एक असे विमानतळ जेथे ट्रेन निघून गेल्यावरच विमान उड्डाण घेतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगात अश्या अनेक अविश्वसनीय गोष्टी आहेत की ज्यावर लगेच विश्वास ठेवणे कठीण असते. पण जेव्हा आपण स्वत: त्याबद्दल जाणून घेतो तेव्हा मात्र या गोष्टी नाकारता येत नाही.
आज आम्ही तुम्हाला एका अश्याच अविश्वसनीय गोष्टीबद्दल सांगणार आहोत.
बरं त्यापूर्वी जर आम्ही तुम्हाला असा प्रश्न विचारला की विमान आणि रेल्वे यामध्ये सरस कोण? तर तुम्ही सहज उत्तर द्याल की विमान हेच सरस!
आता आम्ही तुम्हाला सांगितलं की जगात एक असं विमानतळ आहे जेथे विमान रेल्वे क्रॉस होण्याची वाट पाहतात आणि नंतरच उड्डाण करतात तर तुमची तत्काळ प्रतिक्रिया काय असेल?
तुम्ही असंच म्हणालं की आत्ताच तर आपण मान्य केलं की विमान हे रेल्वेपेक्षा सरस, मग विमान रेल्वे निघून जाण्याची वाट का बघेल? उलट रेल्वेने विमान निघून जायची वाट बघायला हवी.
बरं हा वाद राहू दे बाजूला पण खरंच असं एक विमानतळ अस्तित्वात आहे जेथे रेल्वे निघून जाईपर्यंत विमानांना प्रतीक्षा करावी लागते आणि त्यानंतरच ही विमाने उड्डाण घेतात.
हे विमानतळ न्यूझीलंडमध्ये आहे. हा देश तसा चित्रविचित्र गोष्टींनी भरलेला. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे हे विमानतळ होय!
या विमानतळावरील विमानांना रेल्वे जाण्याची वाट पहावी लागते कारण या विमानतळाच्या धावपट्टीवरच रेल्वे ट्रॅक आहे.
न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडजवळ गिसबोर्न एयरपोर्ट नावाचे हे विमानतळ स्थित आहे.
या विमानतळावरून ६० पेक्षा अधिक देशांतर्गत विमानांचे उड्डाण होते. तसेच १५ लाख प्रवासी वर्षभर येथून प्रवास करतात.
येथे सकाळी ६:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत रेल्वे मार्ग आणि विमानतळाचा रनवे दोन्ही वर सारखी रेल्वे आणि विमानाची ये जा सुरु असते.
रोज रात्री ८:३० वाजता रनवे बंद केला जातो.
रेल्वे मार्ग हा रनवेच्या अगदी मध्यातून गेला आहे.
अनेक वर्षांपुर्वी ही बांधणी करण्यात आल्याने, रेल्वे आणि विमान या दोघांसाठी एकच परिसर असेल, याची विचार झाला नव्हता.
मात्र असा गंभीर प्रश्न असला, तरी वाद न घालता, त्यातून समजूतीने मार्ग काढण्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.
त्यामुळे ट्रेन आली तर विमानाला थांबवले जाते आणि विमानाची वेळ असेल तर ट्रेनला थांबवले जाते.
पण ट्रेनला सिग्नल मिळण्याचे प्रमाण फारच कमी आहे. बिचाऱ्या विमानांनाच ट्रेनची जास्त प्रतीक्षा करावी लागते.
ट्रेन जाण्यासाठी विमानाला वाट पाहावी लागते असे घडणारे हे जगातील एकमेव दुर्मिळ विमानतळ आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.