' एक दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया : २६-वर्षीपासूनचा ट्यूमर १७ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढला – InMarathi

एक दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया : २६-वर्षीपासूनचा ट्यूमर १७ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

महिलेच्या छाती जवळील अडीच किलो कॅन्सरचा ट्यूमर काढण्यास डॉक्टरांना यश

 २६ वर्षापासून असलेल्या ट्यूमर मध्ये आढळले कॅन्सरचे विषाणू

 डॉक्टरांच्या १७ तासाच्या शर्तीच्या प्रयात्नानंतर मिळाली अडीच किलोच्या

ट्यूमर पासून मुक्तता

४७ वर्षीय भाग्यश्री मांगले यांचा २६ वर्ष पासून असलेला छाती व खांद्याच्या मधील ट्यूमर काढण्यात ज्युपिटर हॉस्पिटल मधील डॉक्टरांना यश मिळाले आहे.

 

tumor patient Inmarathi

अतिशय दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया यावेळी भाग्याशी यांच्या वर करण्यात आली. खांदा आणि छातीच्या मध्ये आलेल्या ट्यूमर कडे अनेक वर्ष भाग्याशी यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्याचे रुपांतर कर्करोगाच्या ट्यूमर मध्ये झाले.

मुळच्या रोहा, जिल्हा रायगडच्या असणाऱ्या भाग्याशी मांगले या पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे उजव्या हाताचे दुखणे व अर्धांगवायूच्या उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या.

यावेळी डॉक्टरांच्या असे निदर्शनास आले की त्यांच्या छाती व खांद्याच्या मध्ये २० सेंटीमीटर एवढामोठा ट्यूमर आहे.

हा ट्यूमर त्यांना १९९३ साला पासून असून तो कमी करण्यासाठी त्यांनी काही शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या मात्र त्या अयशस्वी ठरल्या. त्यांनी एलोपॅथिक व आयुर्वेदिक उपचार

केले तसेच काही ढोंगी डॉक्टरांच्या उपचारामध्ये त्या ट्यूमर वर गोंदवून देखील घेतले होते, मात्र कोणताही गुण आला नाही.

 

cancer Inmarathi
Siteman Cancer Center

आता तो ट्यूमर एवढा मोठा झाला होता की त्यामुळे श्वासनलिका दबली जाऊन त्यांना श्वासोच्छवास घेणे अशक्य होत होते. तसेच उजव्या हाताकडे जाणाऱ्या सर्व रक्त वाहिन्या देखील दाबल्या गेल्या होत्या व हात निकामी झाला होता.

यावर ज्युपिटर हॉस्पिटल मधील ओन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आशिष पोखरकर म्हणाले की “ अडीच किलोचा हा ट्यूमर खांद्या व छातीच्या अवघड अशा भागात पसरला होता.

तो काढण्यासाठी रुग्णाचे कॉलर हाड व छातीचे स्नायू कापावे लागले. तसेच हा ट्यूमर तेथील नसांमध्ये गेला होता. या शस्त्रक्रिये दरम्यान आमची पहिली प्राथमिकता रक्तवाहिन्या वाचवणे व त्याच वेळी कॉलर हाडाचे पुनर्निर्माण करणे ही होती.

१७ तास चाललेली ही शस्त्रक्रिया अनोखी असून यात ज्युपिटर हॉस्पिटल मधील अनेक तज्ञांचे योगदान आहे.“

 

doctors-coat-inmarathi01
m3india.in

यावेळी ज्युपिटर हॉस्पिटलचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहुल दलाल म्हणाले की

“ही पुण्यातील नव्हे तर भारतातील दुर्मिळ केस आहे. पुण्यातील अनेक दिग्गज डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता मात्र ज्युपिटर हॉस्पिटलने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

आता रुग्णाची प्रकृती चिंताजन नसून त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे.”

या शस्त्रक्रिये मध्ये ओन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आशिष पोखरकर, प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहुल दलाल, भूलतज्ञ डॉ. ब्रिश्निक भट्टाचार्य तसेच डॉ. परितोषा दलाल व डॉ. अमित पाटील यांचा देखील समावेश होता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?