आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
नाटक असो वा चित्रपट हि गोष्ट प्रत्यक्ष अनुभवण्याची असते. तो अनुभव घेताना आपल्याला पूर्णपणे आनंद मिळवण्यासाठी आजूबाजूला संपूर्ण शांतता असणे अनिवार्य असते. जर ती शांतता नसेल तर मात्र आपला हिरमोड होत असतो.
मोबाईल फोन हे नाटकात व्यत्यय येण्याचं सर्वात मोठं कारण आहे.
चालू कार्यक्रमात फोन वाजला तर प्रेक्षकांचा हिरमोड होत असतो, परंतु याचा जितका परिणाम प्रेक्षकांवर होतो तितकाच परिणाम नाटकात अथवा कुठलाही स्टेज परफॉर्मन्स करणाऱ्या कलाकारांवर होत असतो.
नाटक अथवा चित्रपट सुरु करण्याआधी फोन स्वीच ऑफ अथवा सायलेन्ट करण्याची सूचना करून देखील लोक तिचं पालन करतांना बेपर्वाई बाळगतात.
नेहमी घडणाऱ्या घटनांमुळे कलाकारांच्या कामावर परिणाम होतो आणि त्यांना मनस्तापाचा सामना करावा लागतो. यावर अनेक कलाकार आपल्या प्रतिक्रिया तीव्र शब्दात व्यक्त करत असतात.
हे फक्त नाटकांबाबतीतच नाही तर प्रत्तेक लाइव शो बाबतीत घडत असल्याचं दिसून येत आहे. मग तो गाण्यांचा कार्यक्रम असो किवा एखादा स्टँड अप कॉमेडीचा शो असो. काही कलाकार तर अशा गोष्टी खूप मजेशीर निभावून नेतात पण हे सगळ्याच ठिकाणी लागू होईल असं नाही ना.
मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना देखील अश्या प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असल्यामुळे त्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया ४ ते ५ महिन्यांपूर्वी सोशल मिडियावर व्यक्त केल्या होत्या.
प्रकरण असं होतं की सुबोध भावे एका ठिकाणी नाटक करायला गेले होते, ह्या नाटकात त्यांची भूमिका होती. परंतु नाटकादरम्यान प्रेक्षकांचे फोन खणखणायला सुरुवात झाले, ज्यामुळे सुबोधच्या अभिनयात व्यत्यय आला.
सुबोध यामुळे भडकला, त्याने अश्या प्रेक्षकांना टार्गेट करून समाज माध्यमांवर टीका तर केलीच सोबतच असंच चालू राहणार असेल तर नाटक करणं थांबवेल अशी सूचना देखील दिली.
त्याच्या ह्या पोस्टवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या, यात काही सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा देखील समावेश होता. सुबोधच्या फेसबुक आणि ट्विटर वरील पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली, ह्यात अनेक लोकांचा समावेश होता.
काही निवडक प्रतिक्रिया आपण बघूयात …
ट्विटरवरील प्रतिक्रिया:-
अभिनेते निपुण धर्माधिकारींची प्रतिक्रिया, त्यांनी सुबोध भावेंना निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन केलं होतं.
नितीन गोडबोले नामक वाचकाने नाना पाटेकरांना देखील अश्याच समस्येचा सामना करावा लागल्याचं नमूद केलं होतं,
संगीतकार जयदीप यांनी देखील सुबोधचं समर्थन केलं, आणि नाट्यगृहात जॅमर लावण्याची मागणी केली.
अनेकांनी ट्विटरवर ह्या विषयावर आपलं मत व्यक्त करताना अनेक उपाय देखील सुचवले आहेत त्यातले निवडक रिप्लाय आपण बघुयात..
_
ज्याप्रमाणे लोकांनी सुबोधचं ट्विटरवर समर्थन केलं आहे त्याप्रमाणे त्याला विरोध केला होता.
अनेकांनी सुबोधला नाटक न सोडण्याचं आवाहन केलं…
_
_
ज्या प्रमाणे ट्विटर वर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या, त्याचप्रमाणे सुबोधच्या फेसबुक पोस्टवर देखील अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या…
_
_
या सर्व प्रकारानंतर सुबोध भावेने हे ट्विट केले होते.
नाटक फक्त आमचं नाहीये तर ते आमच्यापेक्षा जास्त प्रेक्षक म्हणून तुमचं आहे.
आमचा मान ठेवा अगर ठेवू नका पण त्या नाटकाचा मान ठेवा हिच विनंती.
आनंद मिळवण्याच्या मध्ये कुठलाही व्यत्यय नको pic.twitter.com/9aTgHxtlEI
— सुबोध भावे (@subodhbhave) July 29, 2019
अश्याप्रकारे सुबोध भावेंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलेली व्यथा ही निश्चितच समाजमनावर परिणाम करून गेली आहे. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात आपल्यामुळे काही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.
हे सर्व झाल्यानंतर सुबोधच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळूनही, आजही रंगभूमीवर अथवा कोणत्याही लाईव शोमध्ये प्रेक्षकांची एक चांगला रसिक म्हणून असलेली जबाबदारी ते नीट पार पाडत आहेत का?
हा प्रश्न प्रत्येक रसिकाला अंतर्मुख करून टाकणारा आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त आपण सर्व ही रसिक असण्याची भूमिका अधिक जबाबदारी पार पडूयात…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.