Site icon InMarathi

अट्टल बदमाश गुन्हेगार भाजपात सामील झाल्याबद्दल एका समर्थकाने व्यक्त केलेले विचार…

modi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या बातम्या आपण पाहत आहोत. लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला रेकॉर्डब्रेक विजय आणि विधानसभेत विजयाबद्दल असलेली खात्री या दोन गोष्टी या प्रवेशांना कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षसंघटना वाढण्यास यातून हातभार लागेल ही एक जमेची बाजू वगळता यातून भाजपचे नुकसानच होईल असं अनेक कार्यकर्त्यांना वाटतं.

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईकही भाजपात उद्या प्रवेश करणार आहेत.

 

DNA India

या प्रवेशाच्या सत्राच्या पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांना काय वाटते? भरती करत सुटलेल्या पक्षनेतृत्वाला त्यांना काय सांगायचे आहे?

हे सांगणारी पोस्ट चेतन दीक्षित या तरुणाने लिहिली आहे, ती इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत..

===

२००२ मध्ये तो बसपाकडून आमदार होता..

नंतर २००७, २०१२ मध्ये समाजवादी पार्टीकडून आमदार झाला..

२०१७ मध्ये त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने #तथाकथित “उदात्त हेतू साधण्यासाठी” अर्थातच “समाजसेवा” करण्यासाठी भाजपात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा आमदार झाला..”चौथ्यांदा”

२०१७ मध्येच त्याच्यावर सतरा वर्षाच्या “नोकरीसाठी म्हणून उत्सुक असलेल्या” एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला..

 

ThePrint

प्रकरण सीबीआयपर्यंत गेलं..

नंतर पीडितेच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.. साक्षीदाराचा सुद्धा मृत्यू झाला.. आज एका बेदरकार ट्रकने ह्या पीडितेच्या कारला धडक दिलीये.

ज्यात तिची काकू आणि अजून एक नातेवाईक ठार झालेत, वकील जबर जखमी झालाय आणि ती पीडिता मरता मरता वाचलीये.. ती गंभीर जखमी झालीये..

ह्या धडकीमागे ह्याच “उन्नावच्या आमदाराचा म्हणजे कुलदीप सिंह सेंगर”चा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय..

ह्याच गोष्टीत जर इतर कोण्या पक्षाचा आमदार असला असता तर तमाम भाजपा समर्थक लोकांनी शांतता पाळली असती?

 

Patrika.com

हा आमदार चार ठिकाणी तोंड मारून सध्या भाजपात आलाय म्हणून हा सगळा दोषारोप भाजपावर केला गेला तर विरोधकांचं काय चुकलं?? भाजपाची ह्यात काही जबाबदारी नाही?

का ते “आरोपच फक्त झालाय, सिद्ध काही झालं नाहीये अजून”चं तुणतुणं वाजवत राहायचं? सारखं सारखं?

मी इथे राजकारण करायला आलेलो नाहीये. व्यक्त व्हायला आलोय. जे पटतं ते धमक्यांना भीक नं घालता मांडतो. ह्याचा अर्थ भाजपाने काहीही करावं आणि सर्व समर्थकांनी त्याकडे कानाडोळा करावा हे सगळ्यांना जमणार नाही..

महाराष्ट्र प्रदेश भाजपाने ह्या सगळ्याचा विचार करावा. हा जो काही लोंढा आपण स्विकारत आहात हा आपल्याला डोईजड झाल्याशिवाय राहणार नाही. लिहून ठेवा..

 

India.com

भाजपासमर्थनात जेंव्हा पोस्ट्स लिहीत होतो तेंव्हा फारशी कोणी दखल घेतली असेल असे वाटत नाही. तेंव्हा ह्या अश्या पोस्ट्सची तरी दखल कितपत घेतली जाईल माहित नाही.

भाजपाचा इतिहास हा संघर्षाचा आहे. शत्रूला आपल्या गोटात सामील करून लढाई जिंकल्याचा आव आणल्याचा नाही असे आम्ही आज म्हणतो. येणारी पिढी ते कितपत म्हणेल शंका आहे..

ज्या कोणाला ह्या अश्या आयारामांचं समर्थन करायचं आहे त्यांनी खुशाल करावं. माझ्याकडून जमेल असं वाटत नाही.

महाराष्ट्रात उन्नाव ना घडो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना..

ता.क. – तमाम सैनिक आणि गुलामांनो आधी आपापली फुटती घरं आणि उरलेले नगरसेवक सांभाळा आणि मग कुचक्या कमेंट्स करायला या.

भाजपाला काहीही बोललो तरी चुकूनसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित किंचितला समर्थन दिलं जाणार नाही. मोदी समर्थक होतो, आहे, राहीन.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version