महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या निलेश साबळेंच्या यशाचा प्रवास किती खडतर असेल याची आपल्याला कल्पनाच नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
कोणतंही मोठं व्यक्तिमत्व मोठं होण्यामागे एक प्रवास असतो. प्रत्येक ती व्यक्ती, जी आयुष्यात काहीतरी खुप भारी करते आहे असं आपल्याला वाटतं ती आपल्यातुनच गेलेली असते.
विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच कदाचित काहीतरी वेगळं करून दाखवणारी व्यक्ती त्या क्षेत्रातली लीडर ठरते.
अश्या त्या महान लोकांकडून सगळ्यांनाच प्रेरणा मिळावी म्हणुन भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भाडीपा जे की एक मराठीतील अग्रगण्य असं यु ट्युब चॅनेल आहे. त्यांनी एक नवीन कार्यक्रम सुरू केलाय रेडी टू लीड.
या कार्यक्रमात भाडीपाचे को फौंडर सारंग साठ्ये हे होस्ट करताना दिसतात. याआधी नागराज मंजुळे, प्राजक्ता कोळी, प्रकाश आमटे यांसारखे सेलेब्रिटी बोलवले होते.
यावेळेस त्यांनी मराठी टेलिव्हिजनचा बादशाह ज्यांनी चला हवा येऊ द्या या पहिल्या मराठी प्रमोशनल कॉमेडी शो ची सुरुवात केली असे डॉ.निलेश साबळे यांना बोलवले होते.
यामध्ये सारंग साठ्ये यांनी विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरं निलेश साबळेंनी दिली आहेत त्यातून खरच खूप शिकण्यासारखं आहे.
१. स्वतःच संधी निर्माण करणे
आज ते संपूर्ण महाराष्ट्राला गेले काही वर्षे सातत्याने हसवत आहेत तर या सगळ्याची सुरूवात कुठून झाली? यावर ते म्हणाले, अभिनयाची आवड होती पण त्यावेळेस त्यांना कुठे स्टेज नव्हतं मिळत, म्हणून त्यांनी एकपात्री प्रयोग सुरू केले.
त्यानंतर वडिलांची बदली भोरला झाल्यामुळे तिथे भोरच्या राजवाड्यात शूटिंग चालायचं आणि तिथे त्यांना ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून पहिली एन्ट्री मिळाली. त्यांनी तिथे ती संधी मिळवली.
२. संधीच सोनं
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम महाराष्ट्रात क्वचितच असा कोणी असेल ज्याला माहीत नसेल, पण या यशस्वी प्रयोगाची सुरूवात कुठे झाली असं विचारण्यात आलं.
तर ते म्हणाले, त्यांच्या आयुष्यात गोष्टी अपघातानेच घडतात. फु बाई फु हा कॉमेडी शो ५ वर्ष केला आणि नंतर अचानक झी चा निलेश साबळे यांना इमरजेंसी फोन आला की २ दिवसात एक असा कार्यक्रम हवा आहे ज्यात सिनेमाचं प्रोमोशन होऊ शकेल.
ही इच्छा रितेश देशमुखांची होती की हा शो निलेश साबळे यांनी डायरेक्ट करावा. पण तेव्हा निलेश साबळे थोडे घाबरून गेले आणि कसं करणार २ दिवसात असा प्रश्न आल्यावर ती समोरची व्यक्ती त्यांना एवढंच म्हणाली की संधी ही एकदाच येते आणि ती आयुष्य बदलणारी ठरू शकते.
आज मराठीमध्ये चला हवा येऊ द्या हा नंबर १ चा कार्यक्रम आहे.
३. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हा भाडीपा चा एक सेगमेंट होता ज्यात त्यांनी विचारलं की कुठून जाणवलं तुम्ही कलाकार आहात.
त्यावर ते म्हणाले, लहान असताना ३री मध्ये त्यांच्या शाळेत एक कार्यक्रम होता ज्यात डान्स होता. हे सगळं बघायला निलेश साबळे जायचे आणि ते तिथे त्यांच्या मित्राला एक स्टेप शिकवताना पकडले गेले आणि त्यांना ती स्टेप करायला लावली.
त्यांनतर त्यांना डान्स मध्ये तर घेतलच पण एक नाटक पण बसवायला लावलं. त्या नाटकाचं दिग्दर्शन निलेश साबळेंनी केलं होतं आणि तिथूनच त्यांना जाणवलं की यात काहीतरी होऊ शकतं. त्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांना याची जाणीव झाली.
याच दरम्यान कार्यक्रमात निलेश साबळेंना प्रवीण तरडे आणि दिलीप प्रभावळकर यांनी मिमिक्री करायला लावली आणि ती उत्कृष्ट रित्या त्यांनी केली.
४. अपयश गेलं चुलीत
सुरुवात एका छोट्या सिरीयल पासुन केली, ती सिरीयल फक्त ३ महिने चालली आणि या अपयशानंतर ते महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या ऑडिशन ला गेले, तिथे ते पहिल्याच लुक मध्ये रिजेक्ट झाले.
जेव्हा परत त्यांनी नाष्टा करता करता आपापल्या कलाकृती सादर करायला लावल्या त्यात डॉक्टरांनी त्यांची कला सादर केली आणि ते रिजेक्ट झालेले असतानाही सिलेक्ट झाले. त्या यादीत शेवटचं नाव डॉक्टरांचं होतं.
यात एक सरप्राइज बाईट म्हणून जितेंद्र जोशी निलेश साबळेंबद्दल बोलले.
ते म्हणाले, निलेश चा अभिमान वाटतो वगैरे ठिके पण त्यांना त्यांची माणुस म्हणुन ईर्षा वाटते. त्यांचा रोल काय आहे हे ते कधीच विसरत नाही. कार्यक्रमात कुठेही कुरघोडी करताना दिसत नाही असं त्यांचं म्हणन होतं. जे की अगदीच बरोबर आहे.
यात बोलताना ते हे पण बोलले की लोक टीका करतात पण काय घ्यायचं आणि काय नाही हे पण समजायला हवं असं ते म्हणाले.
५. शेवटचा असा एक सेक्शन होता तो म्हणजे कमिटमेंट-कमिटमेंट
यामध्ये त्यांनी विचारलं की अशी एक वेळ येते आयुष्यात जिथे आपण आता हेच करायला हवं असं वाटतं अशी वेळ तुमच्या आयुष्यात कधी आली?
ते म्हणाले, लहानपणीच ठरलं होतं की या क्षेत्राकडे ओढा आहे. त्यांनतर त्यांनी हे पण सांगितल की यातलं त्यांना सगळंच आवडत हे सांगताना त्यांनी त्यांच्या शो च्या सेट च उदाहरण दिलं जिथे ते खिळे ठोकण्यापासून सगळी कामं करतात.
ती सगळी कामं करायला माणसं असताना हे सगळं करायला आवडतं. जेव्हा महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला तेव्हा त्यांनी ठरवलं की हेच करायचं.
प्रत्येक यशस्वी माणसाचा एक प्रवास असतो, ज्यात बऱ्याच गमती जमती असतात. त्यातून आपल्याला पुढची पाऊलं कशी घ्यावी हे समजतं. या मुलाखतीतून खरच खूप शिकायला मिळतं.
या उपक्रमासाठी भारतीय डिजिटल पार्टीचे देखील खूप धन्यवाद कि अश्या बऱ्याच दिग्गजांच्या यशाचं कारण आपल्याला समजतय आणि त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना त्यासाठी मदत होते.
या पूर्ण मुलाखतीचा व्हिडीओ तुम्ही येथे पाहू शकता..
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.