Site icon InMarathi

अत्यंत महत्वाचं, खासकरून तरुणांसाठी तुमचा स्मार्ट फोन तुम्हाला जाड करतोय…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

वजन घटवण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. डाएट प्लॅन, व्यायाम, योगा… किती आणि काय काय…! आत्ता यात आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे. हो, तुमच्या मोबाईल फोनची!

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी आत्ता मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर टाळायला हवा.

तुम्ही जर गरजेपेक्षा किंवा पाच तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईल फोनवर घालवत असाल तर, तुमच्या या सवयीमुळे तुमचं वजन तर वाढू शकतंच पण, तुम्हाला हृदयरोग, मधुमेह यासारख्या गंभीर व्याधी देखील जडू शकतात!

त्यामुळे विशेषतः तरुणाईने यावर गांभीऱ्याने विचार करणे गरजेचे आहे. २१व्या शतकात मोबाईल हा अर्थातच परवलीचा शब्द बनला आहे.

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे याचा शरीर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत.

 

qz.com

आजच्या तरुणाईला या मोबाइल आणि सोशल मिडियाचे प्रचंड वेड आहे.

एकमेकांशी विनोद, लेख, इमेजेस, व्हिडीओ शेअर करणे, पोस्ट टाकणे, कमेंट देणे, लाईक करणे, व्हिडीओ बनवणे, तो एडीट करणे, सेल्फी काढणे, अशा मन रिझवणाऱ्या कित्येक गोष्टी या एवढ्याशा छोट्या वस्तुत दडलेल्या आहेत.

त्यामुळे यात किती वेळ गेला आणि कसा गेला हे कळत देखील नाही. पण, यामुळे या विद्यार्थ्यांचा शारीरिक हालचालीवर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढण्यात आलेत.

सातत्याने मोबाईलवर वेळ घालवण्याने शरीराची हालचाल कमी होते आणि आळस वाढतो.

सिमोन बॉलिव्हा युनिव्हर्सिटी,कोलंबिया येथे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती ही बाब सिद्ध झाली आहे. दिवसातील पाच तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ जे मोबाईल वापरतात त्यांच्यामध्ये ४३ टक्क्यांनी लठ्ठपणा वाढण्याची शक्यता आहे.

या सर्वेक्षणामध्ये सरासरी १९ वर्षे वयापर्यंतच्या मुली आणि २० वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा अभ्यास करण्यात आला.

 

हे ही वाचा – 

===

 

surepointspy.comयामध्ये ३६.१% पुरुषांचे वजन जास्त आहे तर, ४२.६% पुरुष लठ्ठपणाचे शिकार आहेत. तसेच, ६३.९% स्त्रियाचे वजन जास्त आहे तर, ५७.४% स्त्रियांना लठ्ठपणाची समस्या आहे, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

याचसोबत सध्याच्या जीवनशैलीत देखील इतका फरक पडला आहे की, यामुळे मधुमेह, हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत चालला आहे.

स्मार्टफोनचा अतिरिक्त वापर केल्याने शरीराची गतिशीलता कमी होते, त्याचा परिणाम शरीराच्या हालचालीवर देखील होतो. शरीराची चपळता कमी होते.

त्यामुळे अकाली मृत्यू, मधुमेह,हृदयरोग, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, हाडांच्या व्याधी अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांची शक्यता वाढली आहे.

शारीरिक लठ्ठपणा वाढण्यामागचे कारण आणि त्यामुळे होणारे गंभीर परिणाम यांची माहिती या सर्वेक्षणातून मिळाली आहे. सर्वसामान्य लोकांना याची माहिती करून देणे आणि त्यांच्यामध्ये याबाबतची जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.

जितका जास्त वेळ तुम्ही मोबाईल वापराल तितका तुमचा लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त आहे.

२६% विद्यार्थी ज्यांचे वजन जास्त आहे आणि ४.६% विद्यार्थी जे लठ्ठ आहेत, ते दिवसातील तब्बल पाच तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवतात.

 

India Today

मोबाईल वापरणे ही सध्या एक गरज देखील बनली आहे. तंत्रज्ञानाचा जितका वाढता प्रसार होईल, तितकी कामे सुलभ होऊ लागली. त्यामुळे यावरील अवलंबन वाढलेले आहे. पावलोपावली तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे वाटू लागले.

अगदी लहान मुलांपासून ते वृध्द व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच याची चटक लागली आहे.

म्हणून यातील धोके ओळखून त्यातून लवकर बाहेर पडणे केंव्हाही चांगले. कामाव्यतिरिक्त स्मार्टफोनचा अतिरिक्त वापर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे.

खरेतर, चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम, योगा, खेळ हे सर्व महत्वाचे आहेच. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुरळीत राहते.

जेपी हॉस्पिटल, नोएडा येथील डॉ. राजेश कपूर, जे सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागात कार्यरत आहेत, त्यांच्यामते स्मार्टफोन वापरावा की वापरू नये हा विचार करण्याची वेळच आत्ता राहिली नाही. कारण हा फोन म्हणजे जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

परंतु तुमचा खूप सारा वेळ जर मोबाईलवरच जात असेल तर या सवयीला लगाम लावणे गरजेचे आहे.

अर्थात ही सवय एका रात्रीत बंद झालीच पाहिजे असे काही नाही. तुम्ही किती वेळ मोबाईलवर घालवता त्यातील थोडा-थोडा वेळ कमी करता येऊ शकेल.

 

mdltechnology.com

मोबाईल कशासाठी वापरावा? कधी वापरावा? किती वेळ वापरावा? याचे काही नियम बनवून ते काटेकोरपणे पाळल्यास याच्या अतिरिक्त वापरावर अपोआपच नियंत्रण बसेल. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता त्याचा विधायक उपयोग करून घेण्याची सवय लागेल.

तुम्ही पाच तास वेळ घालवला किंवा त्यापेक्षा कमी वेळ दिला हा मुद्दा महत्वाचा नाही. तर, तुम्ही शारीरिक हालचाली करता का?

करत असाल तर शरीर सुडौल राहण्यास आणि मन तंदुरुस्त राहण्यास तितकी हालचाल पुरेशी आहे का, हा प्रश्न आहे. म्हणून मोबाईलवर जे गॅझेट वापरता त्यासाठी तुमच्याकडून दिला जाणारा वेळ कमी करा.

मोबाइलची सवय सुटण्यासाठी योगा करणे, फिरायला जाणे, खेळणे अशा शारीरिक हालचाली करत राहिल्यास कमी वयात लठ्ठ्पणा, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

निरोगी आयुष्यासाठी सकस आहार आणि योग्य व्यायाम या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं गरजेचं आहे.

वेगाने धावत चाललेल्या जगाची बरोबरी साधण्यासाठी तंत्रज्ञान आणि त्यातील कौशल्ये आत्मसात करणं जितकं गरजेचं आहे तितकंच तब्येतीची योग्य काळजी घेण, निरोगी राहणं देखील आवश्यक आहे.

हे ही वाचा – 

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version