म्हणूनच जगातील इतर देशांमध्येही एक आदर्श म्हणून ते ओळखले जाऊ लागले. अश्या या कार्यक्षम नेत्याच्या निवृत्तीनंतर संपूर्ण जगाने त्यांना भावपूर्ण निरोप दिला आणि राष्ट्राध्यक्ष पदातून मुक्त झाल्यावर ओबामा पुढे काय करणार याबद्दल सगळीकडे चर्चा रंगू लागली. पण हे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल की निवृत्त झालेल्या ओबामांना देखील अमेरिकन सरकारकडून पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला असे म्हणायला हरकत नाही!

स्रोत

गंमतीचा भाग वेगळा पण अमेरिकेमध्ये १९५८ नंतर एक कायदा संमत करण्यात आला होता, ज्या अंतर्गत माजी राष्ट्राध्यक्षांना सेवेतून मुक्त झाल्यावर काही मुलभूत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १९५८ पूर्वी अशी कोणतीही तरतूद नव्हती. पण त्यानंतर जेवढे राष्ट्राध्यक्ष झाले, त्या सर्वाना सरकारकडून पेन्शन आणि सेवा-सुविधा प्रदान केल्या गेल्या, ज्या माजी राष्ट्राध्यक्ष ओबामांना देखील मिळणार आहेत.

सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीतून मुक्त झाल्यावर पेन्शन प्रदान केली जाते त्याच प्रकारे ओबामांना देखील वर्षाला १.३६ कोटी रकमेची पेन्शन मिळणार आहे. परंतु यावर ओबामांना कर देखील भरावा लागणार आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांना मिळेल तो म्हणजे टाईम सिक्रेट सर्विस प्रोटेक्शन! मरेपर्यंत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सेवेमध्ये ही गोष्ट असेल.

स्रोत

सोबतच ओबामांना ट्रॅव्हल एक्सपेन्स देखील प्रदान करण्यात येईल. ते कोणत्याही सरकारी दौऱ्यावर गेले की त्याचा सगळा खरंच अमेरिकन सरकार भरेल.

ओबामा व त्यांच्या कुटुंबियांच्या वाट्याला मेडिकल इन्शुरन्स देखील येईल. त्या अंतर्गत ते मिलिट्री हॉस्पिटल्समध्ये उपचार घेऊ शकतील. हेल्थ बेनिफिट्स प्रोग्रॅमनुसार हेल्थ इंश्योरन्स सुद्धा ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांना लागू होईल.

ऑफिस स्पेस, स्टाफ कॅम्पेनसेशन, कम्युनिकेशन सर्विस, प्रिंटिंग आणि पोस्टाशी संबंधित खर्चाचा समावेश असलेल्या ट्रान्सिशन फंडचा देखील यामध्ये समावेश आहे. निवृतीच्या ७ महिन्यांपर्यंत हा फंड त्यांना नियमित मिळत राहील.

स्रोत

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या सेवेचं चांगलंच फळ मिळतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये!

हे देखील वाचा: अमेरिकन राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते? सोप्या उदाहरणाने समजून घ्या

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version