आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
एखादा माणूस अचानक बेपत्ता होतो किती भयंकर आहे ही गोष्ट! ३ वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे, कॅफे कॉफी डे या नामवंत संस्थेचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता झाले होते.
आणि ह्या बातमीने संपूर्ण देशभरातच प्रचंड खळबळ उडवून दिली होती! पण नंतर एक वेगळीच बातमी ऐकायला मिळाली!
सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीच्या किनारी सापडल्याची बातमी आली.
कर्नाटकचे आत्ताचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार आणि बीएल शंकर हे कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांच्या बेगळूर येथील निवासस्थानी हे सर्व लोक जमले आहेत.
पोलीस तपासात त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट तर सापडली, पण त्यानंतर आठ दिवस ते बेपत्ता होते. काल त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले.
पोलिसांनी सांगितले की ते दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कोट्टापुरा भागातील नेत्रावती नदीवरील पुलाजवळ उतरले आणि त्याने चालकास सांगितले की, ते फिरायला जात आहेत.
दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त सेंथिल म्हणाले,
‘‘त्यांनी म्हणजे सिद्धार्थनी ड्रायव्हरला ते परत येईपर्यंत थांबायला सांगितले, पण जेव्हा दोन तास झाले तरी ते परत आले नाहीत, तेव्हा ड्रायव्हरने पोलिसांशी संपर्क साधला. व्ही. जी. सिद्धार्थ गायब झाल्याची तक्रार दिली.’
मंगळूरच्या पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी एक संदेश दिला, ‘शोधकार्यात स्थानिक मच्छीमारांचीसुद्धा मदत घेतली जात आहे. आम्ही याची पण माहिती करून घेत आहोत की, त्यांचं कुणाकुणाशी फोनवर बोलणं झालं होतं.’
सप्टेंबर २०१७ मध्ये सिद्धार्थ यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा घातला होता. सिद्धार्थ यांची गणना देशातील सर्वांत जास्त कॉफी बियांचा पुरवठा करणार्या लोकांमध्ये केली जाते.
माइंड ट्री या संकेतस्थळावरील त्यांच्या माहितीनुसार त्यांचे कुटुंब १४० वर्षांंहून अधिक काळ या कॉफीच्या व्यवसायात आहे. ते माईंड ट्री मध्ये कार्यकारी संचालक पदावर आहेत.
त्यांचा जन्म कर्नाटकातील चिक्कामागलुरू जिल्ह्यात झाला आहे. मंगलोर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर व्हीजी सिद्धार्थने आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत शेअर बाजारामध्ये दबदबा निर्माण केला.
१९८३ ते १९८४ या काळात मुंबई येथील जे एम फायनान्सियल लिमिटेड मध्ये त्यांनी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून इंटर्नशीप केली!
आणि नंतर उपाध्यक्ष म्हणून महेंद्र कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली शेअर बाजाराच्या सिक्युरिटीज व्यापारात रुजू झाले.
त्यावेळी ते फक्त २४ वर्षांचे होते. जे एम. फायनान्शिअल लिमिटेडबरोबर काम केल्यानंतर दोन वर्षांनी व्हीजी सिद्धार्थ बंगळूरला परत आले, त्यांच्या आवडीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना पैसे दिले.
व्हीजी सिद्धार्थने शिवान सिक्युरिटीज नावाच्या कंपनीबरोबर ३०,००० रुपयांमध्ये स्टॉक मार्केट कार्ड विकत घेतले आणि सिवन सिक्युरिटीज कंपनी काढण्यात आली.
२००० साली या कंपनीला नवीन नाव देण्यात आलं ‘वे टू वेल्थ सिक्युरिटीज लिमिटेड’ असं त्याचं नामकरण करण्यात आलं.
या कंपनीचे उद्यम भांडवल विभाग ग्लोबल टेक्नॉलॉजी वेंचर्स (जीटीव्ही) म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९८५ पर्यंत ते शेअर बाजारात पूर्ण काळ मालक गुंतवणूकदार होता आणि १०,००० एकर कॉफी फर्मचा मालक होता.
ते म्हणतात, जेव्हा ९० च्या दशकात कॉफी ट्रेडिंग उदारीकरण झाले, तेव्हा मी एका वर्षात वृक्षारोपणात गुंतवलेली रक्कम दुप्पट केली.
कॉफीच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित करणारी कंपनी १९९३ मध्ये अॅमलगमेट बीन कॉफी ट्रेडिंग कंपनी लिमिटेड (एबीसीटीसीएल) या नावाने सुरू झाली.
जर ३,००० टन वृक्षारोपण झालं तर एबीसीटीसीएल २०,००० टन व्यापार करेल असे ध्येय ठेवले आणि दोनच वर्षांत ही कंपनी भारतातील दुसर्या क्रमांकाची निर्यातदार बनली.
१९९६ साली बेंगलोरच्या सतत गर्दी असलेल्या ब्रिगेड रोडवर पहिले सीसीडी स्टोअर चालू केले, तिथे कॉफी आणि इंटरनेट सर्फिंगच्या एका तासाला १०० रुपये मोजावे लागत.
कॉफी साखळीची पहिली सुरुवात अशी झाली जेव्हा बंगळूरमध्ये आयटीधारक भरपूर होते आणि सुखी जीवनशैली होती.
असे केल्याने व्हीजी सिद्धार्थ आणि त्यांची टीम त्यांच्या एमबीएच्या मित्रांच्या चांगल्या निर्णयाच्या विरोधात गेली.
सीसीडी ही भारतातील सर्वांत मोठी चेन आहे आणि कॉफी डे ग्लोबलची मालकी आहे जी कॉफी डे एंटरप्रायजेसची उपकंपनी आहे.
आज सीसीडीकडे जवळपास १७०० कॅफे, ४८,००० व्हेंडींग मशीन, ५३२ कियॉस्क आणि ३० ग्राऊंड कॉफी सेल आउटलेटस् आहेत.
मनी कंट्रोल अहवालात कॉफी डे एंटरप्रायजेसची वार्षिक उलाढाल ४,२६४ कोटी रुपये इतकी आहे. व्हीजी सिद्धार्थ यांच्याकडे १२,००० एकर (४०४७ हेक्टर) कॉफी लागवड आहे.
२०१५ च्या फोर्ब्सच्या यादीमध्ये त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
मध्यंतरी एक बातमी अशी आली होती की, कोका कोला सीसीडीशी प्राथमिक चर्चा करत आहे. भारताच्या सर्वांत मोठ्या कॉफी साखळीला भरीव हिस्सा कोका कोलाकडून मिळू शकतो.
भागभांडवलाच्या विक्रीसाठी कोका कोलाकडून ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचे मूल्यांकन सीसीडीकडे होते. सीसीडीव्यतिरिक्त सिद्धार्थ यांनी हॉस्पिटॅलिटी चेनची स्थापना केली आहे.
त्यात सेरे आणि सिकडा अशी सेव्हन स्टार रिसॉर्ट आहेत.
इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, लार्सन अँड टुब्रो यांनी नुकतीच ब्लॉक डीलच्या माध्यमातून तंत्रज्ञान कंपनी माईंड ट्री येथे व्हीजी सिद्धार्थ आणि कॉफी डेचा सुमारे २० टक्के हिस्सा विकत घेतला आहे.
कमोडिटी व्यवसायातून यशस्वी पॅन इंडिया ब्रँड तयार करण्यासाठी व्ही. जी. सिद्धार्थ यांना इकॉनॉमिक्स टाइम्सने २००२-०३ साठी वर्षातील यशस्वी उद्योजक म्हणून गौरविले आहे.
२०१७ मध्ये कर चुकल्याचा सिद्धार्थ यांच्यावर आरोप होता. कर्नाटक आणि गोवा विभागातील प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी मुंबई, बेगलुरू, चेन्नई आणि चिमकगलूरमधील २० पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकले.
कॅफे कॉफी डे (सीसीडी) रिटेल साखळीवरील प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात जप्त केलेल्या कागदपत्रांतून ६५० कोटी रुपयांचे उत्पन्न लपवून ठेवण्यात आले आहे.
दरम्यान व्ही जी सिद्धार्था यांचा मृतदेह सापडल्यानंतर सगळीकडेच खळबळ उडाली होती, आता अर्थात यामुळेच त्यांनी आत्महत्या केली का नाही, हा प्रश्न तसा अनुत्तरीतच राहिला!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.